MG ची कन्वर्टेबल कॉमेट पाहिली का? बघा ह्या कन्वर्टेबल ईव्हीचा फर्स्ट लूक, किंमत आणि सर्व काही

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एमजी कॉमेट ही अशी एकमेव गाडी आहे, ‘जी कॉम्पॅक्ट, लॉन्ग रेंज, कम्फर्ट स्पेस आणि छोट्या छोट्या गल्ली-बोळातून सुद्धा आरामात निघेल’ या सर्व गरजा पूर्ण करते. बऱ्याच जणांना ह्या गाडीचं विशेष आकर्षण आहे, पण काहीच्या नावडीच्या ईव्ही लिस्टमध्ये हीच नाव आहे. पण आता मात्र या गाडीचा नवीन लुक बघून जी लोक या गाडीचा तिरस्कार करत होते किंवा नावडती ईव्ही म्हणत होते, ते लोक पण वळून-वळून या गाडीला बघतील अशी काहीशी परिस्थिती झालेली आहे. कारण या गाडीला नवीन रूप मिळालेल आहे; जे तुम्हाला या इलेक्ट्रिक ईव्हीकडे वळून-वळून तेसुद्धा बारकाईने बघायला भाग पाडतं.

नक्की असा कोणता बदल या एमजी कॉमेटमध्ये घडलेला आहे, ज्यामुळे एमजी कॉमेट ईव्ही सध्या चर्चेचा विषय बनते शिवाय या गाडीमध्ये कोणते आधुनिक फीचर्स दिले गेलेले आहेत, याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर सदर लेख वाचा.

MG ची कन्वर्टेबल कॉमेट ईव्ही

एमजीच्या ह्या नवीन इलेक्ट्रिक एमजी कॉमेट ईव्हीला कन्वर्टेबल ईव्ही किंवा हॅचबॅक असं नावाजले जाते, सोशल मीडियावर या एमजी कॉमेट ईव्हीचा धुमाकूळ माजत आहे. ही एक मिनी इलेक्ट्रिक कन्व्हर्टेबल ईव्ही आहे. जी केवळ एका चार्ज मध्ये 150 पेक्षा जास्त किलोमीटरचा पल्ला गाठते या इलेक्ट्रिक ईव्ही मध्ये 20 किलोवॅट ते 25 किलोवॅटचा बॅटरी पॅक दिलेला आहे. ही ईव्ही भारतामध्ये साधारण 8 ते 15 लाख रुपयांमध्ये विकली जाईल अशी शक्यता मांडली जाते.

वाचा: २० रुपयात फिरा १०० किलोमीटर, क्वांटम एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर १० हजाराचा डिस्काउंटसुद्धा

वाचा: ओला इलेक्ट्रिक स्कूटर देतेय प्रत्येकाला लाखो कमवण्याची संधी

एमजी कॉमेट लेटेस्ट अपडेट

या इलेक्ट्रिक ईव्ही मध्ये काही नव्याने म्हणजे लेटेस्ट अपडेट करण्यात आलेले आहेत, ज्यापैकी सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे या गाडीला चार्ज होण्याचा कालावधी कमी केलेला आहे. याआधी एमजी कॉमेट 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 6.30 मिनिटे अथवा 7 तास लागायचे; पण आता नवीन अपडेटमार्फत ही ईव्ही केवळ 3 तासांमध्ये चार्ज होणार आहे शिवाय या गाडीची किंमत तब्बल दीड लाखाने कमी झाल्याने ही ईव्ही अजूनच किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे. 4 सीटर एमजी कॉमेटच्या फीचर्स बाबतीत माहिती घेता, या कारमध्ये EBD, ABS, ऑटो लॉक फंक्शन, रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्स यांचा समावेश आहे.

एमजी कॉमेट फीचर्स

या गाडीत एडवांस्ड फीचर्स सुद्धा समावेश आहे. एमजी कॉमेटच्या या प्रसिद्धीचे कारण आहे, हिची कॉम्पॅक्ट रचना आणि आता चर्चा रंगत आहेत; त्या म्हणजे एमजी कॉमेटच्या हॅचबॅकमुळे, तुम्ही जर हटके नवीन लुक असणाऱ्या बजेटमध्ये मिळणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कारच्या शोधात असाल, तर एमजी कॉमेट ईव्ही हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हाला जर ही कार बुक करायची असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एमजी शोरूमला भेट देऊन या कारची अधिक चौकशी करू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment