एमजी झेडएस ईव्ही चक्क 3.9 लाख रुपयांनी कमी, MG motors कारकिंमतीत ‘मोठी घसरण’

MG Motors Cuts Prices: एमजी मोटरच्या हेक्टर, ग्लोस्टर आणि कॉमेट ईव्ही या कार्सच्या किंमतीमध्ये मोठी कपात झाली आहे आणि एमजी मोटर चे MG ZS व्हेरिएंट्स चक्क 3.9 लाख रुपयांनी कमी झाली आहे . तुम्ही जर लाँग रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार च्या शोधात असाल, तर एमजी मोटर इंडिया ने नव्या वर्षात इलेक्ट्रिक वेहिकलचा प्रसार अधिक प्रमाणात होण्यासाठी एमजी झेडएस ईव्हीचा एंट्री लेव्हल प्रकार लॉन्च केला आहे, लेटेस्ट फीचर्सने खचाखच भरलेली एमजी झेडएस ईव्ही एक्झिक्युटिव्ह या गाडीचं लॉन्चिंग भारतात 20 लाखाच्या आत होणार आहे.

एमजी झेडएस ईव्ही तपशील

टाटा नेक्सॉन ईव्ही आणि ह्युंदाई कोनाच्या तोडीस तोड असणारी, एमजी मोटोर्सची ZS EV चे नवीन एंट्री-लेव्हल व्हेरिएंट लॉन्च झाले आहे, याआधी एमजी झेडएस ईव्ही हि कार एक्साइट, एक्सक्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह प्रो या तीन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध होती पण यानंतर झेडएस ईव्ही Executive हासुद्धा एंट्री-लेव्हल व्हेरिएंट उपलब्ध झाला आहे, ज्याची किंमत आधीच्या तुलनेत कमी झाली आहे.

वाचा: ‘बिझिनेसवाल्यांची स्कूटर’ Ola ची नवीन स्कुटर मिळणार फक्त B2B साठी, काय आहे हे B2B?

एमजी झेडएस ईव्ही फिचर अपडेट

या कारच्या फीचर्स मध्ये  क्रॅश पॅड, डोअर आर्मरेस्ट, सेंटर कन्सोल लेदरेट पॅडिंग, कनेक्टेड कार टेक, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ आणि पॉवर ड्रायव्हर सीट यांचा समावेश आहे. special featers मध्ये नवीन
Air Purifier, 10.1 इंच टचस्क्रीन, Android Auto/Apple CarPlay, 360-डिग्री कॅमेरा आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.
 मागच्या बाजूला AC व्हेंट्ससोबत ऑटो एसी, कपहोल्डर्स सोबत आर्मरेस्ट आणि चार्जिंग पोर्ट्स दिले गेले आहेत. 

गाडीच्या stand-out फीचर्समध्ये म्हणजे बाहेरील बाजूस नवीन LED टेललाइट्स, नवीन LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, ऑटो हेडलाइट्स आणि रेन सेन्सिंग वाइपर यांचा समावेश आहे.

हि कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असून 5 सीटर MG च्या 5 स्टार (युरो NCAP) रेटिंग मिळालेल्या एमजी झेडएस ईव्ही मध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, EBD सोबत ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि हिल डिसेंट कंट्रोल, लेन किप असिस्ट आणि डिपार्चर वॉर्निंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ट्रॅफिक जॅम असिस्ट, ऑटोनॉमस इमरजेंसी ब्रेकिंग आणि एडवान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) यांचा समावेश आहे.

वाचा: ‘स्कूटर आणि रिक्षा’ची अनोखी जोडणी, इलेक्ट्रिक सर्ज एस-32 स्कूटरची बनते रिक्षा

एमजी झेडएस ईव्ही बॅटरी

एमजी च्या ह्या कारला इलेक्ट्रिक वाहनांचा जलद चालण्यास करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बनवलं असून ह्या कारमध्ये जबदस्त बॅटरी पॅक, चांगल्या दर्जाची इलेक्ट्रिक मोटर आणि long रेंज दिल्याचा दावा एमजी कंपनीने केला आहे.  या कारमध्ये 50.3kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जी 173bhp आणि 280Nm टॉर्क जनरेट करते. इलेक्ट्रिक MG ZS ची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8.5 ते 9 तास इतका कालावधी लागतो. MG EV  एका चार्जमध्ये रेंज 461 किमी इतकी रेंज देण्याचा दावा करते.

एमजी झेडएस ईव्ही डायमेन्शन

डायमेन्शन बाबतीत माहिती घेता, या कारची 4,323 MM इतकी लांबी, 1,809 MM इतकी रुंदी आणि 1,649 MM इतकी उंची आहे शिवाय बऱ्यापैकी स्टोरेज कॅपॅसिटी या गाडीत दिली आहे. या गाडीसाठी स्टॅरी ब्लॅक, अरोरा सिल्व्हर, कलर ग्लेझ रेड आणि कँडी व्हाईट हे रंग पर्याय उपलब्ध आहेत.

वाचा: टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

एमजी झेडएस ईव्ही किंमत

इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV च्या, ओरिजनल ZS EV मध्ये कॉस्मेटिक बदल, फीचर्स मध्ये बदल हे नवे व्हेरिएंट लॉन्च झाले आहे. या गाडीच्या मूळच्या SUV ची टॉप-एंड व्हेरिएंट ची किंमत रु. 25 लाखांपेक्षा जास्त आहे. पण एमजी मोटर इंडिया शताब्दी वर्ष पार पडल्याने 2024 च्या मॉडेल्सवर नवीन तसेच आधीच स्वस्त किंमत सादर करत आहे, लोकांनी चांगल्या पर्यावरणाच्या सतर्कतेचा भाग म्हणून ईव्ही जास्त प्रमाणात खरेदी करावी या दृष्टीकोनातून या एमजी झेडएस ईव्हीची  किंमत रु. 18.98 लाख इतकी केली आहे. या गाडीची मूळ किंमत 22.88 लाख रुपये असून मूळ मूळ किंमतीमधून जवळ-जवळ 3.9 लाख रुपयांचा नफा हि कार खरेदी करणाऱ्याला होणार आहे.

एमजी झेडएस ईव्ही कार ५ कारणामुळे फायदेशीर

  1. एमजी झेडएस ईव्ही ला सेफेटी साठी 5 स्टार (युरो NCAP) रेटिंग मिळाले आहे.
  2. प्रवास करताना चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत.
  3. MG च्या सेगमेंटमधल्या इतर कार प्रमाणे आकर्षक आणि फीचर्सने भरपूर
  4. 400 किमी पेक्षा अधिक कमालीची रेंज
  5. 20 लाखाच्या आतील किंमत

 

Leave a Comment