Tata Punch EV: फक्त २१ हजारांत करा बुक, कलर्स आणि व्हेरिएंट्स तपशील लॉन्चपूर्वी उघड

Ajinkya Sidwadkar

Updated on:

Tata Punch EV ची Booking सुरु झाली असून images आणि brochure ऑफिसशीयली रिव्हिल झाले आहे. आजच्या या लेखात जाणून घेऊया गाडीची एक्सपेक्टड प्राईज, लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल.

ठळक मुद्दे – 

 • फक्त २१ हजारांत बुक करता येणार एइलेक्ट्रिक पंच
 • act.ev प्लॅटफॉर्म वर तयार होणारी पहिली ईव्ही
 • दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये मिळू शकते

Tata Punch EV: किंमत, बुकिंग आणि लाँच तारीख

टाटा पंच हि भारतातील मोस्ट अवेटेड इलेकट्रीक कार असून हि गाडी सिट्रिऑन eC3 या गाडीला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. एसयूव्ही स्टान्स, छोटी साईज आणि सेफटी ची हमी या मुले या गाडीला भारतातील सर्वात लोकप्रिय ई-वाहनाचा दर्जा मिळेल अशी अपेक्षा आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

टाटा पंच या  B-SUV ला ५ जानेवारी २०२४ रोजी कंपनीने रिव्हिल करत बुकिंगची टोकन अमाऊंट आणि ब्रोशर जाहीर केले. ग्राहक फक्त २१ हजार रुपये देऊन हि गाडी जवळच्या शोरूमला जाऊन बुक करू शकता. या गाडीची किंमत येत्या २ आठवड्यात जाहीर केली जाणार असून त्याच वेळेस गाडीचे सर्व फीचर्स सार्वजनिक केले जातील अशी अपेक्षा आहे, टाटा मोटर्स ने लाँच च्या आधी गाडीमध्ये मिळणाऱ्या कलर्स ऑपशन्स आणि व्हेरिएंट्स ची माहितीचा खुलासा केला आहे. मिळालेल्या स्रोताच्या माहिती नुसार टाटा पंच इलेकट्रीक ची सुरवाती मॉडेल ची किंमत १२ लाखां पासून सुरु होईल आणि १२ जानेवारी २०२४ रोजी भारतात सर्वत्र लाँच होण्याची अपेक्षा आहे.

वाचा – Ather 450 Apex Launch: ब्रेक न दाबता थांबते हि ई-स्कूटर,

पंच इलेकट्रीक टाटा मोटर्स ची पहिली act.ev प्लॅटफॉर्म  तयार झालेली गाडी असेल. act.ev प्लॅटफॉर्म  हा प्लॅटफॉर्म टाटा ने फक्त इलेकट्रीक वाहन तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे ज्यामुळे उत्तम रेंज इफिशिअन्सी मिळणार आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स – 

रंगांच्या बाबतीत, टाटा पंच EV पाच पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, म्हणजे एम्पॉर्ड ऑक्साइड ड्युअल-टोन, सीडवुड ड्युअल-टोन, निडर रेड ड्युअल-टोन, डेटोना ग्रे ड्युअल-टोन आणि प्रिस्टाइन व्हाइट ड्युअल-टोन. स्मार्ट, स्मार्ट+, ऍडव्हेंचर, एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर्ड+ या पाच प्रकारांमधून ग्राहक निवडू शकतील.

पावरट्रेन साठी, पंच इव्ही मध्ये दोन बॅटरी पॅक दिले असतील ज्यामध्ये २५ kwh बॅटरी पर्याय असेल ज्यामध्ये मिडीयम रेंज मिळेल आणि दुसरा बॅटरी पर्याय असेल ३५ kwh चा ज्यामध्ये लॉन्ग रेंज मिळेल.

पंच इव्ही मध्ये टोटल ४ व्हेरिएंट्स चा खुलासा टाटा मोटर्स ऑफिशिअल्स ने केला आहे यामध्ये बेस मॉडेल असेल ‘स्मार्ट’ आणि टॉप मॉडेल असेल ‘इम्पॉवेर्ड प्लस’. गाडीमध्ये सनरूफचा देखील ऑपशन दिला गेला आहे. प्रत्येक व्हेरिएंट मध्ये मिळणारे फीचर्स पुढील प्रमाणे –

Smart चे फीचर्स

स्मार्ट हे बेस मॉडेल असणार आहे ज्यामध्ये एलईडी हेडलॅम्प, स्मार्ट डिजिटल डीआरएल्स, मानती मोड रिजन, ६ ऐरबॅग्स स्टॅंडर्ड आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम हे फीचर्स दिले जाणार आहेत.

 •  LED Headlamps
 • Smart Digital DRLs
 • Multi-mode Regen
 • ESP
 • 6 Airbags

Adventure चे फीचर्स

ऍडव्हेंचर हि ट्रिम थोडी ऍडव्हान्स फिचर ने सुसज्ज असणार आहे ज्यामध्ये Smart चे फीचर्स सुद्धा ऍड केले गेले असती स्मार्ट पेक्षा या गाडीत ऍडिशनल क्रूज कंट्रोल, मोठा इंफोटेंमेंट डिस्प्ले, ऑटोहोल्ड, सनरूफ असे ऑपशन्स दिले असतील.

 • Cruise Control
 • Front Fog Lamps with Cornering
 • 17.78 cm Infotainment by HARMAN™
 • Android Auto™ & Apple CarPlay™
 • EPB with Autohold (Only Long Range)
 • Jeweled Control Knob (Only Long Range)
 • Sunroof Option Available

Empowered चे फीचर्स

एम्पॉवर्ड या ट्रिम मध्ये ऍडव्हेंचरचे सर्व फीचर्स दिले जातील सोबत ऍडिशनल R16 चे डायमंड कट आलोयज दिलेले आहेत, एअर प्युरिफायर, १० इंच इंफोटेंमेंट डिस्प्ले, ड्युअल टोन कलर ऑपशन्स दिले जातील.

 • R16 Diamond Cut Alloy Wheels
 • Air Purifier with AQI Display
 • Auto Fold ORVM
 • 17.78 cm Digital Cockpit
 • SOS Function ###
 • 26.03 cm HD Infotainment by HARMAN™
 • Sunroof Option Available
 • Dual Tone Body Color

Empowered+ चे फीचर्स

एम्पॉवर्ड प्लस हे टॉप मॉडेल असून यामध्ये प्रीमियम कन्विनिएंट फीचर्स ऍड केले जाणार आहेत. या ट्रिम मध्ये एम्पॉवर्ड ट्रिम चे फीचर्स त्या सह लेदर सीट, ३६० डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स, Arcade.ev सूट असे फीचर्स दिले जातील.

 • Leatherette Seats
 • 360º Camera Surround View System
 • Blind Spot View Monitor
 • Ventilated Front Seats
 • Arcade.ev~ -App Suite
 • Wireless Smart Phone Charger
 • 26.03 cm Digital Cockpit

2024 पंच ईवी के तीन वेरिएंट मध्ये ऑपशनल  इलेक्ट्रिक सनरूफ आणि दो बॅटरी ऑपशन्स दिले जातील यामध्ये Punch.ev MR आणि punch.ev LR. बॅटरी चार्जिंग साठी कंपनीने २ चार्जर उपलब्ध केले आहेत – 3.3kW वॉल बॉक्स स्टॅंडर्ड चार्जर आणि 7.2kW फास्ट होम चार्जर. दोन्ही व्हेरिएंट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतात पण होम फास्ट चार्जर हा फक्त लॉन्ग रेंज मॉडेल साठी उपलब्ध असेल. आगामी गाडीच्या रिव्हिव पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

Tata Punch EV Brochure Download

तुम्हाला टाटा पंच ईव्ही चे ऑफिशिअल ब्रोशर डाउनलोड करायचे असल्यास या लिंक वर जा – डाउनलोड करा

पंच इव्हीचा विडिओ पहा – 

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment