पाच मिनिटाला एक अशी ह्युंदाईची ही एसयुव्ही विकली जातेय, केला १ मिलियन विक्रीचा टप्पा पूर्ण

Aishwarya Potdar

Hyundai Sold One Creta Every 5 Minutes: ह्युंदाईने वाहन बाजारात क्रेटाचा विक्री रेशो जाहीर करुन, आश्चर्याचा धक्काच दिला असल्याचे दिसते आहे. ह्युंदाई क्रेटा 2015 मध्ये आगमन झालं आणि तेव्हापासून आताच्या घडीपर्यंत 10 लाखांहून अधिक भारतीयांनी क्रेटाची खरेदी केली आहे, चक्क ‘ह्युंदाईच्या या SUV ची विक्री दर 5 मिनिटाला होते’ हे वाक्य ऐकून भल्याभल्यांच्या तोंडच पाणी पळालं  आहे.

ह्युंदाई क्रेटा इतिहास

Hyundai चा इतिहास पाहता, ह्युंदाईने 2015 मध्ये पहिली जनरेशन क्रेटाला लाँच केलं होत, ही मध्यम आकाराची SUV फेब्रुवारी 2020 मध्ये ती बंद करण्यात आली होती. फेब्रुवारी 2020 पर्यंतच्या कालावधीत पहिली जनरेशन क्रेटाचे 4.67 लाख युनिट्स विकले गेले. त्यानंतर मार्च 2020 मध्ये  दुसऱ्या जनरेशनतील क्रेटाला लाँच करण्यात आलं जिच्या 3.71 लाख युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच जून 2015 पासून ते आत्तापर्यंत क्रेटाच्या 8.3 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.

दोन फेसलिफ्ट आणि एक जनरेशनल अपडेट

2015 मध्ये, ह्युंदाई च्या या SUV चे लाँचिंग झाल्यावर सोबर आणि मिनिमलिस्टिक लुकवाल्या पहिल्या जनरेशनतील क्रेटाला पहिले फेसलिफ्ट 2018 मध्ये मिळाले ज्यात सनरूफ, कॅस्केडिंग ग्रिल डिझाइन आणि काही नवीन फिचर्सचा समावेश होता.

यानंतर 2020 मध्ये, दुसरं जनरेशन क्रेटाचे लाँचिंग झाले LED लाइटिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट आणि पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश होता या नंतर पुन्हा एकदा जानेवारी 2024 मध्ये दुसरी जनरेशन क्रेटा फेसलिफ्ट मिळाले, ज्यात लूकपासून फिचर्सपर्यंत अचंबित करणारा बदल करण्यात आला.

वाचा: टाटा ने लाँच केली ही लोकप्रिय ऑटोमॅटिक सीएनजी कार, १ किलो मध्ये धावते 28 kmpl किमत फक्त

दर 5 मिनिटांनी एक क्रेटाची विक्री

2024 च्या नव्या वर्षात Creta लाँच झाल्यानंतर 60,000 बुकिंग चा टप्पा गाठला होता, Hyundai India च्या अंदाजानुसार, दर पाच मिनिटांनी एक क्रेटा होत आहे. आत्तापर्यंत ह्युंदाई क्रेटा ने भारतात 10 लाख युनिट विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. ह्युंदाई क्रेटा ची किंमत 11 लाख ते 20.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

वाचा: Hyundai Creta 2024: क्रेटाच्या सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती, संपूर्ण लिस्ट

2024 ह्युंदाई क्रेटा फिचर्स

ह्युंदाई क्रेटा मध्ये ड्युअल इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 10.25-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट,  ड्युअल-झोन एसी, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी दिलेल्या फिचर्समध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि एडवांस्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यांचा समावेश या कारमध्ये आहे.

वाचा: Top EV: भारतात २०२४ मध्ये येणाऱ्या ‘टॉप ५’ इलेक्ट्रिक कार्स

2024 क्रेटा इंजिन

ह्युंदाई क्रेटा मध्ये तीन इंजिन ऑप्शन दिले गेले आहेत; 1.5-लिटर NA पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल.

  • 1.5-लिटर NA पेट्रोल इंजिनची पॉवर 115 PS आणि 144 Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ट्रांसमिशन 6-स्पीड MT/CVT आहे.
  • 1.5-लिटर टर्बो-पेट्रोलची पॉवर 160 PS आणि 253 Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ट्रांसमिशन 7-स्पीड DCT आहे.
  • 1.5-लिटर डिझेल इंजिनची पॉवर 116 PS आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ट्रांसमिशन 6-स्पीड MT/6-स्पीड AT आहे.

ह्युंदाई क्रेटा किंमत

फोक्सवॅगन तैगुन , होंडा एलिव्हेट , किआ सेल्टोस , मारुती ग्रँड विटारा आणि सिट्रोएन सी 3 एअरक्रॉस सारख्या गाड्याना टक्कर देणाऱ्या ह्युंदाई क्रेटा ची किंमत 11 लाख ते 20.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment