एथर एनर्जीची बॅटरी फेकली 40 फुटावरून, पाहा पुढं काय झालं?

Aishwarya Potdar

Updated on:

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना सर्वात पहिल्यांदा विचार बॅटेरीचा येतो, बरेच जण बॅटेरीच्या भीतीमुळेच इलेक्ट्रिक स्कूटर विकत घ्यायला कचरत असतात म्हणून या प्रश्नावर एथर एनर्जीने एक दणकट बॅटेरीचा कायमचा उपाय काढला आहे. एथर एनर्जीने त्यांच्या ऑफिशियल पेजवर एक व्हिडीओ जाहीर करुन माहिती दिली की, या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना एक विशिष्ठ प्रकारची मजबूत-दणकट बॅटरी मिळणार आहे, ही बॅटरी तुम्ही ड्राइव करत असताना येणारे गतिरोधक, दगडे आणि खडबडीचा रस्ता सर्वांचा सामना करणार आहे, शिवाय या बॅटेरीला टेस्टिंग दरम्यान तब्बल 40 फुटावरून फेकण्यात आलं, पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.

वाचा: टीवीएसचा सर्वात मोठा सेल, इलेक्ट्रीक स्कूटरच्या खरेदीवर 41,000 रुपयांचे फायदे, जाणून घ्या फिचर्स, सबसीडी आणि सर्व माहिती

एथर एनर्जीची बॅटरी फेकली 40 फुटावरून,मग काय झालं?

एथरच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड गाजतोय, व्हिडिओमध्ये एथरच्या बॅटेरीला सॉलिड सांगण्यात येत, ही बॅटेरी हाई-प्रेशर डाय-कास्ट अल्युमिनियम एनर्जीच्या असून रोडवरचे सर्व प्रकारचे बॅरियर्स म्हणजे संकटे-अडथळे टाळायला मदत करते, याची टेस्ट करण्यासाठी या बॅटेरीला 40 फुटावरून फेकण्यात आलं, ज्याचा या बॅटरीवर किंचितसुद्धा परिणाम जाणवला नाहीये. 40 फुटावरून बॅटेरी फेकण्याची कृती ही रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताच्या बरोबरीला असून या परिस्थितीमध्ये सुद्धा बॅटेरीला अजिबात धक्का लागला नाही, ज्यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटरची मजबुती आणि घट्ट बांधणी लक्षात येते, आणि ही सर्वात सुरक्षित बॅटेरी एथरच्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटर रिझाटा मध्ये देण्यात येत आहे.

रिझटामध्ये पण मिळतेय हीचं रॉक सॉलिड बॅटेरी

एथरच्या नव्या स्कूटर रिझाटामध्ये हीचं  रॉक सॉलिड बॅटेरी देण्यात येत आहे, जी कमालीची स्ट्राँग आहे, शिवाय ह्या स्कूटरमध्ये कमालीचे अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. 1.40 लाख इतक्या किंमतीच्या ह्या स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिवीटी ,अनेक रायडिंग मॉड्स, जलद चार्जिंग आणि लोंग रेंज यासारखे अनेक फिचर्स देण्यात गेले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सीटिंग व्यवस्थासुद्धा जबरदस्त आणि प्रशस्त देण्यात आली आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment