27 हजार वाचवा विडा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर, विडा ऍडव्हान्टेज पॅकेज मिळणार अगदी मोफत

Aishwarya Potdar

हिरो मोटरकार्प ही तिच्या हिरो विडा वि1 या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरसाठी खूप प्रसिद्ध आहे. या स्कूटर आकर्षक डिझाईन, ॲडव्हान्स फीचर्स आणि कमालीची लॉन्ग रेंज हीच या इलेक्ट्रिक स्कूटरची ओळख आहे, तुम्ही जर हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर आत्ता या हिरो विडा वि1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर विडा ॲडव्हान्टेज पॅकेजमध्ये 27 हजारापर्यंत बेनिफिट्स मिळत आहेत म्हणजेच तुम्हाला तब्बल 27 हजार रुपयांचा फायदा होणार आहे, तो फायदा तुम्ही कसा करून घेऊ शकता? ह्या स्कूटरचे बुकिंग कसं करू शकता? शिवाय या इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि मूळ किंमत काय आहे? हे जर जाणून घ्यायचं असेल तर सदर माहिती संपूर्ण वाचा.

विडा ऍडव्हान्टेज पॅकेज मध्ये या पाच गोष्टींचा समावेश

  1. एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी
  2. विडा फास्ट चार्जिंग नेटवर्कला ॲक्सेस
  3. 24/7 रोड साईड असिस्टंट
  4. विडा वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला सर्विस
  5. माय विडा अँपला अनलॉक करून ॲक्सेस मिळतो.

तुम्ही जर हिरो विडा व्ही1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर 31 एप्रिल 2024 च्या आधी खरेदीत केली तर, तुम्हाला विडा ऍडव्हान्टेज पॅकेजतर्फे जवळपास 27 हजारांचा फायदा होणार आहे, या 27,000 च्या फायद्यामध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी पाच गोष्टी कव्हर होणार आहेत, ज्यामध्ये एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी म्हणजेच बॅटरीला 5 वर्ष किंवा 60,000 किलोमीटरची अधिक वॉरंटी मिळणार आहे यासोबत विडा फास्ट चार्जिंग नेटवर्कला ॲक्सेस करायचा फायदा,  थेट विडा वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला सर्विस करण्याचा फायदा, 24/7 रोड साईड असिस्टंट म्हणजेच प्रवास करताना काही आपत्कालीन परिस्थितीत रस्त्याच्याकडेला मदत मिळणे आणि सर्वात महत्त्वाचं ‘माय विडा ॲप’ वर सर्व कनेक्टिव्हिटी आणि सेफ्टी फीचर्स थेट अनलॉक करून वापरता येतात.

वाचा: एथर रितझा पाण्यात उतरल्यावर काय झालं ? जाणून घ्या रितझाचे फिचर्स आणि किंमत

विडा ऍडव्हान्टेज पॅकेज मिळणार अगदी मोफत

जर तुम्ही हिरो मोटरकार्पच्या विडा या इलेक्ट्रिक स्कूटर ची खरेदी केली तर, तुम्हाला या विडा ऍडव्हान्टेज पॅकेज तुम्हाला या सत्तावीस हजारच्या अडवांटेज पॅकेजसाठी कोणतेही जादाचे पैसे भरावे लागणार नाहीत ह्या पॅकेजचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च द्यावा लागणार नाही ही ऑफर फक्त 31 एप्रिल 2024 पर्यंत वैध्य राहणार आहे, त्यामुळे तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर हिरो मोटर कार च्या या इलेक्ट्रिक स्कूटर चा नक्की विचार करा.

वाचा: टॉप 5 शहरामधील टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची किंमत, कमाल फिचर्ससोबत 5 स्टार रेटिंग सेफ्टीसुद्धा

हिरो विडा व्ही1 प्रो ची थोडक्यात माहिती

हि स्कुटर खासकरून शहरी वापरासाठी बनलेले आहे. विडा व्ही1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ८० किलोमीटर प्रतितास इतका असून हिला कमालीची अशी लॉन्ग रेंज मिळालेली आहे. जवळपास एका चार्जमध्ये जवळपास 165 किलोमीटर इतका पल्ला ही इलेक्ट्रिक स्कूटर गाठू शकते शिवाय शहरी भागात या इलेक्ट्रिक स्कूटरला जर चार्ज करायचे म्हटले तर या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुमच्या जवळचे चार्जिंग स्टेशन यांची माहिती मिळतेच सोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेला आहे. ज्याच्या मदतीने ही स्कूटर कमी वेळात जास्त चार्ज होते. दिसायला अगदी रगिड आणि परफॉर्मन्सने उत्कृष्ट अशीही इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment