Best 7 Seater Car: मोठ्या फॅमिलीसाठी चार बेस्ट 7 सीटर कार, उत्कृष्ट 26 Kmpl मायलेज कमी किंमत

Best 7 Seater Cars in India – मोठी फॅमिली आहे आणि 7 सीटर गाडी घ्यायची आहे पण मार्केट मध्ये जास्त पर्याय सध्या उपलब्ध नाहीत. जे पण पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा वेटींग पिरीड दीड वर्ष पर्यंत आहे  वेळेस काय करावं? हा प्रश्न तुमच्या मनात आला का? जर हो असेल तर तुमच्या साठी माझ्याकडे खूप आनंदाची बातमी आहे. या लेखात मी तुम्हाला चार, सात सीटर वाहनांची लिस्ट सांगणार आहे ज्यामध्ये कमी वेटिंग पिरियड आणि बेस्ट परफॉर्मन्स मिळतो.

1. Citroen C3 Aircross

Citroen C3 Aircross

फ्रान्स कार निर्माती Citroen ची C3 Aircross ही 7 सीटर गाडी 5 सीटर C3 चे extended असलेले हे वर्जन असेल. Aircross मध्ये 1.2 लिटर turbo चार्ज पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 109bhp आणि 190Nm टॉर्क निर्माण करेल. फीचर्समध्ये 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो,. MyCitroen Connect अॅपसह 35 स्मार्ट फीचर्स, छतावर बसवलेले रियर एसी व्हेंट्स, रिमोट कीलेस एंट्री, टिल्ट-अॅडजस्टेबल स्टीयरिंग, फ्रंट आर्मरेस्ट, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESP, हिल-होल्ड फंक्शन, TPMS आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा या सारखे फीचर्स दिले आहेत.

C3 Aircross मॅन्युअल transmission सह लाँच होणार असली तरी automatic version काही महिन्यातच उपलब्ध होईल आणि तुम्हाला कमी रनिंग कॉस्ट आणि सायलेंट केबिन पाहिजे असेल तर C3 Aircross 7 सीटर चे इलेक्ट्रिक वर्जन साठी 2024 पर्यंत थांबावे लागेल. या गाडीची किंमत 10 लाख रुपयां पासून सुरू होईल आणि टॉप मॉडेल 15 लाख रुपयांत मिळेल.

2. Mahindra Bolero Neo Plus

mahindra bolero neo plus 1

महिंद्रा स्कॉर्पिओ आणि बोलेरो यांच्या मधील दुर्लक्षित गॅप भरून काढण्यासाठी महिंद्राने बोलेरो निओ प्लस हे मॉडेल सादर केले आहे. स्कॉर्पिओ क्लासिकच्या खाली हे मॉडेल slotted असेल. बोलेरो neo प्लस खरे तर tuv 300 चे फेस्लिफ्ट असेल. neo प्लस मध्ये 7 आणि 9 सीटर चे कन्फिग्रेशन दिले आहे या सोबत 1.5 लिटर डिझेल इंजिन दिले जाणार आहे जे 100 ps पॉवर निर्माण करेल.

फीचर्स मध्ये पॉवर विंडो, 6 स्पीकर्स, क्रुझ कंट्रोल, डिफॉगर, एलेडी DRLs असे फीचर्स असतील. गाडीचे इंटेरियर neo प्रमाणेच असेल पण थोडी अपर मॉडेल असल्याने प्रीमियम टच देण्यात येईल. ही गाडी येत्या काही महिन्यात लाँच होईल आणि पुढच्या महिन्यात किमती रिविल होतील. Neo 10 ते 12 lakh रुपयांत लॉन्च होईल शक्यता आहे.

3. Tata Safari Facelift

tata safari

टाटा सफारी या गाडीत डिजाइन इतकी जबरदस्त आहे की लाँच होताच bookings चा पाऊस पडला होता. सफारी मध्ये पूर्वी प्रमाणेच 2 लिटर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 170 ps पॉवर आणि 320 nm टॉर्क निर्माण करेल. मॅन्युअल सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यामध्ये दिले जाईल.

फीचर्स मध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अँपल कार प्ले, नेक्स्ट लेवल ADAS (ऍडव्हान्स ड्राइवर असिस्टंट सिस्टिम),सीट बॉस मोड, एम्बिएन्ट लायटनिंग, टच बेस AC कंट्रोल, गोल्डन डॅशबोर्ड इन्सर्ट्सआणि सीट्स शिलाई, 2 स्पोकस्टेरिंग असे फीचर्सदिले आहेत. सफारी ची किंमत 16.50 लाख रुपयां पासून सुरू होईल.

4. Toyota Rumion

toyota rumion

टोयोटा सध्या मारुतीच्या सर्वच गाड्या री बॅच करून विकत आहे. आता कंपनी एर्टिगा ला रिबॅच करून रुमियन या नावाने विकणार आहे. ज्यांना एर्टिगा घ्यायची आहे पण जास्त वेटींग असल्याने रद्द केली, त्यांच्यासाठी टोयोटा रुमियन एक उत्तम पर्याय असेल. या गाडीमध्ये 3 व्हेरिएंट आणि पेट्रोल सह सीएनजी पर्याय दिला जाणार आहे. 1.5 लिटर 4 सिलेंडर इंजिन दिले जाईल यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध असेल. CNG मध्ये हो गाडी तब्बल 26.11 km चे मायलेज प्रदान करेल.

टेस्लाला टक्कर देत, विनफास्ट ईव्हीची भारतात एंट्री

एर्टिगा पेक्षा गाडी डिजाइन ने वेगळी असेल. पुढची ग्रिल इनोव्हा सारखी आणि व्हील डिजाइन वेगळी असेल. वॉरंटी सुधा एर्टिगा पेक्षा जास्त या गाडी मध्ये दिली जाणार आहे. गाडीची किंमत 10 लाख ते 13 लाख रुपये एक्स showroom इतकी असेल.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment