AI च्या मदतीने बनली Honda ची जाहिरात, ‘या’ तीन होंडा SUV वर वापरला AI इफेक्ट

होंडाने काळानुसार बदल करत एलिव्हेटची जाहिरात बनवताना AI ची मदत घेतली आहे, ज्यामध्ये होंडा एलिव्हेट SUV अजूनच स्टाइलिश आणि कम्फर्टेबल लूकने आकर्षित करते. ‘चेजिंग ग्रेटनेस’ नावाच्या होंडाच्या नवीन जाहिरातीमध्ये नवीन TrailSport SUV मॉडेल्स दिसून येतात. संपूर्ण जाहिरात व्हिडिओमध्ये ऑटोमोबाईल निर्मात्याने AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या टेकनॉलॉजीचा वापर केला आहे.

होंडा एलिव्हेट AI-निर्मित ऑटोमोटिव्ह मास्टरपीस

होंडाने एलिव्हेटच्या नवीन जाहिरातीसोबत सोशल मीडियावर पोस्ट टाकत सांगितले की, तुम्हाला मोकळेपणाने हलवून, तुमच्या साहसांसाठी नेहमी तयार. होंडा एलिव्हेट तुम्हाला तुमची अनोखी शैली, ‘अर्बन फ्रीस्टाइलर’ चे खरे रूप व्यक्त करण्यास अनुमती देते. सोबत होंडा एलिव्हेट ला खरेदी करण्याची कारणे म्हणून ‘तुमची निवड वाढवा, होंडा एलिव्हेट तुमच्या सक्रिय आणि आधुनिक जीवनशैलीशी सुसंगतपणे डिझाइन केलेले आहे.’ ही वाक्य मेन्शन केलं आहे.

सोबत होंडा सेन्सिंग बाबतीत माहिती देत लिहिले,  Honda SENSING ही एक प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आहे जी तुम्हाला सुरक्षित ड्रायव्हिंग साध्य करण्यासाठी डिझाइन केली आहे. हे अपघातांचा धोका कमी करते आणि काही प्रकरणांमध्ये, टक्कर टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हस्तक्षेप करते.

वाचा: यामाहा मोटरने ‘देशी इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअपला’ दिला, 335 कोटी रुपयांचा निधी

होंडा एलिव्हेट जाहिरात

होंडा एलिव्हेट ने जाहिरातीमध्ये तीन नवीन TrailSport SUV मॉडेल्सला दाखवला आहे, हे मॉडल्स पासपोर्ट, पायलट आणि रिजलाईन आहेत. ह्या 15-सेकंदाच्या जाहिरातीला ‘चेजिंग ग्रेटनेस’ नाव दिल आहे. हा व्हिडिओ कॅलिफोर्निया (यूएस) येथे शूट करण्यात आला असून, व्हिडिओमध्ये होंडाची SUV बर्फाच्छादित लँडस्केपमधून धुळीत, उंच खडकावर आणि खडबडीत जमीनिवर धुळीने माखलेल्या ट्रॅकला आणि डर्ट बाईकला टक्कर देत पळताना दिसून येते. या जाहिरातीसाठी ब्रिटीश गायक-गीतकार बिशप ब्रिग्जचा ट्रायम्फ हा साउंडट्रॅक वापरला आहे.

वाचा: पाच मिनिटाला एक अशी ह्युंदाईची ही एसयुव्ही विकली जातेय, केला १ मिलियन विक्रीचा टप्पा पूर्ण

अल्फा-बोल्ड सिग्नेचर ग्रिल, ड्युअल ट्रेल्स सह एलईडी टेल लॅम्प्स, इंटिग्रेटेड एलईडी डीआरएल आणि टर्न इंडिकेटरसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, R17 ड्युअल-टोन डायमंड-कट ॲलॉय व्हील, एलईडी टर्न सिग्नलसह ऑटो-फोल्ड डोअर मिरर, एलईडी प्रोजेक्टर फ्रंट फॉग लॅम्प्स, टॉप क्लास ग्राउंड क्लिअरन्स या डिझाईनचा समावेश आहे.

वाचा: बजाज पल्सर 1000 एफ, जी पार करते 100 Kmh अंतर फक्त 3 सेकंदात

होंडा एलिव्हेट वैशिष्ट्ये

या कारच्या अडवांस फिचर्समध्ये 17.7 सेमी (7 इंच) एचडी पूर्ण रंगीत TFT MID मीटर, 26.03 सेमी (10.25″) प्रगत HD टचस्क्रीन डिस्प्ले ऑडिओ, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी – Apple CarPlay® & Android Auto™, 8-स्पीकर प्रीमियम सराउंड साऊंड सिस्टम आणि वायरलेस स्मार्ट फोन चार्जरचा समावेश आहे.

सोबत वन-टच इलेक्ट्रिक सनरूफ, रिमोट इंजिन स्टार्ट (फक्त CVT), पीएम 2.5 केबिन एअर प्युरिफायिंग फिल्टर, MAX COOL मोडसह पूर्णपणेऑटोमैटिक क्लायमेट कंट्रोल, एक-पुश इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, मागील AC व्हेंट्स
टेलिस्कोपिक आणि टिल्ट स्टीयरिंग एडजस्टमेंट, किमान वळण त्रिज्या (5.2मी) हेसुद्धा अत्याधुनिक फिचर्स या कारमधून मिळतात. प्रवाश्यांच्या सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्ज या कारमध्ये मिळतात.

होंडा एलिव्हेट AI-निर्मित इंजिन

न्यू होंडा एलिव्हेट SUV मध्ये 1498 सीसी इंजिन देण्यात आले आहे. जे कमाल 145 Nm टॉर्क जनरेट करते. CVT मध्ये 16.92 किमी/लिटरचे तर MT 15.31 km/लिटर इतके मायलेज मिळते.

होंडा एलिव्हेट रंग पर्याय आणि किंमत

Elevate मध्ये फिनिक्स ऑरेंज पर्ल, ऑब्सिडियन ब्लू पर्ल, रेडियंट रेड मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाईट पर्ल, गोल्डन ब्राऊन मेटॅलिक, लूनर सिल्व्हर मेटॅलिक, मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक, फिनिक्स ऑरेंज पर्ल विथ क्रिस्टल प्लेटिनम, ब्लॅक पीयरल क्रिस्टल ब्लॅक पर्ल रूफसह, क्रिस्टल ब्लॅक पर्ल रूफसह रेडियंट रेड मेटॅलिक हे रंगाचे ऑप्शन दिले गेले आहेत.

Honda Elevate ची किंमत 11 लाख ते 16 लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.  Elevate 7 प्रकारात उपलब्ध आहेत; ZX CVT, ZX MT, VX CVT, VX MT, V CVT, V MT ,SV MT. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16 लाख आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment