जगातील पहिली सीएनजी बाईक, बजाज पल्सरबद्दल जाणून घ्या सर्व माहिती

Bajaj ची पहिली सीएनजी स्कूटर लवकरचं भारतात लाँच होत आहे. ह्या स्कूटरचं नाव बजाज पल्सर सीएनजी असून ही बजाज ऑटो सीएनजी स्कूटर 2024 च्या एप्रिल जून दरम्यान लाँच होत आहे. आधी ही स्कूटर 2025 च्या दरम्यान लाँच होणार होती पण आता बजाजने नव्याने या स्कूटरला अपडेट देत ही स्कूटर दिलेल्या तारिखेच्या आतच लाँच करण्याची बातमी जाहीर केली आहे.

आत्तापर्यंत आपण सर्वांनी इंधनाने चालणाऱ्या स्कूटर्स किंवा इलेक्ट्रिक स्कूटर्स पहिल्या वापरल्या असतील, पण जगात पहिल्यांदाच बजाज त्यांची सीएनजी स्कूटर घेवून वाहन क्षेत्रात उतरत आहे. बजाजची ही सीएनजी स्कूटरच्या या व्हेरिएंट बाईकची माहितीत काही महत्त्वाचे इंजिन अपडेट्स बाहेर पडले आहेत, ज्यामध्ये ही बाईक 100cc ते 160cc ची असण्याची शक्यता मांडली जातेय. ही स्कूटर वापरण्यात आल्यावर 50- 60 टक्के इंधन खर्च कमी होऊ शकतो, अशी शक्यता मांडली जातेय.

वाचा : ओला इलेक्ट्रिक स्कूटर देतेय प्रत्येकाला लाखो कमवण्याची संधी

वाचा : ‘तासाला ५’ गाड्यांची विक्री होते टोयोटाच्या या स्वस्त गाडीची, एका लिटरमध्ये 20 पेक्षा जास्त मायलेज

वाचा : टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

जगातील पहिली सीएनजी बाईक

आजकाल इंधनाच्या वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने जास्त विकली जात असल्याने ‘सीएनजी बाइक्स-सीएनजी दुचाकी’ हा प्लॅटफॉर्म जगभरात संपूर्ण नवा असणार आहे. अश्या परिस्थितमध्ये बजाजने सीएनजी मोटारसायकल हा नव्याने घातलेला पायंडा बजाजसाठी प्रचंड फायदेशीर ठरू शकतो. ही बाईक येत्या सहा महिन्यात लाँच होणार आहे. या सीएनजी बाईकचा होणार वापर बघता, साधारण वार्षिक 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त सीएनजी दुचाकी बनवेल अशी शक्यता मांडली जाते.

सीएनजी बाईकमुळे कार्बन उत्सर्जनात घट

सीएनजीच्या वापरामुळे जागतिक पर्यावरण सुधारण्यास खूप मदत झाली आहे, इंधन वाहनाच्या तुलनेत सीएनजी वाहनांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साइड जवळजवळ 50 टक्के कमी तयार होतो. त्यामुळेच बजाजने स्वतःही पहिली-वहिली दुचाकी सीएनजी बनवून वाहनबाजारपेठेत स्वतःची नवीन जागा तयार केली आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment