पंकज त्रिपाठीच्या भावोजींचा ओव्हरस्पिडिंगमुळे मृत्यू, या कारमधून करत होते प्रवास, ओव्हरस्पिडिंग कंट्रोल करा अश्या प्रकारे

Pankaj tripathi Sibling-in-law Accident: नेटफ्लिक्सस्टार आणि अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या बहीण- भावोजी यांचा नुकताच कार अक्सिडेंट झाला आहे, ज्यामध्ये पंकज त्रिपाठी यांचे भावोजी- राकेश तिवारी ह्यांचा मृत्यू झालं आहे, तर बहिणीची- सबिता तिवारी यांची गंभीर अवस्था आहे. हा अपघात पंकज त्रिपाठीचे कुटुंब मारुतीच्या कारमधून प्रवास करत असताना झाला असून, हा अपघात नक्की का झाला? अपघात कोणत्या कार मध्ये झाला? तांत्रिक बिघडामुळे की ओव्हरस्पीडिंगमुळे? अपघात कसे टाळू शकतो? ओव्हरस्पीडिंग करताना कोणत्या खबरदारी लक्षात घेणं गरजेचं आहे? ह्या सर्व बातमीचा पाठपुरावा करणारी संपूर्ण माहिती सदर लेखात मिळेल.

वाचा: जगातली पहिली ऑटोमॅटिक ओलाची स्कूटर, ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या ओला सोलोची संपूर्ण माहिती

काय आहे पंकज त्रिपाठी रस्ता अपघात व्हिडिओमध्ये? 

सध्या इंटरनेटवर हाहाकार माजवणारी एकच बातमी सगळीकडे दिसत आहे आणि ती बातमी म्हणजे पंकज त्रिपाठीच्या कुटुंबीयांचा रस्ता अपघात, हा अपघात व्हिडीओ ठिकठिकाणी दिसत असून, व्हिडिओमार्फत अपघात हा ओव्हरस्पीडिंग मुळेच झाला आहे, हे दिसून येत. या व्हिडिओमध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट कार मधून राकेश तिवारी- सबिता तिवारी झारखंड मध्ये प्रवास करत असताना अचानक झालेल्या ओव्हरस्पीडिंग मुळे रोड वर असणाऱ्या डिवायडर ला जाऊन धडकली, आणि ही धडक इतक्या वेगाची होती ज्याच्या परिणामे पंकज तिवारीच्या भावोजींचा जागीच मृत्यू झाला, तर बहीण गंभीर जखमी झाली. व्हिडिओमध्ये स्पष्ठ दिसत होत, की भर बाजारपेठेत ही कार भरधाव वेगाने धावत होती. आजूबाजूला लोक असूनदेखील ओव्हरस्पीडिंगमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.

वाचा: आत्तापर्यंतची ‘हायेस्ट- रेंजवाली’ BYD इलेक्ट्रिक कार, एका दिवसात 300 पेक्षा जास्त बुकिंग, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मारुती सुझुकीची स्विफ्ट कारच्या ओव्हरस्पीडिंगमुळे घडला अनर्थ

पंकज त्रिपाठीचे कुटुंब मारुतीच्या स्विफ्टमधून बिहारमधून पश्चिम बंगाल येथे प्रवास करत होत. ह्या कारची किंमत ९ लाख इतकी असून, ही कार मार्फत एका लीटरमध्ये २२-३० किमी इतके मायलेज मिळते. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय ह्या कारमध्ये मिळतो. नुकतीच मारुती सुझुकीची चौथ्या पिढीची स्विफ्ट म्हणजे ४th janaration स्विफ्ट लाँच झाली असून, ह्या कारला NCAP क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाले आहे. अद्यावत आणि सेफ्टी फिचर्सने भरपूर असूनही कारचा अपघात झाला आणि प्रवासी गंभीर झाले, तर काही मृत्युमुखी पडले, आणि ह्याच कारण एकमेव आहे; ओव्हरस्पीडिंग. जर तुम्हीसुद्धा कार अति वेगाने चालवत असाल तर अपघात घडणाऱ्या काही गोष्टींची खबरदारी नक्की घ्यायला हवी.

वाचा: ओला S1 प्रो वर मिळतोय 25 हजार डिस्काऊंट, ऑफरचा लाभ कसा घ्यावा जाणून घ्या

अपघात टाळण्यासाठी या गोष्टी पाळा

  1. उन्हाळ्यातील भर उन्हात लांबच्या पल्ल्याचा प्रवास करताना, थोडे थोडे ब्रेक घेत प्रवास करा.
  2. गाडीत बसताना सर्वात आधी सीटबेल्ट लावा.
  3. गाडी चालवत असताना दुर्लक्ष करतील अश्या गोष्टी वापरणे-बघणे टाळा. 
  4. मद्यपान करून वाहन चालवणे गुन्हा आहे.
  5. गाडीमध्ये क्षमता असेल इतकेही प्रवासी बसवा.
  6. घाईच्या नादात कार-दुचाकी-वाहने अतिवेगाने चालवणे अतिशय स्वतःसाठी  आणि इतरांसाठी  धोक्याचे असते. ओव्हरस्पिडिंग टाळा.
  7. गर्दीच्या- वस्तीच्या ठिकाणी कारचा स्पीड कमी करा.
  8. वारंवार तुमच्या वाहनांची लेन बदलू नका.

 

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment