महिंद्रा इलेक्ट्रिक थार देते, 400 किमीपेक्षा जास्त रेंज

New Mahindra Electric SUV: इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रात महिंद्रा बाबत नवीन news बाहेर पडत आहे, हि न्यूज आहे महिंद्रा च्या लोकप्रिय आणि पॉपुलर थारच्या संबंधित, लवकरचं टॉप -10 एसयूव्हीं मधले महिंद्रा थारचे आपल्या सर्वाना, नवीन इलेक्ट्रिक वर्जन बघायला मिळणार आहे, ह्या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्ही ला जवळ-जवळ 400 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज मिळणार आहे. तुम्ही जर ह्या २०२४ च्या नव्या वर्षात EV Buying Guide 2024 माहितीच्या शोधात असाल; तर अपकमिंग आणि बोल्ड लुक असणारी ‘महिंद्रा इलेक्ट्रिक थार’ हा पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो.

महिंद्रा थार तपशील

महिंद्रा थार ही भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ची बहुचर्चित कॉम्पॅक्ट, फोर-व्हील ड्राइव्ह, ऑफ-रोड SUV म्हणून थार कडे पाहिलं जातं. Manual आणि Automatic हे दोन्ही पर्याय या SUV मध्ये मिळतात. पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय असणारी मंहिद्रा थार भारतीय बाजारपेठेत 9.99 लाख ते 16.49 लाख या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. थारच्या दमदार लुक आणि परफॉर्मेन्स लक्षात घेता, New Mahindra Electric SUV कडून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

महिंद्रा ऑल-इलेक्ट्रिक थार लुक आणि फीचर्स

नुकतेच केपटाऊन- दक्षिण आफ्रिका येथे महिंद्रा अँड महिंद्रा ची इलेक्ट्रिक कन्सेप्ट SUV थार ह्या आवृत्तीचं अनावरण झालं; हि इलेक्ट्रिक SUV, थार ऑफ-रोड एसयूव्ही ची कॉन्सेप्ट आहे जिला आकर्षक स्वरूप आणि highend फीचर्स मिळत आहेत. 

या एसयूव्हीच्या डॅशबोर्ड मध्ये एक प्रचंड स्क्वेअरिश टचस्क्रीन सिस्टीम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे आहे. यासोबत 3-स्पोक स्टीयरिंग व्हीलमध्ये हॅप्टिक स्विचेस मिळणार आहे. पुढच्या सीटला कनेक्टेड हेडरेस्ट तर मागील प्रवाश्यांना roof-mounted headrest या एसयूव्ही द्वारे मिळणार आहे.

गाडीच्या बाहेरील बाजूस 5-door सोबत मजबूत असं बंपर ,चौकोनी आकाराचे LED DRLs – डेटाइम रनिंग लाइट्स , तीन LED बार आणि ब्लॅक-आउट ग्रिल मध्ये कोरली गेलेली ‘Thar.e’ अक्षरांचं बॅजिंग यांचा समावेश आहेत. मागील बाजूस टेलगेट-माउंट केलेले स्पेअर व्हील, फ्लेर्ड व्हील आणि स्क्वेअर एलईडी टेल लाइट्स या ऑल-इलेक्ट्रिक थार मध्ये दिले गेले आहेत.

वाचा: Best 7 Seater Car: मोठ्या फॅमिलीसाठी चार बेस्ट 7 सीटर कार, उत्कृष्ट 26 Kmpl मायलेज कमी किंमत

INGLO-P1 EV प्लॅटफॉर्म म्हणजे काय ?

महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार थार इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘INGLO-P1 EV प्लॅटफॉर्म’ या फ्रेम बेसवर आधारित असणार आहे. INGLO प्लॅटफॉर्म मध्ये मोठमोठ्या क्षमतेच्या बॅटरी कमी वेळात पटकन चार्ज होतात. ज्यामुळे वेळेची आणि एनर्जीची बचत होते. या प्लॅटफॉर्म मध्ये 60 kWh आणि 80 kWh इतक्या क्षमतेच्या बॅटरी 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत किमान 80 टक्के पर्यंत fast charge होतात. हे महत्वाचे INGLO-P1 EV प्लॅटफॉर्म चे आर्किटेक्चर महिंद्राच्या पाच इलेक्ट्रिक SUV ला देण्यात येत आहे.

वाचा: Hero Xtreme 125R: एकदा पेट्रोल टाकले की 660 किमी चालते किंमत फक्त 95 हजार

इलेक्ट्रिक थार मेजरमेंट्स

इलेक्ट्रिक थारचा ग्राउंड क्लीयरन्स 250-300 मिमी इतका असणार आहे, शिवाय इलेक्ट्रिक कन्सेप्ट SUV चा व्हीलबेस सुमारे 2,775 मिमी ते 2,975 मिमी इतका असू शकतो.

इलेक्ट्रिक थार बॅटरी आणि range

आगामी इलेक्ट्रिक थार SUV ला 400km पेक्षा लॉन्ग रेंज देण्यासाठी या गाडीत मोठा बॅटरी पॅकचा समावेश असू शकतो. ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटअप सोबत 4-व्हील ड्राइव्हट्रेन (4WD) ज्याचे ठराविक भूप्रदेश साठी वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स असू शकतात.

वाचा: ‘बॅटरीवाली ॲक्टिव्हा’ होंडा इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग, किंमत आणि फीचर्स

महिंद्रा ऑल-इलेक्ट्रिक थार किंमत

Thar.e इलेक्ट्रिक SUV चे 2025 च्या आगमन होणार असून या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 25 लाखापासून सुरु होण्याची शक्यता मांडली जातेय.

महिंद्रा थार इलेक्ट्रिक घेण्यासाठी भाग पाडणारे 4 हायलाइट्स

  1. मोठा बॅटरी पॅक जो देतो 400 किमी पेक्षा जास्त रेंज
  2. महिंद्राने INGLO प्लॅटफॉर्म बेसवर आधारित
  3. हार्डकोर ऑफ-रोडर  राईड साठी आवश्यक फीचर्सने भरपूर
  4. आकर्षक आणि बोल्ड लुक

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment