तुफान कमाई केली होंडाने, पाहा Honda 2W विक्री-अहवाल

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर्स इंडियाने फेब्रुवारी 2024 मधील Honda 2W विक्री-अहवाल नुकताच जाहीर केला, ह्या विक्री-चार्ट्समध्ये होंडा YoY आणि MoM मध्ये चांगली वाढ दिसून आली शिवाय होंडाच्या निर्यातीत मोठा फायदा झाला आहे. खाली लेखात जाणून घेयूया होंडाच्या दुचाकी वाहनांच्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल एक्सपोर्ट वार्षिक आणि मासिक सेल. Honda 2W sales (Domestic+Exports)

होंडा दुचाकी YoY विक्री सेल

फेब्रुवारी 2023 मध्ये देशांतर्गत पातळीवर होंडाच्या दुचाकी वाहनांची 2,27,64 वाहनांची विक्री झालेली असून फेब्रुवारी 2024 मध्ये 4,13, 967 वाहने विकली गेलेली आहे; फेब्रुवारी 2023 च्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये तब्बल 82.31 टक्क्याने म्हणजेच 1,86,903 वाहने एक्स्ट्रा विकली गेली आहेत.

फेब्रुवारी 2023 मध्ये होंडाने जवळपास 20,1111 वाहने देशाबाहेर एक्सपोर्ट केलेले असून, फेब्रुवारी 2024 मध्ये हाच आकडा 44,744 वर गेलेला आहे. जवळपास 122.29 टक्क्याने जास्त वाहने फेब्रुवारी 2023 च्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये विकली गेली आहेत. इयर ओव्हर इयर मध्ये होंडा दुचाकीची फेब्रुवारी 2023 मध्ये 2,47,175 युनिट्सचा सेल झाला असून, फेब्रुवारी 2024 मध्ये हा आकडा 4,58,711 वर गेलेला आहे. तब्बल 85.58 टक्क्यांनी होंडा टू-व्हीलरची विक्री-वाढ झालेली आहे.

वाचा: Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

होंडा दुचाकी MoM विक्री सेल

जानेवारी 2024 मध्ये होंडा टू-व्हीलर च्या 3,82,512 युनिटची विक्री झालेली होती त्याच तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 4,13,967 युनिट्स विकले गेले होते हे युनिट्स डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत पातळीवर विकले गेलेले असून मंथ-ओवर-मंथ म्हणजे मासिक विक्री-सेल तब्बल 8.22 टक्क्यांनी वाढला आहे.

होंडा ने जानेवारी 2024 मध्ये 36 हजार 883 वाहने एक्सपोर्ट केलेले असून फेब्रुवारी 2024 मध्ये हीच संख्या तब्बल 44 हजार 744 वर गेली होती जवळपास मागील महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 21.31 टक्क्यांनी होंडा चा विक्री सेल वाढलेला आहे.

इयर-ओव्हर-इयर ग्रोथ सेलमध्ये होंडा ने तब्बल 85.58 टक्क्याने जास्त वाहने विकलेले असून मंथ-ओवर-मंथ च्या ग्रोथ सेलमध्ये जवळपास 9.37 टक्क्यांनी होंडाच्या टू-व्हीलरचा सेल वाढलेला आहे.

वाचा: AI च्या मदतीने बनली Honda ची जाहिरात, ‘या’ तीन होंडा SUV वर वापरला AI इफेक्ट

होंडाची आगामी स्पोर्टबाईक-Honda CB350

यंदाच्या पार पडलेल्या भारत मोबिलिटी एक्सपो 2024 मध्ये होंडाने विविध उत्पादनांना सादर केलेले आहे, ज्यामध्ये होंडा इलेक्ट्रिक स्कूटरचा मोटरसायकलचा समावेश होता तसंच होंडा कार्स इंडिया लिमिटेड लवकरच Elevate SUV इलेक्ट्रिक व्हर्जन भारतीय वाहन बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत सुद्धा आहे.

होंडा नवीन स्पोर्ट मोटरसायकल वर सुद्धा काम करत आहे, याची माहिती होंडाच्या लिंक झालेल्या पेटंट स्केचवरून मिळालेली असून लवकरच ही स्पोर्ट मोटरसायकल बाजारात उपलब्ध होणार आहे. ह्या होंडाच्या नवीन स्पोर्ट मोटरसायकलची तुलना थेट रॉयल इनफिल्ड हिमालयांशी केली जाऊ शकते, या स्पोर्ट सायकलची किंमत सुमारे 2 लाख एक्स शोरूम असण्याची शक्यता आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment