द फॅमिली स्टार फेम विजय देवेरकोंडाकडे आहे सर्वात महाग कार कलेक्शन, काय आहे ह्या कार्सची खासियत जाणून घ्या संपूर्ण माहिती

The Family Star car collection: लवकरचं द फॅमिली स्टार नावाचा चित्रपट येत आहे, या मूव्हीमधल्या संपूर्ण कास्टची माहिती इंटरनेटवर वेगाने शोधली जात आहे, जस द फॅमिली स्टार चित्रपट डाउनलोड हिंदी, द फॅमिली स्टार चित्रपट हिंदीमध्ये डाउनलोड, द फॅमिली स्टार कास्ट कार कलेक्शन इत्यादी. म्हणूनच खालील लेखात तुम्हाला या चित्रपटांमधल्या लिड रोल असणाऱ्या अभिनेत्याचा म्हणजेच विजय देवेरकोंडाच्या कार कलेक्शनची संपूर्ण माहिती, कारचे फिचर्स आणि किंमतीसोबत मिळणार आहे.

द फॅमिली स्टार फेम विजय देवेरकोंडा कार कलेक्शन

नवीनतम चित्रपट द फॅमिली स्टार लवकरचं येत आहे, या चित्रपटामध्ये लायगर फेम विजय देवेरकोंडा यांचा मुख्य रोल असून, विजय हा साउथ इंडियन एक्टर आहे. विजयने याआधी गीता गोविंदम – 2018 आणि कुशी – 2023 यासारखे हिट असे चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. या अर्जुन रेड्डी सुपरस्टारकडे भारतमधल्या टॉप कारच कलेक्शन आहे, ज्यामध्ये व्हर्सटाईल ऑडी Q7, Ford Mustang, एलिगेंट BMW 5 सिरीज, कमांडिंग मर्सिडीज-बेंझ GLS यासारख्या कारचा समावेश आहे, चला जाणून घेवूया या कारची संपूर्ण माहिती.

ऑडी Q7

विजयकडे असणारी ही वर्सेटाइल Audi Q7 मध्ये 7 प्रवाशी बसण्याची क्षमता ऑडी Q7 सर्वात लक्जरी आणि महाग कार मानली जाते. ही एसयुव्ही ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमधून चालवली जाते. ह्या कारच्या इंजिन स्पेसिफिकेशन बाबतीत माहिती देता , कारमधील इंजिन पेट्रोल इंजिन आहे, जे 2995 cc चे आहे. एका लिटरच्या पेट्रोलमध्ये ही कार साधारण 11किमी इतके मायलेज देते. ह्या कारच्या सेफ्टी फिचर्समध्ये 8 एयरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटर, 360 डिग्री कॅमेरा यासारखे इतर एडवांस्ड आणि सेफ्टी फिचर्स यांचा समावेश आहे. ह्या कारची किंमत 94.45 लाख इतकी आहे.

वाचा: पंकज त्रिपाठीच्या भावोजींचा ओव्हरस्पिडिंगमुळे मृत्यू, या कारमधून करत होते प्रवास, ओव्हरस्पिडिंग कंट्रोल करा अश्या प्रकारे

फोर्ड मुस्टँग

80 लाख किंमत असणारी Ford Mustang ही कार अर्जुन रेड्डी फेम विजयच्या आवडत्या कारमधील एक आहे. पेट्रोल इंजिन असणाऱ्या ह्या कारचे इंजिन 4999 cc चे आहे. ह्या कारमध्ये 5 लोक आरामात प्रवास करू शकतात. ऑटोमॅटिक ट्रांसमिशनने चालणारी ही कार एका लीटरमध्ये 7 किमीचे मायलेज देते.

वाचा: वडापाव गर्लने वडापाव विकून घेतली ह्युंदाईची ही कार, काय आहे किंमत आणि फिचर्स ह्या कारचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

बीएमडब्ल्यू 5

बऱ्याच वेळा विजयला BMW 5 मधून बाहेर पडताना, प्रवास करताना पहिले आहे. ह्या कारची किंमत 74 लाख इतकी असून, ह्या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही इंजिन पर्याय मिळतात. ऑटोमॅटिक ट्रांसमिशनने चालणाऱ्या ह्या कारमध्ये एयरबॅग्स आणि इतर एडवांस्ड आणि सेफ्टी फिचर्सचा समावेश आहे. 

वाचा: उद्धव ठाकरें अजूनही चालवतात ही कार, काय असेल ह्या कारची किंमत आणि फिचर्स? वाचा संपूर्ण माहिती

मर्सिडीज जीएलएस कार

2 करोड किंमतीची ही कार विजयची आवडती कारमधून एक कार आहे. ह्या कारच्या सेफ्टी फिचर्समध्ये 9 एयरबॅग्सचा समावेश आहे, ही कार 4 व्हिल्स ड्राइव सोबत ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मधून चालते. कारमध्ये 2999 cc चे पेट्रोल इंजिन आहे. तीन रो मध्ये बसण्याची व्यवस्था असणाऱ्या या कारमध्ये 7 लोक आरामात प्रवास करू शकतात.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment