आत्तापर्यंतची ‘हायेस्ट- रेंजवाली’ BYD इलेक्ट्रिक कार, एका दिवसात 300 पेक्षा जास्त बुकिंग, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

BYD India ने नवीन BYD Seal नावाची प्रिमियम सिडॅन कार लाँच केली आहे, जी फक्त पंधरा मिनिटाच्या चार्जमध्ये 200 किलोमीटर पेक्षा अधिक पल्ला गाठते. बीवायडी सिलची किंमत 45 लाखाच्या आत असून यामध्ये तीन वेरिएंट्स आहेत; डायनॅमिक, प्रीमियम आणि परफॉर्मन्स. तुम्ही जर 700 किमीपेक्षा अधिक रेंज देणारी आणि कमाल फीचर्सने भरपूर्ण असणाऱ्या आकर्षक स्पोर्ट्स कारच्या शोधात असाल, तर BYD Electric Seal हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

BYD च्या लाइनअप मधील हि कार तिसरी असून याआधी e6 आणि ATTO3 हि या कंपनीची आलिशान वाहने बाजारात उपलब्ध आहेत. सिल कारची बुकिंग प्रक्रियासुद्धा अतिशय सोप्पी आहे, शिवाय या कारच्या बुकिंग प्रोसिजरवर कमालीची ऑफर मिळत आहे, चला जाणून घेवूया या सिडॅन बदलाची संपूर्ण माहिती.

BYD Seal 2024

या प्रीमियम कारमध्ये असणाऱ्या तीन प्रकारांमधील बॅटरी पॉवर आणि टॉर्क जनरेट करण्याची क्षमता वेगवेगळी आहे, यामधील डायनेमिक व्हेरिएंट 201 bhp तर 310 Nm टॉर्क जनरेट करते,प्रीमियम व्हेरिएंट 308 bhp तर 360 Nm टॉर्क जनरेट करते, परफॉर्मेंस व्हेरिएंट 523bhp आणि 670Nm टॉर्क जनरेट करते. या सेडान कारमध्ये अरोरा व्हाईट ,अटॅलॉसिस ग्रे , कॉसमॉस ब्लॅक आणि आर्टिक ब्लू हे रंग पर्याय दिले आहेत.

या इलेक्ट्रिक सिडॅन कारला ANCAP आणि NCAP च्या क्रॅश टेस्ट मध्ये 5 स्टार सेफेटी रेटिंग मिळाले असून, सेफ्टीसाठी कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, ड्युअल फ्रंट एअरबॅक्स,साइड एअरबॅग्ज- सेंटर एअरबॅग, लेन असिस्ट सिस्टम आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग असे सिस्टीम इमर्जन्सी ब्रेकिंग यांचा समावेश आहे .या कारमध्ये मनोरंजनासाठी रेडिओ, पुढचा स्पीकर-मागचा स्पीकर, वायरलेस फोन चार्जिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 15.6 इंच ची टचस्क्रीन ज्याला ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीचा पर्याय मिळतो तसेच 60:40 स्प्लिट-फोल्डिंग मागील सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री याचसोबत डबल झोन ​​एसी, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि ऑटो-डिमिंग IRVM यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

वाचा: तुमची आवडती टाटा एसयुव्ही आता ‘डार्क एडिशनमधून’ उपलब्ध, हे घ्या नवे फिचर्स आणि किंमत

बीवायडी सिलच्या प्रीमियम कारमध्ये एक इलेक्ट्रिक इंजिन मिळते, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध आहे. ही गाडी पाच सीटर असून या गाडीचा विलबेस 2920 मिमी इतका आहे, रुंदी 875 मिमी तर लांबी 4800 मिमी इतकी आहे. या गाडीचा संपूर्ण बूट्स्पेस 400 लिटरचा आहे, गाडीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये या गाडीत पॉवर स्टेअरिंग, अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम, ड्रायव्हर-प्रवासी एअरबॅक, आलोय व्हील्स, इंजिन स्टार्ट आणि स्टॉप बटन, पॉवर विंडोज, एसी, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील यांचा समावेश आहे.

वाचा: तुफान कमाई केली होंडाने, पाहा Honda 2W विक्री-अहवाल

बीवायडी सिल इलेक्ट्रिक कारच्या रेंज बाबतीत आणि बॅटरी बाबतीत माहिती देता, या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन बॅटरी ऑप्शन मिळतात; पहिला ऑप्शन 61.4 kWh बॅटरी पॅक आहे तर दुसरा ऑप्शन हा ८२.५ kWh बॅटरी पॅकचा आहे. ही कार एका चार्जमध्ये 650 किलोमीटर अंतर पार करू शकते. या कारमधल्या बॅटरी पॅकची 8-वर्षे/1.6 लाख किमी वॉरंटी इतकी आहे, सोबत कारमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर आणि मोटर कंट्रोलरची 8-वर्षे किंवा 1.5 लाख किमी वॉरंटी मिळते.

वाचा: आणि अचानक बाहेर पडले रेनॉल्टचे ‘सिक्रेट मॉडेल’ कमी किंमत शिवाय 400Km पेक्षा जास्त रेंज देणारी ईव्ही

या कारच्या व्हेरिएंट वाईज किंमतीबाबतीत जर माहिती द्यायची म्हटली, तर डायनॅमिक रेंजची किंमत 41 लाख रुपये ,प्रीमियमची किंमत 45.55 लाख रुपये आणि परफॉर्मन्सची किंमत 53 लाख इतकी आहे. जर तुम्ही  31 मार्च 2024 पर्यंत या गाडीसाठी बुकिंग केलं, तर तुम्हाला ऑफर्सचा लाभ मिळू शकणार आहे,  ज्यामध्ये 7 kW होम इन्स्टॉल चार्जर,  3 kW पोर्टेबल चार्जिंग बॉक्स,  व्हेईकल टू लोड पावर सप्लाय युनिट आणि सहा वर्षांची रोड साईड असिस्टंट सर्विस सारखे फायदे समाविष्ट आहेत.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment