एथर रितझा पाण्यात उतरल्यावर काय झालं ? जाणून घ्या रितझाचे फिचर्स आणि किंमत

भारतीय बाजारपेठेत जेव्हापासून एथर एनर्जीची रिझता स्कूटर लॉन्च झालेली आहे, तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही फॅमिली स्कूटर कायमच चर्चेत असते, कधी या स्कूटरच्या लिथियम आयन बॅटरीचा चाळीस फुटावरून फेकून टेस्ट दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी या इलेक्ट्रिक फॅमिली स्कूटरला असणाऱ्या स्पेसची चर्चा. तुम्ही जर दणकट आणि लॉंग रेंज असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल, तर रिझता ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

नुकताच एथर एनर्जीच्या ऑफिशियल पेजवर एथर रिझताचा असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एथर रिझता पाण्यातून भरलेला रोडवर धावत असते तेही एकसंथ, तुम्हालासुद्धा नक्की काय आहे त्या व्हिडिओमध्ये आणि असे कोणते फीचर्स गाडीमध्ये दिलेले आहेत ज्यामुळे ही गाडी पाण्यातूनही स्लिप होत नाही, हे जर जाणून घ्यायचं असेल तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

एथर रिझता थेट पाण्यात चालवली!

एथर एनर्जी इलेक्ट्रिकच्या ऑफिशियल पेजवर एक व्हिडिओ अपलोड झाला, व्हिडिओमध्ये रिझताला घेऊन एक चालक काठ असलेल्या पाण्याच्या स्त्रोत्रातून ही दुचाकी चालवतो, हळूहळू ही दुचाकी निम्म्यापेक्षा जास्त बुडते तरीही मात्र पाण्याच्या प्रवाहात रिझता एकसंथधावत असते, कुठेही न घसरता.  यावरूनच नवीन रिझता पाण्यातही अजिबात स्लिप होत नाही हे निदर्शनास येते.

वाचा: टाटा पंचला बसला पंच, नक्की काय झालं स्टेडियममध्ये? जाणून घ्या स्टेडियममधल्या पंच ईव्हीची किंमत, फिचर्स

वाचा: एथर एनर्जीची बॅटरी फेकली 40 फुटावरून, पाहा पुढं काय झालं?

एथर रिझता फिचर्स आणि किंमत

येथे एनर्जी ही इलेक्ट्रिक स्कूटरसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी लवकरच फॅमिली स्कूटर रिझता घेऊन भारतीय बाजारपेठेत सादर होणार आहे. आकर्षक लुक, एडवांस्ड फीचर्सने भरपूर शिवाय नावातच फॅमिली स्कूटर असल्याने हिच्यावर बऱ्यापैकी भार वाहून नेला जाऊ शकतो.

रिझता भारतामध्ये एप्रिल 2024 मध्ये, सुमारे 1,25,000/- ते 1,50,000/- या किमतीमध्ये लॉन्च होणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स बाबतीत माहिती घेता यामध्ये, GPS आणि नेवीगेशन, LED हेडलाईट सिग्नल, LED टेललाईट , LED टर्न सिंगल शिवाय कॉल एसएमएस अलर्ट, लो-बॅटरी इंडिकेटर, मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटी, डे टाईम रनिंग लाइट्स, स्कूटर सुरू किंवा बंद करण्यासाठी बटन सोबत ही इलेक्ट्रिक स्कूटर फॅमिली स्कूटर असल्यामुळे बऱ्यापैकी अंडर-सिट स्टोरेजसुद्धा मिळते. रायडिंग मोड्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या स्कूटरमध्ये उपलब्ध आहे.

जेव्हा रिझताची बॅटेरी ४० फुटावरून फेकली!

ओला एस वन प्रो आणि विडा व्ही 1 यांची प्रतिस्पर्धी असणारे इलेक्ट्रिक एथरची किंमत सव्वा लाख ते दीड लाखच्या दरम्यानच्या असून, नुकतीच एथरच्या इलेक्ट्रिक बॅटरीची सुद्धा टेस्ट झाली होती; या बॅटरीचा टीझर व्हिडिओ एथर इलेक्ट्रिकच्या ऑफिशियल पेजवर झळकला, ज्यामध्ये या लिथियम-आयन बॅटरीला जवळपास 40 फुटावरून फेकण्यात आले होते, तरीही ही बॅटरी ‘जैसे थे’ अशा स्थितीत होती. यावरूनच ह्या बॅटरीला सॉलिड बॅटरी म्हणून ठरवण्यात आले.

तुम्हाला सुद्धा या भरपूर स्पेस असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरला विकत घ्यायचं असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एथर एनर्जी इलेक्ट्रिक शोरूमला विज़िट करू शकता अथवा एथर एनर्जीच्या मूळ वेबसाईटवर जाऊन, या इलेक्ट्रिक स्कूटरचा बुकिंग सुद्धा करू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment