Honda Activa Electric Scooter जानेवारी मध्ये होणार लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड

Honda Activa Electric Scooter लवकरच launch होणार असून date समोर आली आहे. होंडा EM1 या इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्रदर्शनां नंतर कंपनीने ई-ऍक्टिवा ला जगासमोर आणायचे ठरवले आहे. आज आम्ही या लेखात होंडा ऍक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती देणार आहोत.

फिक्स बॅटरी पॅक सह लाँच होणार “होंडा ऍक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर”

अमेरिकेत होणाऱ्या आगामी कंस्यूमर इलेक्ट्रॉनिक शो (CES) मध्ये इव्ही ऍक्टिवा चे प्रदर्शन करण्यात येणार आहे. हा कंस्यूमर इलेक्ट्रॉनिक शो USA मधील लास वेगास या ठिकाणी दिनांक ९ जानेवारी २०२४ ते १२ जानेवारी २०२४ या दरम्यान होणार असून होंडा जागतिक बाजारपेठे करिता ऍक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर ९ जानेवारी २०२४ रोजी तिथे लाँच करण्यात येणार आहे.

होंडा इंडिया भारतामध्ये ईएम-१ हि इलेकट्रीक स्कूटर लाँच करण्याऐवजी ई-ऍक्टिवा ला लाँच करून सध्याच्या भारतातील वाढत्या ईव्ही मागणी मध्ये स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

एक्टिवा इलेक्ट्रिक – बॅटरी रेंज, टॉपस्पीड, किंमत काय अपेक्षा करावी?

होंडा २०२३ तब्ब्ल ३० इलेकट्रीक वाहन वेगवेगळ्या देशात लाँच करणार असून जागतिक पातळीवर ईएम – १ नंतर ऍक्टिवा हि इलेकट्रीक स्कूटर डेब्यू करणार आहे. होंडा जागतिक स्थरावर ऍक्टिवा इलेकट्रीक साठी अनेक दिवसांपासून काम करत आहे पण हा प्रकल्प २०२० पासून लांबणीवर पडत होता. गाडीचे निर्माण पाठीमागे पाडण्याचे कारण चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव आणि बॅटरी पॅक साठी वापरल्या जाणाऱ्या लिथियम सेल्सची अवाढव्य किंमत हि होती. पण आता जागतिक स्थरावर लिथियम आयन सेल्स ची किंमत आवाक्यात आली असून सर्व देशांत ईव्ही एडॉप्शन चा वेग वाढला आहे.

Activa electric स्कूटर मध्ये २ मॉडेल्स लाँच केले जाणार आहे ज्यामध्ये सर्वात प्रथम फिक्स बॅटरी असणारे व्हेरिएंट असेल आणि दुसरे रिमूवेबल, भारतासह ग्लोबल प्लॅटफॉर्म वर प्रथमतः फिक्स बॅटरी असणारी ऍक्टिव्ह ev लाँच होईल जी स्पीड आणि परफॉर्मन्स यावर लक्ष केंद्रित न करता रेंजला प्राधान्य देईल. या गाडीचा टॉप-स्पीड ५० ते ६० किमी प्रति तास इतका असेल. हि गाडी सिटी राईड साठी योग्य असेल आणि होंडा चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरआणि बॅटरी स्वॅप स्टेशन्स वाढवण्यावर भर देईल.

होंडा च्या ऍक्टिवाचे दुसरे हाय-परफॉर्मन्स इलेकट्रीक मॉडेल देखील लाँच होणार आहे. हि दुसरी स्कूटर संपूर्णपणे हाय-परफॉर्मन्स असेल, जिचा तशी वेग पहिल्या मॉडेल पेक्षा निश्चित जास्त असेल आणि स्वॅप बॅटरी सिस्टिम सह हि गाडी लाँच होईल.

आगामी होंडा ev कंपनीच्या ICE Activa चा विद्यमान प्लॅटफॉर्मला ट्विक करून डेव्हलप करण्यात आलेल्या बॉर्न-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.

वाचा – New Ather Electric Scooter: एथर एनर्जी लाँच करणार फॅमिली स्कूटर; बजाज चेतक, टीव्हीएस ई-स्कूटरची करणार छुट्टी!

भारतात ऍक्टिवा ईव्ही कधी लाँच होईल?

देशात वाढती इलेकट्रीक गाड्यांची लोकप्रियता खास करून दुचाकी बाजारपेठेत ज्या ठिकाणी होंडाचा दबदबा आहे. कंपनी भारतातील आपली पोजिशन गमावू इच्छित नाही. भारतीय इलेकट्रीक वाहनांच्या बाजारपेठेत उतरण्यासाठी, rushlane वेबसाईटच्या वृत्ता नुसार २०२४ च्या पहिल्या सहामाहीत लाँच करणार आहे. कंपनी जगभरात कार्यरत असून ऍक्टिवाला सर्वात प्रथम भारतात लाँच करणार असल्याचे वृत्त आहे.

सध्या मार्केटमध्ये ५-६ कंपन्यांच्या स्कूटर्स भारतीय मार्केट मध्ये विकल्या जात आहेत आणि त्या दिवसेंदिवस पॉप्युलर होत असून ज्या प्रमाणे बजाज ने त्यांच्या चेतक या प्रसिद्ध स्कुटरचे नाव इलेकट्रीक गाडीला दिले त्या प्रमाणेच होंडा सुद्धा प्रस्थापित होण्यासाठी नावाजलेले “ऍक्टिवा” नाव आगामी ईव्ही ला देणार आहे. अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिकला Ola S1, TVS iQube, Bajaj Chetak आणि Ather 450X सारख्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागेल

काय आहेत लेस्टस्ट अपडेट्स –

बाइकवाले या वेबसाईट होंडा त्यांची इलेकट्रीक ऍक्टिवा दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी जागतिक बाजारपेठेत लाँच करणार आहे. हि स्कूटर भारतात २०२४ च्या शेवटच्या तिमाहीत विक्री साठी उपलब्ध असणार आहे.

Activa इलेक्ट्रिक मध्ये येत आहे का? कधी लाँच होईल?

होंडा ऍक्टिव्ह इलेकट्रीक भारतात मार्च ते जून २०२४ च्या दरम्यान लाँच होण्याची अपेक्षा आहे. हि गाडी विद्यमान प्लॅटफॉर्मला ट्विक करून डेव्हलप करण्यात आलेल्या बॉर्न-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.

होंडा इलेक्ट्रिक स्कुटीची किंमत किती आहे?

गाडीची ऑफिशिअल प्राईज समोर आलेली नाही पण अंदाजे १ लाख १० हजार ते १ लाख ५० हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे.

होंडा ऍक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच डेट काय आहे?

कंस्यूमर इलेक्ट्रॉनिक शो (CES) मध्ये ९ जानेवारी २०२४ रोजी इलेक्ट्रिक ऍक्टिवा चे लाँच करण्यात येणार आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment