टेस्लाला टक्कर देत, विनफास्ट ईव्हीची भारतात एंट्री

Aishwarya Potdar

Updated on:

VinFast ही व्हिएतनामी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने, भारतामध्ये थुथुकुडी-तामिळनाडू येथे ईव्ही कारखाना सुरू करण्यासाठी $2 बिलियन गुंतवणुक करण्याची विचार मांडला होता, ज्यावर तमिळनाडू सरकारने या इलेक्ट्रिक वाहनाच्या प्रकल्पास होकार देत, तामिळनाडू आणि VinFast दरम्यानच्या विनफास्ट इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

विनफास्ट ईव्ही

टेस्लाच्या आधी भारतामध्ये स्थापन होणार ‘विनफास्ट ईव्ही कारखाना’

या आधी भारतामध्ये स्थापन होणाऱ्या ईव्ही बॅटरी प्लांट संबंधिच्या चर्चेत टेस्ला’ या कंपनीचे नाव होते; टेस्ला कंपनीचा गुजरातमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा मोठा कारखाना उभा करण्यात येणार आहे, पण आता भारतामध्ये tesla च्या आधी, या व्हिएतनाममधील 16 हजार कोटींची गुंतवणूक असणारी टॉप VinFast EV कंपनीच्या यूनिटने हजेरी लावून, इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीला ‘जोर का झटकाचं’ जणू दिला आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

विनफास्टच्या प्रकल्पामुळे भारतामध्ये 3,500 रोजगार संध्या उपलब्ध

श्रीमंत व्हिएतनामी कार निर्माता VinFast चा स्थापक आणि ईव्ही उत्पादक, फाम न्हाट वुओंग यांनी, ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा होणार विस्तार पाहून, तमिळनाडूमध्ये नव्या वर्षात $2 अब्ज गुंतवत ईव्ही हब बनवण्याचे आश्वासन दिले आहे, ही गुंतवणूक पुढील 5 वर्षात होणार असून, पहिल्या वर्षात $500 मिलियन इतकी गुंतवणूक होणार आहे. या नवीन प्रकल्पाद्वारे वार्षिक 150,000 इलेक्ट्रिक वाहन युनिट्सपर्यंत बनवून विक्री होईल तसेच स्थानिक पातळीवर 3,000 – 3,500 पर्यंत, लोकांना नव्या रोजगाराच्या संधीचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती करता येईल.

VinFast या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकाच्या या गुंतवणुकीच्या विचारावर तमिळनाडू सरकारने, ‘भविष्यात कार्बन उत्सर्जन कमी आणि इंटरनॅशनल लेव्हलवर संबंध चांगले होण्यासाठी फुल्ल इलेक्ट्रिसिटी, प्रोडक्ट फैसिलिटी आणि इतर काही फैसिलिटी साठी जमीन उपलब्ध करुन दिली आहे.’

वाचा: ‘नवीन फीचर्स’ मिळाले बजाज चेतक प्रीमियम मॉडेलला, 127 km रेंज देणारी बजाजची नवीन स्कुटर

विनफास्ट सीईओने नव्या प्रकल्पाची दिलेली माहिती

ट्रॅन माई होआ (विनफास्ट ग्लोबल डेप्युटी सीईओ सेल्स अँड मार्केटिंग) यांनी, या नवीन प्रकल्पाबद्दल माहिती देताना सांगितले,’ तामिळनाडूमधील तयार होणाऱ्या या नव्या VinFast EV प्रोजेक्ट मुळे संपूर्ण भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिक प्राधान्य मिळेल, भारत ग्रीन ट्रान्सपोर्टेशन डेव्हलपमेंट कडे वळेल.

विनफास्ट ‘या’ प्रकारच्या EVs ऑफर करते

विनफास्टने भारतसोबत इंडोनेशिया आणि कॅरोलिनामध्ये प्लांट्स उभारण्याची घोषणा केली आहे; आत्तापर्यंत विनफास्ट कंपनीने, VF3 आणि VF4 ही लहान इलेक्ट्रिक वाहने तर VF7 आणि VF9 मोठ्या इलेक्ट्रिक एसयूव्ही; या गाड्यांमध्ये काही सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही तर काही कॉम्पॅक्ट SUV बनवल्या आहेत. VinFast EV मॉडेल्स मधून VF8 ही कार मध्यम आकाराची SUV आहे.

वाचा:Tata Punch EV: फक्त २१ हजारांत करा बुक, कलर्स आणि व्हेरिएंट्स तपशील लॉन्चपूर्वी उघड

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मी कोल्हापुरी मुलगी असून नागपूर येथून हॉटेल मॅनेजमेंट डिग्री पूर्ण केली आहे. मला ऑटोमोबाईल क्षेत्राची आवड असून त्याबद्दल लिहायला आवडते.

Leave a Comment