बॉलिवूडच्या क्वीनची महागडी मर्सिडीज, फिचर्स पाहून थक्क व्हाल, ही वाचा संपूर्ण माहिती

Aishwarya Potdar

बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना राणावत जी लोकसभेची उमेदवार आहे, ही अभिनेत्री नेहमीच तिच्या ठोस आणि स्पष्ठ बोलण्यामुळे चर्चेत असते. पण सध्या कंगना चर्चेत आहे तिच्या नव्या कोऱ्या करोडो रुपयांच्या महागमोल्या कारमुळे, या कारचे नाव आहे Mercedes-Maybach GLS 600 4MATIC. ही कार सर्वात सुरक्षित कार मानली जाते. कारमध्ये असलेल्या एडवांस्ड आणि सेफ्टी फिचर्समुळे ह्या मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 4MATIC ची किंमत  3.51 करोड इतकी आहे. कंगनाकडे या कारसोबत अनेक आलिशान कार आहे, ज्यामध्ये ती अनेकदा प्रवास करताना दिसून येते. चला जाणून घेवूया लैंड रोव्हर रेंज रोव्हर आणि लेक्सस एलएक्स ला टक्कर देणाऱ्या मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 4MATIC कारची संपूर्ण माहिती.

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना हिने मनिकर्णिका, तनु वेड्स मनू, क्वीन आणि फैशन सारख्या हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला असून नुकतेचं या अभिनेत्रीने भारतीय जनता पार्टीमध्येसुद्धा प्रवेश केला आहे, स्टाइल आइकॉन म्हणून ओळखणाऱ्या कंगनाला कारचे विशेष प्रेम आहे. कंगनाला लक्सरीयस कार वापरताना प्रवास करताना एअरपोर्टस, इलेक्शन मीटिंगच्या दरम्यान बरेचदा टिपण्यात आले आहे. चला जाणून घेवूया या कारची संपूर्ण  स्पेसिफिकेशन आणि इंजिन माहिती.

वाचा: अनन्याने रिव्हिल केली मारुतीची ही 7 लाखाची कार, बुकिंग कसं करायचंय कळत नाहीये? अहो ह्या सोप्या पद्धतीने करा बुकिंग 

मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 4MATIC

पेट्रोल आणि 8 सिलेंडर चे इंजिन असणाऱ्या ह्या कारची इंधन टाकी 90 लिटरची आहे. 520 लिटरची बूट स्पेस या कारमध्ये मिळते. 5 लोक 2 रोमध्ये असणाऱ्या सीटिंग अरेंजमेंट मध्ये आरामात प्रवास करू शकतात. स्टोरेज, सेफ्टी, लॉक सेफ्टी, कम्फर्ट, एंटरटेनमेंट या सर्व गरजेच्या फिचर्सने ही कार भरपूर आहे. ड्युअल टोनमधून इंटिरियर असणाऱ्या या कारमध्ये AWD म्हणजेच ऑल व्हील ड्राइव पर्याय असून, ऑटोमॅटिक ट्रांसमिशन सोबत 9 गियर आणि स्पोर्ट मोड सारखे एडवांस्ड फिचर्स या कारमध्ये मिळतात. या कारची एक खासियत म्हणजे हिचे सीट्स जे हीटेड आणि कूल या दोन पर्यायातून उपलब्ध आहेत. किलेस सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक याचसोबत कारच्या मागच्या सीटिंग रो मध्ये 3 पॉइंटेड सीटबेल्ट सुद्धा या कारमध्ये उपलब्ध आहे.

वाचा: ओला स्कूटर झाल्या स्वस्त, ओलाने दिला डिस्काउंट, हे आहे या मागच कारण !

मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 4MATIC इंजिन माहिती

कारमध्ये 4.0 लिटरचे V8 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 3982 cc चे आहे जे 549.82 इतकी पॉवर आणि 730Nm इतका टॉर्क तयार करू शकत. कारचा टॉपस्पीड 250 किमी प्रति तास इतका आहे. एडवांस्ड फिचर्समध्ये ब्लाइंड स्पॉट मिरर, ऑट्टोनोमस पार्किंग यांचा समावेश आहे. कंगनाकडे या कारसोबत इतर आलिशान कार आहेत ज्यामध्ये, BMW आणि Audi सारख्या कार चा समावेश आहे. या कारमध्ये सेलेनाईट सिल्व्हर, कवन्सित ब्लू, ब्रिलियेंट ब्लू, इरिडियम सिल्व्हर आणि एमिरल्ड ग्रीन सारखे अधिक रंगसुद्धा उपलब्ध आहेत.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment