24 लाखाच्या महिंद्राच्या ह्या कारमध्ये अस दडलंय तरी काय ? महिंद्रा XUV700 चे आले अपडेटेड वर्जन, ही वाचा संपूर्ण माहिती

Aishwarya Potdar

यंदा महिंद्रा एक से बढकर एक  SUV लाँच करत आहे, नुकतीच महिंद्राची सर्वात मोठं सनरूफ असणारी आणि 8 लाखच्या आतमध्ये मिळणारी MAHINDRA XUV 3XO ही SUV लाँच केली आणि आता यानंतर लगेच या कंपनीने त्याच्या नव्या मिड-साईझ एसयुव्हीला सुद्धा लाँच केले आहे, जिचं नाव Mahindra XUV700 Blaze Edition हे आहे. 24 लाखापासून सुरू होणाऱ्या ह्या कारची खासियत म्हणजे मॅट फिनिशिंग असणारा कारचा रंग आणि कारमधल्या दुसऱ्या रांगेत मिळणारे ISOFIX Child seat. या कारच्या किंमतीसंबंधित, टेस्ट-रायिड अथवा  बुकिंगबद्दल संपूर्ण माहितीसाठी खालील लेख वाचा.

महिंद्रा XUV700 vs महिंद्रा XUV700 ब्लेझ एडिशन 

महिंद्राच्या XUV 3XO नंतर सर्वात जास्त इंटरनेटवर सर्च केलेली कार म्हणजे महिंद्रा XUV700, ही कार या कंपनीची टॉप सेलर म्हणून सुद्धा ओळखली जाते. कमालीचे फिचर्स, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लुक अशी जोडणी असणारी ही कार आता नव्या अपडेट सोबत बाजारात उतरली आहे, हे अपडेट महिंद्रा XUV700 ब्लेझ एडिशन आहे. 

ही कार 3 वेरिएंट्स मधून उपलब्ध असून याला पेट्रोल इंजिनसोबत डिझेल इंजिनचा पर्याय सुद्धा मिळाला आहे. ह्या 7 सीटर कारची किंमत वेरिएंट्स नुसार वेगवेगळी आहे. ह्या अपडेट मध्ये केवळ कॉस्मेटिक दृष्टिकोनातून बदलले आहे म्हणजेच ह्या कारचा रंग, व्हिल्स, फ्रंट ग्रिल आणि काही ठराविक फिचर्स सोडल्यास इंजिन Mahindra xuv 700 प्रमाणेच आहे.

वाचा: Mahindra XUV 3XO: सर्वात मोठं सनरूफ असणारी तेही 8 लाखच्या आतमध्ये मिळणारी महिंद्राची ही कार, वाचा संपूर्ण माहिती आणि करा बुकिंग पटकन

नवं काय आहे Mahindra xuv 700 Blaze Edition मध्ये?

तुम्ही जर Mahindra xuv 700 पहिली असेल, चालवली असेल तर तुमच्या लक्षात येईल की, लुक सोडला तर महिंद्रा XUV700 ब्लेझ एडिशन मध्ये बदलेलं अस काहीचं नाहीये पण तरीही ब्लेझ एडिशन हे महिंद्रा XUV700 पेक्षा अधिक आकर्षक दिसतेय आणि याच कारण आहे, कारला मिळालेला ‘कॉस्मेटिक अपडेट’, ज्यामध्ये या कारला मिळालेला मॅट ब्लेझ लाल रंग आणि डार्क ब्लॅक कलरचे फ्रंट ग्रिल, रूफ, रिअर व्ह्यू मिरर आणि आलोय व्हिल्स. या कारमध्ये ब्लॅक इंटीरियर सोबत लाल रंगातून शिवलेले काळ्या रंगाचे सीट्स अधिक आकर्षक आणि स्पोर्टी दिसतात. याचसोबत या कारमध्ये दुसऱ्या रांगेत मिळणारे ISOFIX Child seatसुद्धा देण्यात आले आहेत.

वाचा: ओला स्कूटर झाल्या स्वस्त, ओलाने दिला डिस्काउंट, हे आहे या मागच कारण !

महिंद्रा XUV700 ब्लेझ एडिशन इंजिन

महिंद्रा XUV700 ब्लेझ एडिशनमधले 2.0 लिटरचे टर्बो-चार्जड पेट्रोल इंजिन 200 hp इतकी पॉवर आणि 380 Nm इतका टॉर्क जनरेट करते तर 2.2 लिटरचे डिझेल इंजिन 185 hp इतकी पॉवर आणि 420 Nm इतका टॉर्क जनरेट करते, 6 गियरसोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमधून ही कार उपलब्ध आहे. AWD म्हणजेच ऑल व्हील ड्राइव असणाऱ्या महिंद्रा XUV700 च्या तुलनेत ब्लेझ एडिशनला FWD म्हणजेच फ्रंट व्हील ड्राइव हाचं पर्याय असणार आहे. 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स असणाऱ्या ह्या कारमध्ये 7 लोक आरामात प्रवास करू शकतात.

वाचा: टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश शिवाय टाटा टियागो ईव्हीवर मिळतोय डिस्काउंट

या कारची किंमत वेगवेगळ्या वेरिएंट्सवर अवलंबून आहे, यातील AX7 L पेट्रोल AT 7 सीटर व्हेरिएंटची किंमत 25.54 लाख, AX7 L डिझेल MT 7 सीटर व्हेरिएंटची किंमत 24.24 लाख तर AX7 L डिझेल AT 7 सीटर व्हेरिएंटची किंमत 26.04 लाख रुपये इतकी आहे. तुम्हाला जर ह्या कारची टेस्ट रायीड घ्यायची असेल किंवा कार चे बुकिंग करायचे तर तुम्ही तुमच्या जवळच्या महिंद्रा शोरूमला भेट देऊ शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment