Ola ने लाँच केली स्वस्तात 200 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर

New Ola S1x 4 kWh Scooter – भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी ओला इलेक्ट्रिक ने S1x या स्टार्टींग रेंजच्या ईव्ही मध्ये नवीन ४ व्हेरिएंट्स जोडले असून सर्व व्हेरिएंट्सचे स्पेसिफिकेशन आणि  फीचर्स, बॅटरी पॅक आणि रेंज यामध्ये भिन्नता आहे. कमी बॅटरी आणि रेंज असणारी स्कूटर 2kWh बॅटरी सह येते आणि या मॉडेल ची किंमत रुपये 79,999 (एक्स-शोरूम) असून टॉप 4kWh बॅटरी पॅक असणारे मॉडेल रुपये 1,09,999 (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे.  S1x च्या सर्व मॉडेल्स आणि फीचर्स मध्ये असणारे बदल या लेखात सविस्तर जाणून घेऊया.

Ola स्कूटर नवीन S1X च्या नव्या रेंजसह चार व्हेरिएंट्स ऑफर करत आहे, या चारही इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत स्कुटरमध्ये दिलेल्या बॅटरी पॅक आणि रेंजवर अवलंबून आहे. 2kWh ते 4kWh बॅटरी पॅक या Ola स्कूटर मध्ये समाविष्ट आहे.

2kWh बॅटरी पॅक असणारी Ola S1X

या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 79,999 रुपये एक्स-शोरूम असून हि इ-स्कुटर एका चार्जमध्ये 95km इतकी रेंज देते, या स्कुटरचा high- speed हा 85kmph इतका असून, 2kWh बॅटरी पॅक असणारी हि स्कुटर 5 तासांत पूर्ण चार्ज होते.

वाचा: ‘बॅटरीवरची थार’ bold look आणि 400 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी महिंद्रा इलेक्ट्रिक थार

3kWh बॅटरी पॅक असणारी Ola S1X

या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 89,999 रुपये एक्स-शोरूम असून, हि इ-स्कुटर एका चार्जमध्ये 143 किमी इतकी रेंज देते, या स्कुटरचा high- speed हा 90 किमी प्रतितास इतका असून,  3kWh बॅटरी पॅक असणारी हि स्कुटर 7.4 तासांत पूर्ण चार्ज होते.

वाचा: MG ZS EV ची किंमत 20 लाखाच्या आत ,MG motors कारकिंमतीत ‘मोठी घसरण’

4kWh  बॅटरी पॅक असणारी Ola S1X

या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1,09,999 रुपये एक्स-शोरूम असून, हि इ-स्कुटर एका चार्जमध्ये 195 किमी इतकी रेंज देते, या स्कुटरचा high- speed हा 90 किमी प्रतितास इतका असून, 4kWh बॅटरी पॅक असणारी हि स्कुटर 6.5 तासांत पूर्ण चार्ज होते.

ओला एसवनएक्स: फीचर्स

Ola S1X च्या चारही व्हेरिएंट्स मध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स  हे तीन मोड स्कुटरमध्ये दिले असून, स्कुटर चालूं करण्यासाठी चावी, ड्युअल रिअर शॉक, फ्रंट ड्रम ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, 34 लिटर चा बूटस्पेस, 4.3 इंचाचा LCD इनस्ट्रुमेंट डॅशबोर्ड आणि 12 इंचाचे टायर या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये मिळतात.

वाचा: Biggest Discount: एमजी Comet EV, ZS EV वर 3.90 लाखांपर्यंत सुट, जाणून घ्या MG Motor च्या New Offers

Ola S1X+बद्दल जाणून घेऊया

या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 99,999 रुपये एक्स-शोरूम असून, हि इ-स्कुटर एका चार्जमध्ये 151 किमी इतकी रेंज देते, या स्कुटरचा high- speed हा 90 किमी प्रतितास इतका असून, Ola S1X+  स्कुटर 7.4 तासांत पूर्ण चार्ज होते.

ओला एसवनएक्स-प्लस: फीचर्स

वरील माहितीमध्ये नमूद केलेल्या फीचर्सच्या तुलनेत काही वेगळे फीचर्स Ola S1X+ मध्ये तुम्हाला जाणवतील; डिजिटल की, फोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल यामध्ये मिळतील शिवाय Ola S1X च्या इतर व्हेरिएंट्सप्रमाणे 34 लिटर चा बूटस्पेस, 5 इंचाचा LCD इनस्ट्रुमेंट डॅशबोर्ड आणि 12 इंचाचे टायर या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये मिळतात.

Ola S1 X मधले रंग पर्याय

तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये ड्युअल-टोन फिनिश असणारे रंग पर्याय मिळतील;  रेड व्हेलॉसिटी, मिडनाईट, व्होग, स्टेलर, फंक, पोर्सिलेन व्हाइट आणि लिक्विड सिल्व्हर

ओला एसवन एक्स बुकिंग

तुम्ही Ola S1 X इलेकट्रीक स्कुटरचे प्री-ऑर्डर बुकिंग करू शकता; सोबत ग्राहकांना हि स्कुटर खरेदी करताना बँक तर्फे EMI योजना लाभ सुद्धा मिळू शकतो, शिवाय ठराविक क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही 5,000 रुपयांपर्यंत 5 टक्के सूटचा फायदा देखील मिळवू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment