‘नाद करा पण टाटाचा कुठं’ ,नेक्सॉनने क्रॅश टेस्टिंगमध्ये सर्वांचा टाकलं मागे

Tata Motors च्या सेफ्टीला कुठेच तोड नाही हे वाक्य अर्थपूर्ण आहे असं टाटाने दाखवून दिले, कारण Nexon फेसलिफ्टला ग्लोबस न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (GNCAP) मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टाटासाठी हि अभिमनाची आणि कौतुकाची बाब आहे, आणि यामुळे टाटाच्या विक्रीवर कमालीचा फायदा होऊ शकणार आहे. अडल्ट आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये जबरदस्त परफॉर्मेंस या सेफ्टी दरम्यान दिसून आला आहे. चला जाणून घेऊया नवीन नेक्सॉन फीचर्स, सेफ्टी फीचर्स, परफॉर्मेंस बद्दल सर्व माहिती

टाटा नेक्सॉन ग्लोबल एनसीएपी रेटिंग

2023 मध्ये वर्षी लाँच झालेल्या नेक्सॉनच्या फेसलिफ्ट मॉडेलच्या सेफ्टी रेटिंग टेस्ट नुकतीच पार पडली आहे, आणि या चाचणीच्या निकालाची आपल्यापैकी बरेच जण आतुरतेने वाट बघत होते. नेक्सॉन पेट्रोल व्हेरिएंट आणि डिझेल व्हेरिएंट मॉडेलचे सेफ्टी रेटिंग टाटाने नुकतेच जाहीर केले  ज्यामध्ये टाटा नेक्सॉनला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. या चाचणीमध्ये Nexon ला एडल्ट व्यक्तींच्या सेफ्टी (AOP) साठी 34 पैकी 32.22 गुण आणि बाल व्यवसाय संरक्षण (COP) साठी 49 पैकी 44.52 गुण मिळाले आहेत.

टाटा नेक्सॉन सोबत हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट्सची सुद्धा चाचणी करण्यात आली, या दोन्ही गाड्यांच्या AOP आणि COP साठी 5 स्टार मिळाले आहेत, हॅरियरसाठी 33.05 गुण आणि सफारी साठी 45 गुण आहेत.

ग्लोबल एनसीएपी म्हणजे काय?

ग्लोबल एनसीएपी रेटिंग चाचणी हि कार साठी सर्वात महत्वाची चाचणी आहे; ग्लोबल एनसीएपी जी एक ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम नावाची संस्था आहे जी वेगवेगळ्या गाड्यांना विविध पॅरामीटर्सवर क्रॅश करुन रेटिंग देते. त्या चाचणीनुसार गाड्यांना 0-5 तारे रेटिंग देते.

वाचा: टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

नवीन नेक्सॉन सेफ्टी फीचर्स

नवीन टाटा नेक्सॉन एसयूव्ही (SUV) ला मिळणाऱ्या सेफ्टी फीचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), इमरजेंसी हेल्प(ई-कॉल), ब्रेकडाउन (बी-कॉल)असिस्टन्स, सहा एअरबॅग्स, थ्री-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX प्रतिबंध रेस्टराइंट्स, 360 डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टम, ब्लाइंड व्यूव्ह मॉनिटरिंग, फ्रंट पार्किंग सेन्सर, ऑटो डिमिंग IRVM, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, फ्रंट फॉग लॅम्पसाठी कॉर्नरिंग फंक्शन, रीअरव्ह्यू कॅमेरा याचा समावेश आहे.

वाचा: टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

नेक्सॉन अडवान्सड फीचर्स

नेक्सॉनच्या अत्याधुनिक फीचर्समध्ये स्प्लिट एलईडी हेडलॅम्प, रिडिझाइन केलेले लोखंडी ग्रिल, पुढील आणि मागील एलईडी लाइट बार, नवीन पुढचे आणि मागील बंपर, 16-इंच अलॉय व्हील, Y-आकाराचे LED टेललाइट्स आणिव्हर्टिकल स्टॅक रिव्हर्स लाइट आणि रिफ्लेक्टर हाऊसिंग यांचा समावेश आहे.

डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन एन्टरटेन्मेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto साठी वायरलेस कनेक्टिव्हिटी, आणि बॅकलिट टाटा लोगो, दोन-स्पोक स्टीयरिंग व्हील, सबवूफर, 9-स्पीकर JBL साउंड सिस्टम, हरमन-एन्हान्स ऑडिओवॉरएक्स, इलेक्ट्रिक सनरूफ, रिडिझाइन केलेले गियर लीव्हर, ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स, पर्पल अपहोल्स्ट्री, क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे.

वाचा: Tata Punch EV: फक्त २१ हजारांत करा बुक, कलर्स आणि व्हेरिएंट्स

नेक्सॉन इंजिन

सहा-स्पीड मॅन्युअल / एएमटी युनिटला जोडलेलं 1.5-लिटर डिझेल इंजिन टाटा नेक्सॉन मध्ये दिल गेलं आहे. पाच-स्पीड मॅन्युअल, सहा-स्पीड मॅन्युअल, एएमटी आणि 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसुद्धा या एसयूव्हीमध्ये उपलब्ध आहे.

मोहन सावरकर (टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे मुख्य उत्पादन अधिकारी ) या सेफ्टी टेस्टबाबतीत माहिती देताना सांगितले, सेफ्टी आमच्या ‘डीएनए’ मध्येच आहे आणि या नवीन नेक्सॉनला ग्लोबल NCAP कडून ५ स्टार रेटिंग मिळवण्याचा आम्हाला अभिमान आहे. ५ स्टार रेटिंग प्राप्त करणारी ही भारतातील पहिली कार होती, त्यामुळे हा वारसा आम्ही असाच कायम ठेवू.

15 लाखांपेक्षा कमी किंमतीची कार नेक्सॉन

2023 टाटा नेक्सॉन 11 व्हेरिएंट्स आणि सात रंग पर्यायमध्ये उपलब्ध आहे, 8.1 लाख पासून टाटा नेक्सॉन ची किंमत सुरू होते ते 15.5 लाखांपर्यंत संपते. टॉप व्हेरिएंट नेक्सॉनची किंमत ₹ 15.5 लाख आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment