CSK च्या कॅप्टनला भुरळ पडली टाटाच्या या कारची, कारमधले बसल्यावर बसले आश्चर्याचे धक्के, हे बघा कारचे फिचर्स आणि किंमत.

IPL 2024 मध्ये CSK च्या कॅप्टन ऋतुराज गायकवाडचा फैन फॉलोविंग बराच मोठा आहे. ऋतुराज गायकवाड हा क्रिकेटपटू चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट टीकडून खेळतो, पण सध्या ह्या बेस्ट इंडियन क्रिकेटरची चर्चा त्याच्या बॅटिंगसाठी नसून सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये ऋतुराजने टाटाच्या टियागोच्या टेस्ट ड्राइवचा अनुभव शेअर केला, आश्चर्याची गोष्ठ ही होती की जेव्हा ऋतुराज ह्या टियागो कारमध्ये बसला तेव्हा त्याला कार चालू झाली आहे याचसुद्धा अंदाज आला नव्हता. इतर कारच्या इंजिन आवाजाच्या तुलनेत या इलेक्ट्रिक कारमध्ये शांत आज एन करणाऱ्या बॅटरी पॅक आहे, हे कळल्यावर कारच्या इतर फिचर्सची माहिती जाणून घेण्याचा मोह ऋतुराजला आवरता आला नाही. तुम्हालासुद्धा या कारची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे का? वाचा टाटा टियागो ईव्हीची संपूर्ण माहिती खालील लेखात.

वाचा: उद्धव ठाकरें अजूनही चालवतात ही कार, काय असेल ह्या कारची किंमत आणि फिचर्स? वाचा संपूर्ण माहिती

सीएसके- ऋतुराज गायकवाड आणि टाटा टियागो ईव्ही

महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट टीमची सर्व सूत्रे ऋतुराज गायकवाड यांच्याकडे दिली आहेत तर 2008 पासून Csk चे ओनर म्हणजे मालक एन. श्रीनिवासन आहेत. सध्या ऋतुराज गायकवाडचा टाटाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये बसल्यावर आलेला अनुभव सर्वत्र पसरतोय. ज्यामध्ये ऋतुराज इलेक्ट्रिक टियागो कारमध्ये बसल्यावर कार चालू झाली आहे की नाही याचा अंदाजच लावता आला नाही. त्यामुळे सीएसके कॅप्टन थोडा शॉक होऊन कारच्या संपूर्ण माहितीसाठी जसे फिचर्स, स्पेसिफिशन जाणून घेण्यासाठी इच्छुक झाला.

वाचा: शुभम गिलचे कार कलेक्शन, महिंद्राची ही कार वापरतो क्रिकेटर

याआधीसुद्धा ऋतुराज गायकवाड आणि टाटाची टियागो कार यांची यांची क्रिकेटच्या स्टेडियमवर एकमेकांशी टक्कर झाली होती. लखनऊ जायंट विरोधात ऋतुराजने जेव्हा त्याच्या दिशेने येणाऱ्या बॉलला असे काही झिडकारले ज्याच्या परिणामे बॉलने थेट षटकार मारत स्टेडियममधल्या टाटा टियागोच्या दिशेने वेग झेप घेतली आणि टाटा टियागो ईव्हीच्या दाराला लागून चक्क दारावर डेंट पडलं.

वाचा: टाटा पंचला बसला पंच, नक्की काय झालं स्टेडियममध्ये? जाणून घ्या स्टेडियममधल्या पंच ईव्हीची किंमत, फिचर्स सर्व काही

टाटा टियागो ईव्ही माहिती

एका चार्जमध्ये 250- 315 किलोमीटरची रेंज देणारी ही टाटाची कार 11.89 लाखामध्ये उपलब्ध आहे. इतका मोठा पल्ला गाठण्यासाठी कारमध्ये 19.2 – 24 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो चार्ज होण्यासाठी 58 मिनिटे लागतात. ज्यावेळेस ऋतुराजला या कारच्या बॅटरी पॅकची माहिती देण्यात आली , तेव्हा ऋतुराज आश्चर्यचकित होऊन म्हणाला की, एवढ्या चार्जमध्ये तो पुण्यातून लोणावळ्याचा परतीपर्यंतचा प्रवास आरामात करू शकेल. कारची इतर माहिती देता, कारमधले ट्रांसमिशन ऑटोमॅटिक असून कारच्या सेफ्टी फिचर्समध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, एयरबॅग्स, चाईल्ड सेफ्टी लॉक सारखे इतर एडवांस्ड फिचर्स दिले आहेत.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment