एमजी कारवर 3.90 लाखांपर्यंत सुट, जाणून घ्या MG Motor च्या नवीन ऑफर्स

MG Motor India – Automobile company: ला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाले आहेत, आणि ह्याच शताब्दी वर्षाचा आनंद साजरा व्हावा म्हणून एमजी मोटर्स ने एमजी कॉमेट EV, एमजी हेक्टर या कारची किंमत कमी केली आहे, याच सोबत एमजीच्या ग्लोस्टर या कारची सुद्धा किंमत कमी झाली आहे, नुकतीच कंपनीने ZS EV चे नवीन एंट्री लेव्हल एक्झिक्युटिव्ह ट्रिम भेटीस आणले आहे, ज्याची किंमत 20 लाखाच्या आत आहे.  झेडएस इव्ही सोबत एमजीच्या, इतर कारच्या काही व्हेरिएंट्स 1.34 लाख किंमतीने स्वस्त झाल्या आहेत. चला जाणून घेऊया एमजी मोटार इंडिया कारच्या नव्या किंमत.

6.99 लाखात मिळणार एमजी कॉमेट EV

एमजीच्या कार नवी प्राईझ अपडेट मध्ये कॉमेट EV कार  ला नव्याने किंमत मिळाली आहे, MG कॉमेट EV मध्ये तीन ट्रिम व्हेरिएंट्स दिले आहेत; अनुक्रमे पेस, प्ले आणि प्लस. टाटा टियागो ईव्ही ची प्रतिस्पर्धी आणि एमजीच्या कार सेगमेंट मधली सर्वात स्वस्त कॉमेंट एव्हीचे एंट्री लेव्हल व्हेरिएंट 6.99 लाखांपासून सुरु होते.

या गाडीच्या किंमतीमध्ये जवळजवळ 99,000 रुपयांची सवलत मिळणार आहे, या गाडीतील पेस व्हेरिएंट ची किंमत 6.99 लाख ,प्ले व्हेरिएंट ची किंमत 7.88 लाख आणि प्लस व्हेरिएंट ची किंमत 8.58 लाख असून, या व्हेरिएंट्सवर सुद्धा 1.4 लाख किंमतीची सूट मिळत आहे.

या कार च्या महत्वाच्या सेफटी फीचरमध्ये, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिव्हर्सिंग कॅमेऱ्यासह मागील पार्किंग सेन्सर्स यांचं समावेश आहे.

वाचा: ‘बिझिनेसवाल्यांची स्कूटर’ Ola ची नवीन स्कुटर मिळणार फक्त B2B साठी, काय आहे हे B2B?

18.98 लाखात मिळणार MG ZS EV

MG Motor India ने नुकताच एमजी झेडएस ईव्ही चा entry-level प्रकार लॉन्च केला आहे, ज्याची किंमत २० लाखाच्या आत आहे, शिवाय 5 स्टार (युरो NCAP) रेटिंग मिळालेली हि कार 22.88 लाख रुपये किमतीची असून, 3.9 लाख रुपयांपर्यंत कमालीचा डिस्काउंट या कारवर मिळतोय, गाडीच्या टॉप-एंड व्हेरिएंट ची किंमत रु. 25 लाखांपेक्षा जास्त आहे पण, प्राईज कट केल्यांनतर या गाडीची किंमत 18.98 लाख इतकी झाली आहे.

एक्सक्लुझिव्ह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध असणाऱ्या,या कार मध्ये 6 एअरबॅग्ज दिल्या आहेत, 50 मिनिटात फास्ट चार्जिंग फॅसिलिटी, Lithium iron बॅटरी असणाऱ्या या कारमधून 461 Km ची रेंज मिळते.

वाचा: टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

MG हेक्टर 79,000 रुपयांनी झाली स्वस्त

या गाडीला ‘Popular car of MG’ असंही ओळखलं जात,एमजी हेक्टर मध्ये दोन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत, पेट्रोल आणि डिझेल; पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 14.94 लाख इतकी असून या व्हेरिएंट मध्ये 6000/- सूट मिळते, तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 17.50 लाख रुपये इतकी असून या व्हेरिएंट वर 79,000/-ची सूट मिळणार आहे.

मॅन्युअल आणिऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असणारी, MG हेक्टर ची प्रतिस्पर्धी टाटा harrier आहे, या गाडीमध्ये सेफटीसाठी 6 एअरबॅग दिल्या गेल्या आहेत.

वाचा: मारुतीच्या नव्या कारवर 83,000 रुपयांचा डिस्काउंट, जाणून घ्या ॲक्सेसरीज ऑफर आणि एक्सचेंज बोनसची माहिती

1.34 लाखाने स्वस्त झाली MG ग्लोस्टर

टोयाटो फॉर्च्युनर ला टक्कर देणारी, एमजीच्या ग्लोस्टरच्या किमतीमध्ये सुद्धा कमालीची कपात झाली आहे,हि कार शार्प, सॅव्ही आणि ब्लॅकस्टॉर्मसह तीन ट्रिम व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, MG Gloster ब्लॅकस्टॉर्म टर्बो डिझेल रु. 39.71 लाख किंमत आणि ब्लॅकस्टॉर्म ट्विन-टर्बो डिझेल रु 42.99 लाख किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

या कार ची मूळ किंमत 37.49 लाख (एक्स-शोरूम)असून नवीन किंमत 36.18 आहे, जी 1.31 लाखाने कमी झाली आहे. टोयोटा फॉर्च्युनरची प्रतिस्पर्धी म्हणून MG ग्लोस्टर कडे पाहिले जाते.

आधुनिक फीचरमध्ये या गाडीत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॉवर्ड फ्रंट सीट्स, पॉवर्ड टेलगेट, ड्राइव्ह मोड, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, लेन चेंज इंडिकेटर, 360 डिग्री कॅमेरा, सनरूफ यांचा समावेश आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment