हार्दिक पांड्याची सर्वात महागडी कार, काय असेल किंमत आणि फिचर्स ? मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनच कार कलेक्शन

सध्या IPL ची चर्चा सगळीकडे असताना हार्दिक पांड्याचे नाव आवर्जून घेतलं जातंय, कारण क्रिकेटवर मैदानांवर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनची चर्चा त्याच्या खेळापेक्षा त्याच्या नव्या कारमुळे जास्त होतेय, ही कार आहे; Lamborghini Huracan EVO-लॅम्बोर्गिनी हुराकन ईव्हीओ.  तुम्हालासुद्धा Hardik Pandya’s Cars Collection & Price List ची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली माहिती वाचा.

हार्दिक पांड्याच्या कार कलेक्शन आणि किंमत यादी

हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेटर ब्रॅंडेड- लग्जरी कारसाठी प्रचंड वेडा आहे, हे त्याच्याकडे असणाऱ्या कारच्या कलेक्शनवरून लक्षात येताच, हार्दिकच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-एएमजी जी 63 ग्रँड एडिशन, रेंज रोव्हर वोग,रोल्स रॉयस फँटम आणि ऑडी A6 सारख्या कार्स चा समावेश आहे, पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी कार आणि Hardik Pandya New Car Collection मध्ये नव्याने सामावलेली लॅम्बोर्गिनी हुराकन ईव्हीओ आहे, जिची किंमत 5 करोड आहे, इतक्या महामोल्या कारमध्ये अश्या कोणत्या फिचर्स-स्पेसिफिक्शन्सचा समावेश आहे? सेफ्टी काय आहे? हे जाणून घेवूया.

वाचा: CSK च्या कॅप्टनला भुरळ पडली टाटाच्या या कारची, कारमधले बसल्यावर बसले आश्चर्याचे धक्के, हे बघा कारचे फिचर्स आणि किंमत.

Lamborghini Huracan EVO स्पेसिफिकेशन

एका इटालियन ऑटोमेकरने बनवलेली लॅम्बोर्गिनी हुराकन ईव्हीओ ही ऑटोमॅटिक ट्रांसमिशन कार असून दोन प्रवाशयांसाठी आहे. ही कार कूप बॉडी टाइप प्रकारातून असून, इंजिन 5204 cc चे आहे, ज्याला 80 लिटरची पेट्रोलची इंधन टाकी दिली गेली आहे. एक लीटर पेट्रोलमधून ही कार 7.25 किलोमीटरचे मायलेज देते. 6 सिलेंडर असणाऱ्या या कार ची बूट स्पेस 150 लिटरची आहे. 7 स्पीड गियरबॉक्स असणारी ही कार RWD म्हणजे रिअर व्हील ड्राइव आणि AWD म्हणजेच ऑल व्हील ड्राइव (वेरिएंटसनुसार) आहे. थोडक्यात हाय टेक ड्राइविंगचा अनुभव मिळेल अशी ह्या कारची जोडणी आहे.

वाचा: टाटा पंचला बसला पंच, नक्की काय झालं स्टेडियममध्ये? जाणून घ्या स्टेडियममधल्या पंच ईव्हीची किंमत, फिचर्स सर्व काही

हार्दिक पांड्याच्या कारचे फिचर्स

लॅम्बोर्गिनी हुराकन ईव्हीओमध्ये प्रवाशयासाठी आरामदायी वेंटिलेटेड सीट्स, एसी,एयर क्वालिटी कंट्रोल, आकर्षक इंटीरियरमध्ये लेदर सीट्स,लेदर स्टिअरिंग व्हिल्स, आउटसाईड टेम्परचर डिस्पे, बाहेरील बाजूस एडजस्टबल हेडलाईटस, रेन सेन्सिंग वायपर, आलोय व्हिल्स,DRL’s, LED हेडलँप्स-  टेललँप्स, रिमोट ट्रक ओपनर, ट्यूबलेस टायर्स, एंटरटेनमेंटसाठी CD प्लेअर, DVD प्लेयर, रेडिओ, स्पीकर्स, ब्लूटूथ कनेक्टिविटी, टच-स्क्रीन यांचा समावेश आहे. सुरक्षितेतीसाठी या कारमध्ये 4 एयर बॅग्सचा समावेश आहे शिवाय ओव्हरस्पीड वॉर्निंग, चाइल्ड लॉक, सिट-बेल्ट वॉर्निंग, स्पीड-सेन्सिंग डोअर लॉक, इमर्जन्सी ब्रेक लाइट, सेंट्रल लॉकिंगसारखी अधिक फिचर्स देण्यात आले आहेत.

वाचा: शुभम गिलचे कार कलेक्शन, महिंद्राची ही कार वापरतो क्रिकेटर

हार्दिक पांड्याच्या कारची किंमत

क्रिकेटर हार्दिक पांड्याकडे असणारी लॅम्बोर्गिनी हुराकन ही नारंगी म्हणजेच ऑरेंज रंगाची आहे, या रंगासोबत या कारमधून बियान्को कॅनोपस, बियान्को मोनोरस, रोसो रेड, अरान्सिओ बोरेलिस आणि वर्दे मँटिस सारखे इतर रंग उपलब्ध आहेत. या कारची किंमत 3.80 कोटी ( RWD – रिअर व्हील ड्राइव ) ते 4.40 कोटीपर्यंत ( AWD – ऑल व्हील ड्राइव) असून ही किंमत या कारच्या वेरिएंट्सवर अवलंबून आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment