गर्लफ्रेंडसोबत फिरणं झालं एकदम स्वस्त Hero Vida V1 Plus मिळतोय २८,००० डिस्काउंट

तुम्हाला जर बजेटमध्ये, चांगली रेंज देणारी आणि एडवांस्ड फिचर्सने भरपूर असणारी स्कूटर घ्यायची असेल Hero Vida V1 Plus जिला कमालीचा 100km रेंज मिळते आणि परफॉर्मन्सने तर उत्तमच आहे, ह्या इलेक्ट्रिक स्कुटरचा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. ह्या इलेक्ट्रिक स्कुटरसोबत तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत परवडणारी लाँग राईड अनुभवू शकता, तुम्हाला जर या Vida V1 Plus बाबतीत माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लेख संपूर्ण वाचा आणि हि इलेक्ट्रिक स्कुटर तुम्हाला आवडली असेल, ह्या स्कुटरचं बुकिंग करायचं असेल,तर त्याचीसुद्धा सोप्पी पद्धत खाली दिली आहे.

Vida V1 Plus संपूर्ण माहिती

तुम्हाला हिरो मोटरकॉर्पची विदा व्ही वन हि इलेक्ट्रिक स्कुटर माहितीच असेल, ह्या प्रीमिअर स्कुटरचं सादरीकरण २०२३ मध्ये झालं होतं. Vida V1 Proचा बजेट-फ्रेंडली प्रकार म्हणजे Vida V1 Plus हा आहे. हिरोने याआधी Vida V1 Plus ची Vida V1 Pro सोबत विक्री चालू केली होती, पण थोड्या कालावधींनंतर V1 Plus मॉडेल बंद करण्यात आलं होत, पण इलेक्ट्रिक स्कुटरचा वाढता प्रसार पाहता या स्कुटरला हिरो मोटरकॉर्पने रिलाँच केलं, तेसुद्धा किफायतशीर किंमतीमध्ये.

Vida V1 Plus बॅटरी आणि फीचर्स माहिती

एका चार्जमध्ये १०० किमी धावेल, अशी ३.४४ kWh बॅटरी या स्कुटरमध्ये मिळते, स्कुटरमध्ये दोन लिथियम आयन बॅटरी पॅक उपलब्ध आहेत, या दोन्ही बॅटरी पॅक रिमोव्हेबल म्हणजेच काढघालीच्या आहेत, शिवाय यातील मोटर ६ kW असून २५ Nm इतका टॉर्क जनरेट करतात. या स्कुटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी ५ तास २० मिनिटे इतका वेळ लागतो. तीन रायडींग मोड्स इको, स्पोर्ट आणि राईड यात उपलब्ध आहेत, ह्या स्कुटरच्या बॅटरीला ३०,००० किमी किंवा ३ वर्ष इतकी वॉरेंटी मिळते, पोर्टेबल होमी चार्जर सुद्धा स्कुटरच्या खरेदीवेळी स्कुटरसोबत मिळतो.

वाचा: एथर एनर्जीची बॅटरी फेकली 40 फुटावरून, पाहा पुढं काय झालं?

V1 Plus चा ब्रेक दाबल्यावर बॅटरी होणार आपोआप चार्ज

ह्या स्कुटरला नवीन फिचर मिळालेलं आहे ज्याला ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम’ म्हणून ओळखलं जात, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे चालक जेव्हा-जेव्हा ब्रेकचा वापर करेल, तेव्हा-तेव्हा स्कुटरने वापरलेली एनर्जी पुन्हा मिळते. थोडक्यात ब्रेक वापरताना बॅटरी आपोआप चार्ज होते.

Vida V1 Plus च्या फीचर्समध्ये रिमोट स्टार्ट, पुश स्टार्ट बटन, अँटी थेफ्ट अलार्म, नेव्हिगेशन असिस्ट, ७ इंच TFT डॅश ऑटो डार्क-लाईट मोड, क्रूझ कंट्रोल , किलेस एंट्री, जियो  फेन्सिंग, चार्जिंग स्टेशन लोकेटर , कॉल मेसेज अलर्ट आणि लो बॅटरी अलर्ट यांचा समावेश आहे. अडवान्सड फीचर्समध्ये LED टेल-लाईट, डिजिटल स्पीडोमीटर, ट्रीपमीटर आणि ओडोमीटर, मोबाईल ब्लूटूथ कनेक्टिविटी- वायफाय कनेक्टिविटी यांचा समावेश आहे.

नव्याने समाविष्ट केलेल्या वैशिष्ठ्यांमध्ये बॅटरी वॉरेंटी, पोर्टेबल होमी चार्जर, रोड साईड असिस्ट आणि मोबाईल अँप्लिकेशन यांचा समावेश आहे. हि इलेक्ट्रिक स्कुटर ३ रंगामध्ये उपलब्ध आहे; मॅट अब्राक्स ऑरेंज, मॅट स्पोर्ट्स रेड आणि मॅट पर्ल व्हाईट.

V1 Plus किंमत आणि बुकिंग प्रक्रिया

या इलेक्ट्रिक स्कुटरची तुलना १.१५ लाख किंमतीच्या बजाज चेतक अर्बनशी केली जाऊ शकते, Vida V1 Pro च्या तुलनेत १०० किमी समान फीचर्स आणि लुकच्या दृष्टीकोनातून V1 Pro सारखेच फील मिळणारी हि Vida V1 Plus आहे. या V1 Plus ची किंमत फ्रेमसोबत १.१५ लाख इतकी असून V1 Pro पेक्षा V1 Plus हे स्वस्त मॉडेल आहे. तुम्हालासुद्धा या इलेक्ट्रिक स्कुटरचे बुकिंग करायचे असेल तर त्वरित तुमच्या जवळच्या डिलरकडे जाऊन या स्कुटरची अधिक माहिती घेऊन बुकिंग करू शकता, अथवाहिरो मोटरकॉर्पच्या उफिशिअल वेबसाइटवरून अधिक माहिती मिळवू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment