होंडाची पहिली EM1 इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लाँच, सर्व माहिती आली समोर

“Honda Activa” इलेकट्रीक अवतारात येण्या आधी Activa EM1 e Scooter भारतीय मार्केट मध्ये होंडा तर्फे लाँच होणार आहे. जर तुम्ही Active इलेकट्रीक ची वाट पाहत होता तर आता तुम्हाला थोडं थांबावं लागेल आणि EM1 e Scooter चा पर्याय तुमच्यासाठी खुला असेल. कशी आहे होंडा ची EM1 e Scooter? काय आहे यामध्ये खास? चला जाणून घेऊया आपल्या या लेखात.

Honda Activa Electric Scooter Launch Date

होंडा वर्ल्डवाईड टोटल १० इलेकट्रीक स्कूटर लाँच करणार आहे. त्यातल्या किती भारतात येतील यावर शंका आहे पण EM1 e आणि ऍक्टिवा इलेकट्रीक भारत लाँच होणार हे नक्की. EM1 e हि स्कूटर entry-level EV असून सिटी राईड किंवा छोट्या राइड्स साठी डेव्हलोप केली गेली आहे.

कंपनीने हि गाडी किशोरवयीन आणि कॉलेज स्टुडंट्स यांना कन्सिडर करून बनवली आहे. या स्कूटर मध्ये होंडा चा MPP platform टेकनॉलॉजि चा वापर केला आहे. होंडा MPP म्हणजे Honda Mobile Power Pack ज्यामध्ये रिमूव्हेबल बॅटरी पॅक दिला जातो ज्याने जवळच्यास्वॅप स्टेशनवर  वर जाऊन बॅटरी स्वॅप केली जाऊ शकते.

वाचा – Honda Activa Electric Scooter जानेवारी मध्ये होणार लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड

Honda Activa EM1 Range

EM1 e मध्ये कंपनी नुसार एका चार्ज मध्ये ४० कमी ची रेंज क्लेम केली जाते, ५० km चे टॉप स्पीड या स्कूटर मध्ये दिले गेले आहे. em1 चे इतर स्पेसिफिकेशन्स रिव्हिल केले गेले नाहीत पण. गाडीमध्ये BLDC मोटर दिली जाईल. BLDC ची लाईफ मिड ड्राईव्ह पेक्षा खूप कमी असते पण गाडीची किंमत कमी ठेवण्यासाठी BLDC मोटर दिली आहे. पाठी मागे ड्रम आणि पुढे डिस्क ब्रेक दिला जाईल. फ्रंट व्हील १२ इंच तर रिअर व्हील १० इंच असेल. पुढे ट्विनटेलिस्कोप सस्पेन्शन आणि मागे हायड्रॉलिक सस्पेन्शन दिले जाईल. डिस्प्ले टच स्क्रीन नसून ब्लॅक अँड व्हाईट दिला जाईल ज्यामध्ये निळी लाईट असेल.

गाडीची संपूर्ण डिजाईन प्रॅक्टिकल मोपेड टाईप असेल. दोन व्यक्ती बसतील असे सीट असेल. रिमूव्हेबल बॅटरी सीट खाली दिली असल्याने बूट स्टोरेज अगदी नावा पुरता मिळेल. फूट बोर्ड होंडा ने ऍक्टिव्ह प्रमाणेच फ्लॅट दिला असल्याने त्यावर ग्रोसरी किंवा इतर सामान ठेवता येईल. हेड लॅम्प सेटअप LED दिला आहे सोबत DRLs सुद्धा दिला जाईल.

वाचा – Top 5 EV Scooters in 2023- या वर्षा अखेरीस लाँच होणाऱ्या ‘टॉप ५’ इलेक्ट्रिक स्कूटर

सर्वात महत्वाचा प्रश्न कि गाडी कधी विक्री साठी येईल. सध्या देशातील ठराविक शहरात होंडा चे स्वॅप स्टेशन्स उभे होत आहेत. त्यामुळे स्वपिंग स्टेशन्स, गाडी येई पर्यंत रेडी होतील. गाडीची अचूक लाँच डेट रिव्हिल केली गेली नाही पण ग्लोबल मार्केट मध्ये एप्रिल २०२४ पर्यंत गाडी मार्केट मध्ये येणार आहे. त्या नंतर काही महिन्यातच भारतात हि गाडी उपलब्ध होईल.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment