टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश शिवाय टाटा टियागो ईव्हीवर मिळतोय डिस्काउंट

Aishwarya Potdar

Updated on:

टाटाच्या सर्वात विकल्या जाणाऱ्या टियागो ईव्हीला काही नव्याने काही फिचर्स जोडण्यात आलेले आहेत, शिवाय 7.99 लाख या किंमतीपासून सुरू होणाऱ्या इलेक्ट्रिक कार वर होळीनिमित्त ऑफर सुद्धा देण्यात येत आहे. एका चार्जमध्ये 250 किलोमीटर पेक्षा अधिकचा पल्ला गाठणाऱ्या या इलेक्ट्रिक कारच्या नव्याने दिलेल्या फीचर्स बाबतीत माहिती सदर लेखात दिलेली आहे.

टाटा टियागो ईव्हीमध्ये या दोन फिचर्सचा समावेश

7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, गाडी सुरू-बंद करण्यासाठी स्टार्ट/स्टॉप बटन, टायर प्रेशर मॉनिटरिंग, सिस्टिम कॅमेरा यांसारखे एडवांस्ड फीचर्स टाटा टियागोमध्ये असताना सुद्धा टाटाने या कारमध्ये दोन फिचर्स नव्याने सामाविष्ट केलेले आहेत; ऑटोडिमिंग IRVM आणि फ्रंट USB C टाईप चार्जर. या मधला ऑटो डिमिंग IRVM फक्त XZ+ Tech Lux या व्हेरिएंटमध्ये दिला जाणार आहे तर 45W फास्ट चार्जर हे फिचर XZ+ आणि एक्स+ Tech Lux या दोन टियागो ईव्ही वेरिएंट्सला मिळणार आहे. या दोन फीचर्स शिवाय टाटा टियागो मध्ये 7 इंचाची टचस्क्रीन, रिव्हर्स कॅमेरा आणि ऑटो एसी हे सुद्धा फीचर्स जोडण्यात आलेले आहेत.

कारमध्ये बसणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, EBD सोबत ABS, रियर कॅमेरा आणि रेन-सेन्सिंग वायपर यांचा समावेश आहे.

वाचा: टॉप 5 शहरामधील टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची किंमत, कमाल फिचर्ससोबत 5 स्टार रेटिंग सेफ्टीसुद्धा

एका चार्जमध्ये 250 किलोमीटरचा पल्ला

टाटा टियागो ईव्हीमध्ये दोन बॅटरी पॅक पुरवण्यात आलेले आहेत; एक मिडीयम रेंजसाठी आणि एक लाँग रेंजसाठी. या मधला मिडीयम रेंज याचा बॅटरी पॅक 19.2 kWh आहे ज्यातून 61 PS इतकी पावर तयार होते तर 110 NM इतका टॉर्क जनरेट होतो. या मिडीयम रेंजचा बॅटरी पॅक एका चार्जमध्ये 250 किलोमीटरचा पल्ला गाठू शकतो.

तर लाँग रेंजसाठी 24 kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे, जो 75 PS पॉवर तर 114 NM टॉर्क जनरेट करतो. ही कार लॉंग रेंजच्या या बॅटरी पॅकद्वारे एका चार्जमध्ये 315 किलोमीटर इतक्या अंतराचा पल्ला पार करू शकते. या इलेक्ट्रिक कारला 15 A सॉकेट चार्जरने चार्ज केला तर 6.9 तासांमध्ये याची बॅटरी संपूर्णपणे चार्ज होते. 3.3 kW एसी चार्जरने 6.9 तासात याची बॅटरी चार्ज होते तर 7.2 kW एसी चार्जरने 2.6 तास या गाडीला पूर्ण चार्ज होण्यासाठी लागतात DC फास्ट चार्जरने फक्त 58 मिनिटात ही गाडी संपूर्णपणे चार्ज होते.

वाचा: 27 हजार वाचवा विडा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर, विडा ऍडव्हान्टेज पॅकेज मिळणार अगदी मोफत

टाटा टियागो इलेक्ट्रिक कारवर कमालीचा डिस्काउंट

सध्या टाटा टियागो इलेक्ट्रिक कारवर कमालीचा 72,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट चालू आहे. ही इलेक्ट्रिक कार 7 व्हेरिएंट आणि 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे; सिग्नेचर टील ब्लू, डेटोना ग्रे, ट्रॉपिकल मिस्ट, प्रिस्टाईन व्हाइट आणि मिडनाईट प्लम. टाटा टियागो ईव्हीच्या 7 वेरिएंट्समध्ये बेस मॉडेलची किंमत 7.99 लाखापासून सुरू होते तर टॉप मॉडेलची किंमत 11.89 लाखापर्यंत जाते. या कारची तुलना टाटा पंच, एमजी कॉमेट कार सोबत केली जाते. तुम्ही जर स्पोर्ट मोडवर धावणाऱ्या शिवाय परवडणाऱ्या ईव्हीच्या शोधात असाल, तर टाटा टियागो ईव्ही हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment