Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

Ajinkya Sidwadkar

जपानी ऑटोमेकर पण भारतात सर्वाधिक लोकप्रिय कंपनी होंडा ने २०२४ साठी त्यांचा प्लॅन रेडी करून ठेवला असून दुचाकी बाईक आणि स्कूटरची रोमांचक लाईनअप आहे.

कंपनी त्यांच्या तीन बाईकची अद्ययावत फेसलिफ्ट लाँच करणार असून EV क्षेत्रात एक स्कूटर लाँच करणार असून यामध्ये बहू प्रतिक्षीत, बहू चर्चित अशी अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर चा समावेश असणार आहे. या लेखात इलेकट्रीक होंडा ऍक्टिवाच्या लाँच तारिख आणि स्पेसिफिकेशन बद्दल माहिती मराठी मध्ये सांगणार आहोत.

अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच डेट

काही दिवसांपूर्वी आम्ही होंडा इलेकट्रीक ऍक्टिवाचा सविस्तर लेख लिहिला होता, त्या पुढे आता ई-ऍक्टिवा बद्दल काही नवीन खुलासे झाले आहेत.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Honda Activa 6G या स्कूटर सह पेट्रोल स्कूटर सेगमेंटमध्ये होंडा आधीच वर्चस्व गाजवत आहे. आता, कंपनी पुढचे व्हिजन लक्ष्यात घेऊन आणि झपाट्याने वाढणाऱ्या इलेकट्रीक वाहनांचे मार्केटचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट स्कूटर “ऍक्टिवा” या गाडीचे इलेकट्रीक व्हर्जन ९ जानेवारी २०२४ रोजी लाँच करणार असल्याचे वृत्त आहे.

Honda SCe Concept 1 1260x709 1

ई-ऍक्टिवा बॅटरी आणि मोटर

ई-ऍक्टिवा ला ब्रँड ने SC e मॉडेल म्हणून प्रेसेंट केले आहे. या मॉडेलला सांगितलेल्या रेंजची माहिती अशी, या ई स्कूटरमध्ये ड्यूल बॅटरी सेटअप दिला आहे ज्यामध्ये 1.3kWh क्षमतेच्या 2 रिमोव्हेबल बॅटरी सेटअप दिला जाणार आहे जो दोन्ही मिळून 2.6kWh होतो. अद्याप या बॅटरी वर किती रेंज मिळेल साची माहिती मिळाली नाही पण मार्केट अनुसार ८५ ते ९० किमी रेंज मिळू शकते आणि उत्तम मोटर या गाडीत दिली जाणार आहे ज्यामाउळें १०५ किमी प्रति तास स्पीड दिले जाईल.

वाचा – होंडाची पहिली EM1 इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लाँच, सर्व माहिती आली समोर

कंपनी मोठा बॅटरी पॅक देऊन मूळ गाडीची किंमत वाढू न देता बॅटरी स्वॅप या तंत्रज्ञानाला महत्व देत आज ज्याने बॅटरी स्वॅप करून हि गाडी अनलिमिटेड धावत राहील.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment