तुमची आवडती टाटा एसयुव्ही आता ‘डार्क एडिशनमधून’ उपलब्ध, हे घ्या नवे फिचर्स आणि किंमत

भारतामधली 2 नंबरवर असणारी बेस्ट सेलिंग ऑटोमेकर कार कंपनी म्हणजे Tata Motors. ही कंपनी आता भारतीय बाजारपेठेत डार्क एडिशन SUV पुन्हा लाँच करत आहे. टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या नेक्सॉन, Nexon.ev, हॅरियर आणि सफारी या गाड्यांचे डार्क एडिशन बाजारपेठेत उपलब्ध होणार असून टाटाच्या या टॉप कारच्या किंमत 11.45 लाख ते 20. 69 लाख दरम्यान आहे. तुम्हाला या 2024 टाटा डार्क एसयूव्ही रेंजबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लेख वाचा.

2024 Tata Motors Dark Range SUV

टाटा मोटर्सच्या जुन्या वेरियंट्सला तुफान प्रतिसाद मिळाला होता, त्यानंतर काळा रंग म्हणजे डार्क एडिशन हा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला होता, पण ग्राहकांची वाढती मागणी बघता पुन्हा एकदा टाटाच्या सर्व SUV आता DARK Editions मध्ये लॉन्च करण्यात येत आहेत. यातील डार्क एडिशनचे काही मॉडेल्स भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 मध्ये सुद्धा सादर करण्यात आले होते. टाटाच्या या ICE आणि इलेक्ट्रिक SUV च्या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या डार्क एडिशनमध्ये नवीन हेरियर डार्क, नवीन सफारी डार्क टाटा नेक्सॉन आणि टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक या गाड्यांचा समावेश आहे. चला या गाड्यांचे फीचर्स आणि किमती जाणून घेऊया.

नेक्सॉन डार्क रेंजची फीचर्स

टाटाची सर्वाधिक जास्त विकली जाणारी आणि लोकप्रिय गाडी म्हणजे टाटा नेक्सॉन, या गाडीची किंमत 8.14 लाखापासून सुरू होते तर याचं डार्क एडिशन म्हणजेच Tata Nexon Dark Edition 11.45 लाख या किंमतीमध्ये भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. नवीन Tata Nexon ने ग्लोबल NCAP कडून 5-स्टार क्रॅश टेस्ट रेट मिळाले आहेत. टाटा नेक्सॉन डार्क एडिशनच्या बाबतीत माहिती द्यायला गेली तर नावातच डार्क असल्यामुळे या गाडीला बोल्ड, एग्रेसिव्ह लूक आणि स्टाईल मिळालेले आहे, डार्क एलईडी लाईट, डायनॅमिक स्टॅन्स, डार्क मस्कट यासारखे फिचर्स डार्क आणि बोल्ड रंगातून उपलब्ध आहेत, इंटिरियरच्या बाबतीत जर माहिती द्यायची म्हटली तर ब्लॅक लेदर सीट,हेडरेस्ट वरच बॅजिंग सुद्धा कालय रंगामधून मिळत. तुमच्या सोयीप्रमाणे आणि गरजप्रमाणे या गाडीत 200 हून अधिक व्हॉईस कमांड मिळतात. या डार्क एडिशनमध्ये क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह प्लस, क्रिएटिव्ह प्लस येस, फियरलेस आणि फियरलेस प्लस हे प्रकार उपलब्ध आहेत आणि या एसयुव्ही मध्ये दोन इंजिन आणि तीन गिअर बॉक्स मिळतात.

वाचा : टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

नेक्सॉन ईव्ही डार्क रेंज फीचर्स

टाटा नेक्सॉनला मिळालेले लोकप्रिय ते नंतर टाटा ने नेक्सॉनचे पुढचे वेरियंट इलेक्ट्रिक मधून उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आता ह्या इलेक्ट्रिक नेक्सॉन व्हेरियंटला डार्क एडिशन मिळालेला आहे, याच नाव Tata Nexon.ev Dark Edition असून हे व्हेरिएंट अजूनच आकर्षित आणि बोल्ड झालं आहे. या गाडीच्या डिझाईन बाबतीत बोलायला गेलं तर या गाडीमध्ये डार्क मस्कट, मस्क्युलर स्टॅन्स मिळते आणि गाडीच्या इंटिरियर डिझाईन सुद्धा बोल्ड रंगातून मिळत.

या एसयूव्हीच्या मुख्य फीचर्स मध्ये पॉवर स्टेरिंग, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम ,ड्रायव्हर एअरबॅग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टी फंक्शन स्टेरिंग व्हील, पॉवर विंडो, एअर कंडिशन, पॅसेंजर एयरबॅग आणि आलोय व्हिल्स यांचा समावेश आहे. गाडीच्या सुरक्षितेबाबतीत बोलता गाडीमध्ये सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, एअरबॅग, डे अँड नाईट रिअर व्ह्यू मिरर, टायर प्रेशर मॉनिटर, स्पीड अलर्ट, स्पीड सेन्सिंग ऑटो डोर लॉक आणि 360 डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक नेक्सॉनची किंमत 14.49 लाखापासून सुरू असून याच्या नेक्सॉन डार्क एडिशनची किंमत 19.49 लाखापासून सुरू होते.

वाचा : टाटा मोटर्स बाजारात आणणार CNG ऑटोमॅटिक कार, वाचा वैशिष्ठ्य

नवीन हॅरियर डार्क रेंज फीचर्स

टॉप एसयुव्हीमध्ये टाटा हॅरियर डार्क एडिशन यात गाडीचं नाव आवर्जून येतं. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या या कारमध्ये 1956 सीसी चे चार सिलेंडर इनलाईन इंजिन उपलब्ध आहे, ट्रान्समिशनसाठी मॅन्युअल सहा गिअर आणि स्पोर्ट मोड या गाडीमध्ये उपलब्ध आहेत. टाटा हरियर डार्क एडिशनच्या एक्सटेरियर बाबतीत माहिती घेता यामध्ये पनोरामिक सनरूफ मिळत.

Tata Harrier Dark Edition च्या किमती बाबतीत माहिती द्यायची म्हटले तर 15.49 लाखापासून या गाडीची किंमत चालू होते, तर डार्क एडिशनच किंमत 19.99 लाखांमध्ये बाजारपेठेत उपलब्ध आहे. या गाडीमध्ये प्युयर प्लस एस, एडवेंचर प्लस, फेअरलेस आणि फियरलेस प्लस या वेरियंटचे पर्याय मिळतात.

वाचा : बिग बॉस विजेत्याला मिळणार ही इलेक्ट्रिक गाडी, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच इको फ्रेंडली बक्षीस

सफारी डार्क एडिशन फीचर्स

Tata Safari Dark Edition ची किंमत 20.19 लाखापासून सुरू होते, या गाडीला GNCAP कडून सर्वोच्च 5 स्टार रेटिंग मिळालेले आहेत. टाटा हॅरियर आणि सफारी डार्क एडिशन मध्ये असणारे फीचर्स हे बऱ्यापैकी एकसारखे आहेत, ज्यामध्ये एलईडी डीआरएल ज्यांच्यावर वेलकम आणि गुड बाय सिग्नेचर ॲनिमेशन, ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल यांचा समावेश आहे. या गाडीमधले एक्सटेरियर इंटेरियर ओबेरोन ब्लॅक या रंगामधून मिळतं. सफारी डार्क एडिशनच्या फिचर्समध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युयल झोन क्लायमेट कंट्रोल, म्युझिक सिस्टीम, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांचा समावेश आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment