टाटाच्या या ५ गाड्यांच्या विक्रीने बाजारात खळबळ, सर्वात जास्त विकली जाणारी टाटाची ही कार, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Aishwarya Potdar

Tata Cars Latest Sales: यंदा टाटा मोटर्सने एक-सो-एक कार लाँच करुन मार्केटची हवाच टाइट केली आहे. टाटाच्या चांगल्या मायलेज देणाऱ्या कार असो किंवा लोंग रेंज देणाऱ्या Tata Motors EV असो, ज्याचा परिणाम थेट इतर कार कंपनीच्या विक्रीवर झाला आहे. यंदा या कार कंपनीने काही Tata SUV मॉडेल्स जबरदस्त प्रमाणात विक्री करुन रेकॉर्डब्रेक केलं आहे, ज्यामध्ये टाटा टियागो, Nexon, Altros, Safari ani Tata Punch सारखे मॉडेल्स आहेत. तुम्हाला जर ह्या प्रत्येक कारचे किती मॉडेल्स विकले गेले? या Compact SUVचे फिचर्स- स्पेसिफिकेशन्स काय? किंमत काय ? हे जाणून घायच असेल तर सदर माहिती संपूर्ण वाचा.

टाटा मोटर्सचा रेकॉर्ड ब्रेकिंग सेल

भारतातील सर्वात मोठी वाहन कंपनी टाटा मोटर्स सध्या ‘सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार कंपनी’ या यादीत अव्वल क्रमांकाला आहे. इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रातही या कंपनीच मोठं नाव आहे. टाटा सफारी, हॅरियर, अल्ट्रोज ,टियागो सारखे अनेक मॉडेलच्या विक्री हजारोत-लाखोत करणारी ही कंपनीने या वर्षात ‘भारतात विकल्या जाणाऱ्या टॉप 5 कार’ या लिस्टमध्ये स्वतःच नाव कोरलं आहे, टाटाच्या कारची सेफ्टी, फिचर्स जगजाहीरच आहे. खालील माहितीमध्ये जाणून घेवूया ‘टाटाच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या 5 कार त्यांचे फिचर्स आणि किंमत’.

वाचा: Tata Punch EV Prices: पंच ईव्ही सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती (फेब्रुवारी)

टाटा पंच

भारतात लाँच झाल्यापासून टाटाची रेकॉर्ड-ब्रेक विक्री होणारी ही कार असून, 6 लाखापासून या कारची किंमत सुरू होते. पेट्रोल टँक असणारी ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन मधून उपलब्ध आहे.1199 cc चे इंजिन एका लिटरमागे 18 किलोमीटरचे मायलेज देते. Global NCAP द्वारे या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. सर्वात सुरक्षित कार म्हणून या कारला ओळखले जाते. 5 सीटर असणाऱ्या ह्या कारचे 2024 मध्ये 17,547 युनिट्स विकले गेले आहेत.

वाचा: टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश शिवाय टाटा टियागो ईव्हीवर मिळतोय डिस्काउंट

टाटा नेक्सॉन

टाटाची टॉप SUV म्हणून टाटा नेक्सॉन कारला ओळखले जाते. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन पर्याय असणारी ही कार ग्लोबल NCAP द्वारे 5 स्टार रेटिंग मिळवून सर्वात सेफ कार म्हणून ओळखली जाते. ही कार पेट्रोल, डिझेल आणि CNG वेरिएंट्स मधून उपलब्ध असून या वेरिएंट्सची किंमत 9.61 लाख पासून सुरू होते. 5 प्रवाशी आरामात या कारमधून प्रवास करू शकतात. सेफ्टीसाठी कारमध्ये 6 एयर बॅग्स दिल्या गेल्या आहेत. या कारची तुलना Mahindra XUV 3XO आणि किया सोनेटसोबत केली जाते. मार्च 2024 मध्ये या कारचे 14058 मॉडेल्स विकले गेले आहेत.

वाचा: TATA Nexon सह वाढली, टाटाच्या ‘या’ टॉप गाड्यांची किंमत

टाटा अल्ट्रोज

ह्युंदाई i20 आणि मारुती बलेनोची प्रतिस्पर्धी असणारी टाटा अल्ट्रोज Global NCAP द्वारे 5 स्टार रेट मिळवून सेफ कार मानली जात आहे. ह्या कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. ही कार पेट्रोल, डिझेल आणि CNG या वेरिएंट्समधून उपलब्ध आहे. या कारची वेरिएंटसनुसार किंमत 7.88 लाखापासून ते 13.10 लाखापर्यंत आहे. मार्च 2024 मध्ये या कारचे 5985 मॉडेल्स विकले गेले आहेत.

वाचा: टाटा पंचला बसला पंच, नक्की काय झालं स्टेडियममध्ये? जाणून घ्या स्टेडियममधल्या पंच ईव्हीची किंमत

टाटा टियागो

मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन पर्याय असणारी ही कार पेट्रोल आणि CNG व्हेरिएंटमधून उपलब्ध आहे. या 5 सीटर कारमध्ये 1199 cc चे पेट्रोल आणि CNG इंजिन दिले गेले आहे. Global NCAP द्वारे 4 स्टार रेटिंग या कारला मिळाले असून, 5 लोक आरामात या कारमधून प्रवास करू शकतात. एका लिटरच्या पेट्रोलमध्ये ही कार 19 किमी इतकं मायलेज तर एक किलो CNG मध्ये 26 किमी इतकं मायलेज ही कार देते. ह्या कारचे बरेच वेरिएंट्स उपलब्ध आहेत,ज्यांची किंमत 6.73 लाखापासून सुरू होते. मार्च 2024 मध्ये या कारचे 6381 मॉडेल्स विकले गेले आहेत.

वाचा: टाटा मोटर्स बाजारात आणणार CNG ऑटोमॅटिक कार, वाचा वैशिष्ठ्य

टाटा हॅरियर

हॅरियर कारला भारत NCAP द्वारे 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. 5 सीटर SUV टाटा हॅरियरचे 25 वेरिएंट्स उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 18.89 लाखापासून सुरू होते, ह्या कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असे 2 ट्रांसमिशनचे पर्याय मिळतात. सेफ्टीसाठी या कारमध्ये 7 एयरबॅग्स मिळतात, शिवाय यांचे डिझेल व्हेरिएंट एक लिटरमधून 14 किलोमीटर इतके मायलेज देते. मार्च 2024 मध्ये या कारचे 2054 मॉडेल्स विकले गेले आहेत.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment