अनन्याने रिव्हिल केली मारुतीची ही 7 लाखाची कार, बुकिंग कसं करायचंय कळत नाहीये? अहो ह्या सोप्या पद्धतीने करा बुकिंग 

Aishwarya Potdar

मारुती सुझुकीची त्यांच्या टॉप सेलर कार maruti suzuki swift 4th generation ला बाजारपेठेत लाँच करण्याच्या जय्यत तयारीला लागले आहे, तुम्हीसुद्धा या कारचे मारुती सुझुकीच्या मुळ वेबसाईटवर त्याचबरोबर तुमच्या जवळच्या डिलरकडून या कारचे बुकिंग आणि नवीन स्विफ्ट 2024 टॉप मॉडेलची किंमत यांची माहिती अगदी घरबसल्या जाणून घेवू शकता. नवीन जनरल मारुती सुझुकी स्विफ्टच्या संपूर्ण माहितीसाठी सदर लेख वाचा.

मारुती सुझुकी नवीन कार 2024 – स्विफ्ट चौथी पिढी

maruti suzuki new car 2024 म्हणजेच मारुती सुझुकी स्विफ्टची खासियत म्हणजे कारमधील असणारी सर्वात मोठी इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन स्क्रीन आणि नवकोर 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन, या कारच्या एका लीटरच्या पेट्रोलमधून 22.38 किलोमीटरचे मायलेज मिळू शकते, या कारची सर्वात आकर्षित करणारी गोष्ठ म्हणजे कारचे पॉवरफुल्ल इंजिन आणि कमालीचे फिचर्स. नुकतेच या कारची त्यांच्या ऑफिशियल पेजवर आणि सोशल मीडियावर एक जाहिरात आली आहे, ज्यामध्ये एक बॉलिवूड अभिनेत्री या कारला रिव्हिल करत आहे.

वाचा: Mahindra XUV 3XO: सर्वात मोठं सनरूफ असणारी तेही 8 लाखच्या आतमध्ये मिळणारी महिंद्राची ही कार

अनन्या पांडेने रिव्हील केली मारुती सुझुकी स्विफ्ट चौथी पिढी

मारुतीच्या नव्या सुझुकी स्विफ्ट चौथी पिढीच्या जाहिरातीमध्ये चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे दिसून आली आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम ही अभिनेत्री टाईम टू गो स्विफ्टिंग चा अलार्म म्हणजेच गजर वाजत असताना झोपेतून उठताना दिसत आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री या कपड्यामागे लपलेल्या मारुती सुझुकी नवीन कार 2024 ला सर्वासमोर सादर करताना दिसत आहे. या जाहिरातीमध्ये मारुतीच्या या नव्या कारचे काही ठळक वैशिष्ट्ये दिसून आली ज्यामध्ये, कार स्टार्ट आणि स्टॉप होण्याचे इलेक्ट्रिक बटण,समोर असणारे नवीन शार्प LED लाइट्स आणि ग्रिल. चला जाणून घेवूया या कारच्या फिचर्स, स्पेसिफिक्शन आणि इंजिनची संपूर्ण माहिती.

वाचा: होंडाची इलेक्ट्रिक ॲक्टिव्हा स्कूटर लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड

स्विफ्ट 2024 लाँच तारीख

मारुतीची ही नवीन हॅचबॅक कार मॅन्युअल ट्रांसमिशन आणि पेट्रोल इंजिनची कार आहे, जी 9 मे 2024 या दिवशी संपूर्ण भारतात लाँच होणार आहे. या कारमध्ये तीन वेरिएंट्स उपलब्ध होणार आहे ज्याची किंमत 6.50 लाखापासून ते 10 लाखापर्यंत असणार आहे. यातील 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स असणारे 1.2 लीटरचे ड्युअल जेट पेट्रोल इंजिन जे एका लीटरमध्ये 22.38 किमी इतके मायलेज देऊ शकते.

वाचा: एथर रितझा पाण्यात उतरल्यावर काय झालं ? जाणून घ्या रितझाचे फिचर्स आणि किंमत

मारुती सुझुकी स्विफ्ट चौथी पिढीचे फिचर्स- स्पेसिफिकेशन

न्यू अपडेटेड या कारला स्पोर्टी लुक देण्यासाठी या कारच्या टॉप व्हेरिएंट मध्ये नव्याने डिझाइन केलेले पुढचे आणि मागचे बँपर, बोल्ड फ्रंट ग्रिल आणि LED हेडलाईटस याचा सेटअप दिला जाणार आहे. इंटीरियरमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेडअप डिस्प्ले, क्रुझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, ऑडियो सिस्टम,  LED फोगलँप- हेडलँप्स यासारखे इतर एडवांस्ड फिचर्ससुद्धा देण्यात आले आहेत. 

या कारच्या सेफ्टी-टेस्टमध्ये जपान NCAP कडून कारला 4 स्टार रेटिंगसुद्धा मिळाले आहेत, कारमध्ये असणाऱ्या  सेफ्टी फिचर्समध्ये 6 एयरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि 3 पॉईंट्स-सीटबेल्ट सारख्या गरजेच्या फिचर्सचा समावेश आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट बुकिंग

Maruti Suzuki New Car -swift 4th generation 2024 ची किंमत 10 लाखच्या आतमध्ये असून, तुम्हाला जर 4 स्टार सेफ्टी-रेटिंग असणाऱ्या कारचे बुकिंग अथवा टेस्ट राईड करायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकीच्या मूळ वेबसाईटवर भेट देऊन याची संपूर्ण माहिती मिळवू शकता. तुम्हाला जर तुमच्या जवळच्या डिलरबद्दल माहिती हवी असेल तर ती सुद्धा मारुती सुझुकी मेन वेबसाइटवर मिळू शकेल.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment