ओला स्कूटर झाल्या स्वस्त, ओलाने दिला डिस्काउंट, हे आहे या मागच कारण !

Aishwarya Potdar

Ola’s scooters have become cheaper: ओला स्कूटरवर मिळणारी सबसीडी अचानक बंद झाल्याने बऱ्याच इलेक्ट्रिक वाहन प्रेमींमध्ये नाराजी निर्माण झाली होती पण आता हीच ओला स्कूटर अचानक कमी झाली आहे अशी बातमी इंटरनेट वर प्रचंड प्रमाणात पसरत आहे, ही बातमी खरी आहे की खोटी ? खरी असेल तर ओला इलेक्ट्रिक स्कूटर किती किंमतीने कमी झाली आहे?तुमच्या या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला सदर माहितीमध्ये मिळेल.

ओलाच्या स्कूटरची किंमत 5,000 ते 10,000 ने कमी

इंडिया मध्ये टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीमध्ये ओला इलेक्ट्रिक या कंपनीच हमखास घेतलं जात, या स्कूटरचं लोकप्रिय होण्यामागचं कारण; या स्कूटरला दिले गेलेले फिचर्स, मजबूत आणि आकर्षक जोडणी आणि 100किमी पेक्षा अधिक रेंज. इतक्या साऱ्या चांगल्या गोष्टी अजूनदेखील ओला इलेक्ट्रीकवर आता सबसीडी बंद करण्यात आल्याने बऱ्याच लोकानी या स्कूटरच्या खरेदीसाठी माघार घेतली होती, पण लोकांची नाराजी लक्षात घेता ओला इलेक्ट्रिक स्कूटर त्याच्या बेस्ट सेलर ओला येस वन एक्स या मॉडेलवर कमालीचा आणि भरघोस डिस्काउंट देत आहे.  चला जाणून घेऊया या स्कुटरवर मिळणाऱ्या डिस्काउंट संबंधित संपूर्ण माहिती.

ओला स्कूटर मॉडेल मूळ किंमत सवलतीनंतरची किंमत
Ola S1 X  2 kWh 79,999 रुपये 69,999 रुपये
Ola S1 X Plus 3 kWh 94,999 रुपये 84,999 रुपये
Ola S1 X 4 kWh 109,999 रुपये 99,999 रुपये


ओला एस वन एक्स 2 kWh

या 2 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 95 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 85 किमी प्रति तास इतका असून हिची सुधारित म्हणजेच सवलतीतून होणारी किंमत 69,999 रुपये इतकी आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

वाचा: टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश शिवाय टाटा टियागो ईव्हीवर मिळतोय डिस्काउंट

ओला एस वन एक्स प्लस

या 3 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 151 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास इतका असून हिची सुधारित म्हणजेच सवलतीतून होणारी किंमत 84,999 रुपये इतकी आहे.

वाचा: ओला इलेक्ट्रिक स्कूटर देतेय प्रत्येकाला लाखो कमवण्याची संधी

ओला एस वन एक्स

या 4 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 190 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास इतका असून हिची सुधारित म्हणजेच सवलतीतून होणारी किंमत 99,999 रुपये इतकी आहे.

वाचा: पाच मिनिटाला एक अशी ह्युंदाईची ही एसयुव्ही विकली जातेय, केला १ मिलियन विक्रीचा टप्पा पूर्ण

एथर रिझता लाँच झाल्यावर ओलाने दिला डिस्काउंट, हे आहे या मागच कारण !

एथर इलेक्ट्रिक एनर्जी ची सर्वात जास्त चर्चेचा विषय असणारी स्कूटर लाँच झाली आहे, एथर रिझता. ही एक फैमिली स्कूटर असून,आजपर्यंतच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ही रिझता स्कूटर सर्वात मोठी सिट असणारी स्कूटर आहे. सोबत ही एक फॅमिली स्कूटर असल्याने कुटुंबाच्या सर्व गरज पूर्ण करणारी ही स्कूटर आहे. एका चार्जमध्ये साधारण 150 किमी पेक्षा अधिक रेंज ह्या रिझता स्कूटर मिळवले. ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.10 लाख इतकी आहे. अथर आणि बजाज चेतक सारख्या तगड्या आणि कमालीच्या रेंजच्या स्कूटरना टक्कर देत सेल वाढण्यासाठी ओला इलेक्ट्रिक ने त्यांच्या टॉप सिलिंग इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी केल्याची बातमी सध्या वायरल होत आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment