२० रुपयात फिरा १०० किलोमीटर, क्वांटम एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर १० हजाराचा डिस्काउंटसुद्धा

Aishwarya Potdar

जर तुम्ही बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधत असाल, तर क्वांटम एनर्जी हा तुमच्यासाठी बजेटफ्रेंड्ली आणि उत्तम पर्याय ठरू शकतो, कारण क्वांटम एनर्जीच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर डिस्काउंट मिळत आहे, १०० किमी पेक्षा जास्त किलोमीटरची रेंज देणाऱ्या ह्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीमध्ये १०% ने घट झाली आहे, या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचे फिचर्स, वैशिष्ट्ये आणि डिस्काउंट किंमत जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरची रेड घेवून बुकुंग जरी करायच असेल, तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

Quantum Energy electric scooter

भारतीय स्टार्टअप क्वांटम एनर्जीच्या इलेक्ट्रिक स्कूटर दमदार बॅटरीमुळे लोंग रेंज देणाऱ्या स्कूटर्स म्हणून ओळखल्या जातात, शिवाय याच कंपनीच्या काही स्कूटर्स B२B म्हणजे केवळ व्यावसायिक वापरासाठीचा बनवल्या आहेत, ज्यांना १३० किमी ची रेंज मिळते. ह्या स्कुटर बिझिनेस वापरासाठी म्हणजे कमर्शिअल डिलिव्हरी वापरासाठी बनवली असल्याने जाड वस्तू वाहण्यासाठी या स्कुटरला रॅक सुद्धा मिळत.

क्वांटम एनर्जीच्या या दोन स्कूटर १० हजाराने स्वस्त

या कंपनीच्या दोन मॉडेल्स क्वांटम प्लाझ्मा X आणि XR या इलेक्ट्रिक स्कूटरवर कंपनी मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे. हि ऑफर केवळ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. क्वांटम प्लाझ्मा X ची मूळ किंमत १.२ लाख रुपये आहे तर क्वांटम प्लाझ्मा XR ची मूळ किंमत १ लाख रुपये आहे. प्लाझ्मा एक्सच्या मूळ किंमतीवर सवलत मिळाल्यावर या स्कुटरची किंमत १०९,००० रुपये तर प्लाझ्मा एक्सआरची किंमत ८९,००० रुपये इतकी होणार आहे.

वाचा: गर्लफ्रेंडसोबत फिरणं झालं एकदम स्वस्त Hero Vida V1 Plus मिळतोय २८,००० डिस्काउंट

वाचा: जगातील पहिली सीएनजी बाईक, बजाज पल्सरबद्दल जाणून घ्या सर्व माहिती

क्वांटम प्लाझ्मा फीचर्स आणि बॅटरी

क्वांटम प्लाझ्मामध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर लोंग रेंजसाठी प्रसिद्ध आहे,ही रंग रेंज मिळण्यासाठी या स्कूटरमध्ये ६०V ची लिथियम आयन बॅटेरी आणि १५००W मोटर दिली गेली आहे. या मोटारच्या मदतीने ही स्कूटर ६० किमी हाईस्पीडने चळवळी तर आरामात १०० किमीची रेंज देते. ही स्कूटर चावीची अजिबात गरज पडत नाही अर्थात हिची सवारी करण्यासाठी किलेस स्टार्ट करुन राईड अनुभवू शकता. राईड घेताना तुम्हाला स्पीड बदलण्यासाठी इको मोड आणि राईड मोड या दोन मोडचा वापर करू शकता.

या दोन्ही स्कुटर्स अद्यावत फीचर्सने भरपूर आहेत, LED लाईट हेडलाईट- टेललाइट-टर्नसिग्नल लैंप सेटअप स्कुटरच्या पुढे आणि मागे मिळतो, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्ट्रर, ब्लूटूथ काँनेक्टिव्हिटी हा पर्यायसुद्धा तुम्हाला या स्कुटरमध्ये मिळतो, USB चार्जिंग सुविधा, नॅविगेशन असिस्ट सोबत ५००० किमी किंवा ५ वर्षाची वॉरंटी या स्कूटरसोबत मिळते. या स्कूटरमध्ये रेड,ग्रे आणि व्हाईट रंग उपलब्ध आहेत.

क्वांटम प्लाझ्माची स्कुटर खरेदी करा या सोप्या ऑनलाइन पध्दतीने

TVS iQube (१.११ लाख), बजाज चेतक (१.२० लाख) या इलेक्ट्रिक स्कूटरला तोडीस तोड देणाऱ्या या क्वांटम प्लाझ्मा स्कूटर्सवर ही सुट ह्या महिन्यात मिळत असल्याने तुम्ही लवकरात लवकर या स्कूटरची राईड घेउन बुकिंग करू शकता.

आता तुम्हाला या स्कूटरला खरेदी करण्यासाठी किंवा राईड बुक करण्यासाठी थेट शोरूममध्ये जायची गरज नाहीये केवळ तुम्ही एका क्लिकवर याची माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला क्वांटम एनर्जीच्या मेन वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन राईड टेस्ट शेड्युअल करू शकता, किंवा ऑनलाइन या स्कूटरचे बुकिंग करू शकता. तुम्ही ऑफलाइन पध्दतीने म्हणजे तुमच्या जवळच्या क्वांटम एनर्जी शोरूमला भेट देऊन ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment