नव्या रंगात रंगली ओला इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या चालू डिस्काउंट आणि ऑफर्सची माहिती

Aishwarya Potdar

ओला इलेक्ट्रिक स्कूटरने नवीन रंगांचे पर्याय Ola S1 X इलेक्ट्रिक स्कूटरला दिले आहेत ज्यामुळे, ही इलेक्ट्रिक स्कूटर आता अधिकच आकर्षित आणि उठून दिसते. हिरो इलेक्ट्रिक अटेरिया आणि होंडा एक्टिवा या इलेक्ट्रिक स्कूटरना टक्कर देणारी Ola S1 X स्कूटरची रायडींग रेंज 95 km ची आहे तर स्कूटरचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास आहे. या स्कूटरमध्ये पाच ड्युअल टोन ओला इलेक्ट्रिकने नव्याने दिलेले आहेत; फंक, स्टेलर, रेड वेलोसिटी, वोग आणि मिडनाइट. हे सर्व टोन शायनिंग आणि बोल्ड आहेत. स्कूटरमध्ये केवळ रंगसंगतीतलेच बदल घडवण्यात आलेले आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या परफॉर्मन्स बाबतीत बोलता, यामध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट हे तीन मोड दिलेले आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणाऱ्या ह्या स्कूटरमध्ये दोन किलो वॅटची लिथियम आयन बॅटरी आहे. या बॅटरीला पोर्टेबल 500W चार्जरने चार्ज करता येऊ शकते मात्र ही बॅटरी पोर्टेबल किंवा स्वाप्पेबल नाहीये. या स्कूटरच्या बॅटरीला 8 आठ वर्षाची वॉरंटी मिळते तर मोटरची वॉरंटी ही 3 वर्षाची आहे.

स्कूटरमध्ये दिलेल्या ऍडव्हान्स फिचर्सची माहिती देता यामध्ये, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ऑडोमीटर, स्पीडोमीटर टाईप तसेच लो-बॅटरी इंडिकेटर, मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटी, डे टाईम रनिंग लाईट आणि एलईडी हेडलाईट, पार्किंग असिस्टंट, रिव्हर्स मोड, इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्ट-स्टॉप करायचे बटन यांचा समावेश या स्कूटरमध्ये आहे.

वाचा: ‘अंत’ जवळ आलाय यामाहा R1 आणि R1M चा, जाणून घ्या काय आहे कारण

वाचा: आणि अचानक बाहेर पडले रेनॉल्टचे ‘सिक्रेट मॉडेल’ कमी किंमत शिवाय 400Km पेक्षा जास्त रेंज देणारी ईव्ही

वाचा: ‘शेतीचा भार ते कंपनीचं ओझ’ सगळं वाहून नेईल ही Motorvolt M7 इलेक्ट्रिक स्कूटर, 999 रुपये भरून करा बुकिंग

ओला एस वन एक्समध्ये 3 बॅटरी पॅक ऑप्शन मिळतात, 2kWh बॅटरी असणारी ओला इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 95km इतकी रेंज देते, 3kWh बॅटरी एका चार्जमध्ये 151km रेंज देते तर, 4kWh ची बॅटरी आहे, ती एका चार्जमध्ये 190km इतकी रेंज देते.

सध्या वाहन बाजारात ओला इलेक्ट्रिक या नव्या रंगाबाबत चर्चा रंगतायेत, तितकी चर्चा ओला इलेक्ट्रिकच्या महिला दिनाच्या विशेष ऑफरच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. या ऑफर मध्ये सुमारे 25 हजारापर्यंत डिस्काउंट ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतो आणि खास महिलांसाठी दोन हजार रुपयांचा कॅशबॅक सुद्धा मिळत आहे शिवाय जर तुम्ही ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्यासाठी तुमची जुनी पेट्रोल स्कूटर एक्सचेंज करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा एक ऑफर ओला इलेक्ट्रिक देत आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment