Mahindra XUV 3XO: सर्वात मोठं सनरूफ असणारी तेही 8 लाखच्या आतमध्ये मिळणारी महिंद्राची ही कार, वाचा संपूर्ण माहिती आणि करा बुकिंग पटकन

Aishwarya Potdar

Updated on:

तुम्हाला महिंद्राची XUV 300 महितीचं असेल, दमदार इंजिन आणि कमाल मायलेजसोबत तगडे फिचर्सची जोड असणाऱ्या ह्या कारच पुढचं वर्जन नुकतंच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालं आहे. तुम्हीसुद्धा ह्या 8 लाखच्या आतमध्ये मिळणाऱ्या कारची माहिती घेण्यास इच्छुक असाल तर खालील संपूर्ण माहिती वाचा, ज्यामध्ये कारच्या संपूर्ण फिचर्स-स्पेसिफिकेशन्स सोबत महिंद्रा XUV 3XO ची किंमत सुद्धा सांगितली आहे.

महिंद्रा XUV 3XO

आपली आणि आपल्या याआधीच्या कितीतरी पिढ्यांची विश्वासाची वाहन कंपनी महिंद्राने XUV 3XO नावाचे मॉडल बाजारात विक्रीसाठी आणले आहे. तुम्हाला जर महिंद्राच्या XUV 300 चा अनुभव आला असेल तर, तुम्ही महिंद्रा XUV 3XO च्या खासीयतचा अंदाज बांधू शकता, ज्याला कमालीच्या लुक्स आणि फिचर्सची जोडणी मिळालेली आहे. ही कार तगड्या आणि लांबीचे मायलेज देणाऱ्या कारच्या यादीत असणारी असेल असं दमदार इंजिन यामध्ये दिलं गेलं आहे. या कारचे 8 वेगवेगळ्या रंगातून एकूण 9 वेरिएंट्स बाजारात उपलब्ध झाले आहेत.  रिडिझाईन केलेले एक्स्टेरिअर म्हणजेच बाहेरील पार्ट्स, नव्याने मिळालेले केबिन आणि पॉवरफुल इंजिन यांची माहिती घेवूया.

वाचा: द फॅमिली स्टार फेम विजय देवेरकोंडाकडे आहे सर्वात महाग कार कलेक्शन, काय आहे ह्या कार्सची खासियत जाणून घ्या संपूर्ण माहिती

महिंद्राने XUV 3XO इंजिन आणि फिचर्स माहिती

महिंद्रा 3xo कार मध्ये तीन इंजिन पर्याय मिळतात, 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन जे 109 bhp पॉवर आणि 200 Nm इतका टॉर्क तयार करत, 1.2 लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन 129 bhp पॉवर आणि 230 Nm इतका टॉर्क जनरेट करत तर 1.5 लीटरचे डिझेल इंजिन 115 bhp पॉवर आणि 300 Nm इतका टॉर्क तयार करत. 6 स्पीड मॅन्युअल सोबत ही कार एका लिटरमध्ये 20.1 किलोमीटरचे मायलेज देऊ शकते.

वाचा: तुमची आवडती टाटा एसयुव्ही आता ‘डार्क एडिशनमधून’ उपलब्ध, हे घ्या नवे फिचर्स आणि किंमत

महिंद्रा XUV 3XO या कारच्या सर्व वेरिएंट्समध्ये ठराविक कॉमन फिचर्स मिळतात ज्यामध्ये, आयसोफिक्स चाइल्ड सिट, रिअर डिस्क ब्रेक, 6 एअरबॅग आणि ESP सारखे फिचर्स आहेत. याच्या ठळक आणि प्रमुख फिचर्समध्ये स्कायरूफ म्हणजे सनरुफच्या तुलनेपेक्षाही मोठे पॅरानोमिक सनरूफ, हारमान कार्डनची ऑडियो सिस्टिम, तुमच्याकडून मिळणारी कमांड ऐकण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी अड्रेनॉक्स, क्लायमेट कंट्रोल, प्रोजेक्टर हेडलँप्स, ट्विन एचडी इन्फोटेन्मेंट क्लस्टर- डिजिटल क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, रिअर वायपर आणि रेन सेन्सिंग वायपर, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, हिल डिसेंट असिस्टसारखे फिचर्स मिळाले आहेत. या कारच्या रंगातून सायट्रीन येलो, डिप फॉरेस्ट, ड्युन बीज, गैलेक्सी ग्रे, एव्हरेस्ट व्हाइट, नेब्यूला ब्लू, स्थेल्थ ब्लॅक, टैंगो रेड यासोबत ड्युअल टोनचा पर्याय मिळतो. किलेस एंट्री आणि इलेक्ट्रॉनिक बूट ओपनिंग असणाऱ्या XUV 3XO च्या सीट्स वेंटिलेट आहेत.

वाचा: टोयाटोची नवीन शक्कल, तुमची आवडती टोयोटा कारची होणार ‘होम-डिलीवर’

तुमच्या शहरातील महिंद्रा 3xo ची रस्त्यावरील किंमत

या कारच्या 9 वेरिएंट्सची किंमत वेगवेळ्या आहेत,

  1. MX1 Pro – 7.49 लाख रुपये
  2. MX2 Pro – 8.99 लाख रुपये
  3. MX2 Pro AT – 9.99 लाख रुपये
  4. MX3 – 9.49 लाख रुपये
  5. AX5 – 10.69 लाख रुपये
  6. AX5L MT – 11.99 लाख रुपये
  7. AX5L AT – 13.49 लाख रुपये
  8. AX7 – 12.49 लाख रुपये
  9. AX5L AT – 13.49 लाख रुपये       

तुम्हाला जर ह्या कारची अधिक माहिती किंवा तुमच्या शहरातील महिंद्रा 3xo ची रस्त्यावरील किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या महिंद्रा शोरूममध्ये भेट देऊ शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment