‘तासाला ५’ गाड्यांची विक्री होते टोयोटाच्या या स्वस्त गाडीची, एका लिटरमध्ये 20 पेक्षा जास्त मायलेज

टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) च्या इनोव्हा हायक्रॉसने टोयाटोच्या इतिहासात एक नवीन टप्पा गाठला आहे. हा नवीन टप्पा आहे; कंपनीच्या या लोकप्रिय MPV ने 50 हजार युनिट्सचा विक्रीचा. ही कार इतकी लोकप्रिय असण्याचं कारण आहे, या गाडीमध्ये असणारी भरपूर स्पेस, गाडीमध्ये दिलेले कमालीचे फिचर्स आणि स्वस्तात मस्त किंमत. तुम्हाला जर या इंडियामध्ये विकली जाणारी टॉप कार बद्दल माहिती घ्यायची असेल तर सदर लेख संपूर्ण वाचा.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची सर्वाधिक विक्री होण्याचे कारण

टोयोटाने भारतीय बाजारपेठेत २०२२ मध्ये सर्वात स्वस्त ७ सीटर कार लॉन्च केली होती जी अगदी मारुती सुझुकीच्या Maruti Ertigaशी मिळतीजुळती आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या दर तासाला पाच कार विकल्या जातात, या कारच्या लोकप्रियतेमागे अनेक कारण आहे, इनोव्हा हायक्रॉस नवीनतम टीएनजीए प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जे पारंपारिक लैडर-ऑन-फ्रेम बांधकामाऐवजी एमपीव्हीमध्ये मोनोकोक बॉडी मिळत आहे. सोबत हायक्रॉसच्या इंटीरियर फिचर्समध्ये सेगमेंट-फर्स्ट पॅडल शिफ्टर्स, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पुढच्या आणि मागच्या सीट साठी ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि एलईडी डीआरएलचा समावेश आहे.

वाचा: ‘अंत’ जवळ आलाय यामाहा R1 आणि R1M चा, जाणून घ्या काय आहे कारण

इनोव्हा हायक्रॉस प्रीमियम फिचर्स

इनोव्हांच्या तुलनेत इनोव्हा हायक्रॉसमध्ये प्रीमियम फिचर्स दिले गेले आहेत, ज्यामध्ये थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, 10-इंचाची टचस्क्रीन सिस्टिम, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, गियर शिफ्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले तर सेफ्टी किटमध्ये सहा एअरबॅग्ज, एक 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स ,ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि अडवान्सड  ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) यांचा समावेश आहे.

वाचा: ‘नाद करा पण टाटाचा कुठं’ ,नेक्सॉनने क्रॅश टेस्टिंगमध्ये सर्वांचा टाकलं मागे

इनोव्हा हायक्रॉसचे इंजिन

इनोव्हा हायक्रॉस दोन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे; एक प्युअर पेट्रोल इंजिन आणि दुसरं पेट्रोल-हायब्रीड सिस्टीम . ही दोन्ही इंजिने CVT ला जोडलेली असून 1987 cc चे आहेत. 2.0-लिटर पेट्रोल इंजिन 172bhp आणि 197Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल -ऑटोमॅटिक इंजिन (CVT) चे मायलेज 16.13km प्रति लिटर असून, हायब्रिड (इलेक्ट्रिक + पेट्रोल) – ऑटोमॅटिक (ई-सीव्हीटी) चे मायलेज 23.24km प्रति लिटर आहे.

वाचा: टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस किंमत

इनोव्हा हायक्रॉस ही कार ब्लॅकिश अगेहा ग्लास फ्लेक, प्लॅटिनम पांढरा मोती, स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल चमक, सिल्वर मेटलिक, अवंत-गार्डे ब्राँझ मेटलिक, एट्टीट्यूड ब्लैक मिक आणि सूपर व्हाइट या रंगातून उपलब्ध आहे. या कारच्या बुकिंग नंतर डिलिव्हरीसाठी किमान सहा महिने पवेटिंग पिरियडसाठी थांबावे लागते.

महिंद्रा XUV 700, टाटा सफारी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि महिंद्रा स्कॉर्पिओ एन या गाड्यांशी टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची टक्कर होऊ शकते.याच्या बेस मॉडेलची किंमत 23.75 लाख रुपये तर टॉप मॉडेलची किंमत 37.01 लाख रुपये आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment