मारुती फ्रॉंक्सवर 83 हजार रुपयापर्यंत डिस्काउंट, फ्री ॲक्सेसरीज आणि एक्सचेंज बोनससुद्धा जाणून घ्या सर्व माहिती

मारुती सुझुकी कारवर चालू आहेत; नव्या ऑफर्स, यामध्ये फ्रॉंक्स कार खरेदीवर आता तुम्हाला जबरदस्त असा फायदा होणार आहे, या एसयूव्ही कार वर मिळतोय तब्ब्ल 83 हजार रुपयापर्यंत डिस्काउंट, याशिवाय 43,000 रुपयांचे ॲक्सेसरीज मोफत देखील दिले जाणार आहेत. जर तुम्ही मारुती सुझुकीची फ्रॉंक्स हि 5 सीटर गाडी घ्यायचा विचार करत असाल, तर या लेखाद्वारे सुवर्णसंधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता.

मारुती सुझुकीची स्पोर्टी लुक वाली आणि सर्वात जास्त विक्री होणारी मारुती फ्रॉंक्स हि एसयूव्ही कार बाजारपेठेत Baleno Alpha MT (1.2 NA) शी चढाओढ करताना ‘नंबर वन’ या पोसिशन ला पोहोचली आहे आणि हीच पोझिशन मार्केटमध्ये टिकवून ठेवण्यासाठी, मारुती सुझुकी भेटीस आणत आहे; फ्रॉंक्स साठी नवीन टर्बो व्हेलॉसिटी एडिशन, याचसोबत देत आहे मारुती fronx वर बक्कळ डिस्काउंट.

मारुती फ्रॉंक्स टर्बो वेलोसिटी एडिशन लाँच

मारुतीच्या इतर सेगमेंट मधल्या कारच्या तुलनेत फ्रॉंक्स ला तिच्या स्पोर्टी आणि स्ट्रॉंग लुक मुळे प्राधान्य मिळत आहे. म्हणूनच Maruti Fronx चा औरा वाढवण्यासाठी मारुतीने या गाडीला व्हिज्युअल अपग्रेड देत डेल्टा+, झेटा आणि अल्फा ट्रिम्स हे नवे एडिशन लॉन्च केले. या गाडीची लोकप्रियता टिकून ठेवत, या कारमध्ये जवळजवळ 43,000 च्या वर्थ आणि आकर्षक कॉस्मेटिक ॲक्सेसरी दिल्या आहेत.

मारुती फ्रॉंक्स वर 43,000 रुपयांचे ॲक्सेसरीज मोफत

मारुती fronx टर्बो वेलोसिटी एडिशन मध्ये, आता डेल्टा+, झेटा आणि अल्फा ट्रिम्स उपलब्ध झाले आहेत, ह्या एडिशनमध्ये सर्वाधिक भर हा ‘कार ॲक्सेसरीज, इंटिरियर आणि एक्सटेरिअर’ वर देण्यात आला आहे. या एडिशनमध्ये तब्बल 43,000 रुपयांच्या एकूण 16 ॲक्सेसरीज- ऑफर मिळणार आहे.

वाचा: 500 किलो वजन वाहणारी ‘कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटर’, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरच काही

या कारच्या एक्सटीरियर ऍक्सेसरीज मध्ये हेडलॅम्प गार्निश, स्टाइलिंग किट (ग्रे + रेड), डोअर व्हिझर प्रीमियम, ओआरव्हीएम कव्हर, बॉडी साइड मोल्डिंग, रिअर बंपर पेंटेड गार्निश, इल्युमिनेटेड डोअर सिलेंडर, अप्पर स्पॉयलर एक्स्टेन्डर, फ्रंट बंपर पेंटेड गार्निश, व्हील आर्क गार्निश, फ्रंट ग्रिल गार्निश आणि मागील दरवाजा गार्निश यांचा समावेश आहे.

तर इंटीरियर ऍक्सेसरीज मध्ये कार्बन फिनिश इंटीरियर स्टाइलिंग किट आणि 3D बूट मॅट, रेड डॅश डिझायनर मॅट, नेक्सक्रॉस बोर्डो फिनिश स्लीव्ह सीट कव्हर (अल्फा/झेटा) आणि नेक्सक्रॉस ब्लॅक फिनिश सीट कव्हर (डेल्टा+) यांचा समावेश आहे.

वाचा: टाटा Nexon i-CNG ला मिळणार ‘भरपूर बूटस्पेस’, भारतातील पहिली टर्बो सीएनजी कार

फ्रॉंक्स इंजिन

या कारमध्ये 1.0-लिटर के-सिरीज टर्बो पेट्रोल इंजिन ज्याची 100.06 PS कमाल पॉवर आणि 147.6 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे ऑप्शन ह्या कारमध्ये मिळतात.

याचसोबत फ्रॉंक्स CNG हा सुद्धा ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे,ह्या कार मधलं 1.2-लिटर इंजिन 77.5 PS आणि 98.5 Nm टॉर्क जनरेट करतं. फ्रॉंक्स CNG मध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन उपलब्ध असून हि कार 28.51 (MT) km/kg मायलेज देते.

मारुती सुझुकी फ्रॉंक्स फीचर्स

या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, आटोमॅटिक हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण ,एअरबॅग्ज, 3-पॉइंट सीट बेल्ट, इलेट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट , स्टीयरिंग ऍडजस्ट – टिल्ट आणि टेलिस्कोपिक, वायरलेस चार्जर, वायरलेस Android Auto आणि Apple कार Play, ARKAMYS प्रीमियम साउंड सिस्टम, हेड -अप डिस्प्ले, फास्ट यूएसबी चार्जिंग सॉकेट्स यासारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे.

वाचा: ‘स्कूटर आणि रिक्षा’ची अनोखी जोडणी, इलेक्ट्रिक सर्ज एस-32 स्कूटरची बनते रिक्षा

फेब्रुवारी 2024 मध्ये मारुती फ्रॉंक्स ऑफर

मारुती सुझुकीच्या 2023 fronx टर्बो प्रकारावर सुद्धा 30,000 रुपये आणि 10,000 रुपये एक्सचेंज बोनस मिळत आहे, जर तुम्ही 2024 टर्बो व्हेलॉसिटी एडिशनची खरेदी केली तर, चालू असणाऱ्या ॲक्सेसरीज ऑफरसोबत तुम्हाला जवळपास 83,000 रुपये इतका फायदा होऊ शकतो.

जे लोक MY23 1.2-litre पेट्रोल इंजिन खरेदी करतील त्यांना, 10,000  रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 10,000 एक्सचेंज बोनस मिळणार आहे आणि सीएनजी खरेदीदारांना सुद्धा 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे.

मारुती fronx बेस मॉडेलची किंमत 8.85 लाख रुपये असून टॉप मॉडेलची किंमत 15.41 लाख रुपये आहे. खालील यादीत तुम्हाला मारुती फ्रॉंक्स सर्व व्हेरिएंटची Ex-Showroom किंमत मिळेल.

मारुती फ्रॉंक्स सर्व व्हेरिएंटची Ex-Showroom किंमत

 • मारुती fronx सिग्मा Fronx Sigma 1.2L MT – 7.46 लाख
 • मारुती fronx डेल्टा मॅन्युअल व्हेरिएंट – 8.32 लाख
 • मारुती fronx सिग्मा CNG मॅन्युअल व्हेरिएंट – 8.41 लाख
 • मारुती fronx डेल्टा प्लस मॅन्युअल व्हेरिएंट – 8.72 लाख
 • मारुती fronx डेल्टा ऑटोमैटिक व्हेरिएंट – 8.88 लाख
 • मारुती fronx डेल्टा CNG मॅन्युअल व्हेरिएंट – 9.28 लाख
 • मारुती fronx डेल्टा प्लस ऑटोमैटिक व्हेरिएंट – 9.28 लाख
 • मारुती fronx डेल्टा प्लस टर्बो मॅन्युअल व्हेरिएंट – 9.72 लाख
 • मारुती fronx जीटा टर्बो मॅन्युअल व्हेरिएंट – 10.55 लाख
 • मारुती fronx अल्फा टर्बो मॅन्युअल व्हेरिएंट – 11.47 लाख
 • मारुती fronx अल्फा टर्बो डीटी मॅन्युअल व्हेरिएंट – 11.63 लाख
 • मारुती fronx जीटा टर्बो डीटी ऑटोमैटिक व्हेरिएंट – 12.05 लाख
 • मारुती fronx अल्फा टर्बो ऑटोमैटिक व्हेरिएंट – 12.97 लाख
 • मारुती fronx अल्फा टर्बो डीटी ऑटोमैटिक व्हेरिएंट – 13.13 लाख

Leave a Comment