होंडाने जपान मध्ये सुरू असलेल्या मोबिलिटी शो मध्ये होंडा SCe इलेक्ट्रिक स्कूटर सदर केळी आहे. ही आगामी SCe कॉन्सेप्ट सध्या प्रोटोटाइप प्रकारात असल्याचे होंडा प्रवक्त्यांनी नमूद केले आहे. SCe ही कॉन्सेप्ट भारतात लाँच होताना “होंडा ऍक्टिवा होण्याचे जास्त चान्स आहेत कारण भारतात फेमस मॉडल असलेली मोपड activa ला भारतीय ग्राहकांची तुफान पसंती आहे आणि इलेक्ट्रिक ऍक्टिवा खरेदी करण्यासाठी बरेच ग्राहक उत्सुक देखील आहेत.
प्रेस रिलीज नुसार ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर SCe स्वैप बैटरी सिस्टम वर आधारित असेल. बैटरी स्वैप साथी होंडाच्या मोबाईल पॉवर पैक स्टेशनला विज़िट करुन बैटरी काही सेकंदात स्वैप करता येऊ शकते. कंपनीच्या सांगण्यानुसार SCe ची रिमूव्हेबल बैटरी सीटच्या खाली बसण्यात येईल ज्याने काढ-घाल कारणे सोपे होईल. होंडाच्या म्हणण्यानुसार SCe या स्कूटर मध्ये चांगली रेंज आणि स्पीड मिळेल पण त्या एक्सॅक्टली नंबर नमूद केले नाहीत.
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
फोटो नुसार तुम्ही बघू शकता की SCe स्कूटर मध्ये पे ठेवाची जागा म्हणजे फ्लोर बोर्ड अगदी सपाट दिला आहे. चालक आणि प्रवासी यांना आरामात प्रवास करता यावा याकरिता मोठे सीट दिलेले आहे जे मांडी आणि माकड हडाला चांगला सपोर्ट प्रदान करेल. गाडीला गती देण्यासाठी मोटर चाकाला माउंट केलेली इथे पाहायला मिळते आहे परंतु ती बीएलडीसी किंवा पीएमएसएम तंत्रज्ञानाची आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.
ही आगामी SCe स्कूटर शहरी किंवा लोकल कम्यूट साथी डेव्हलप केली असल्याने यामध्ये पुढे डिस्क ब्रेक आणि पाठीमागे ड्रम ब्रेक दिला जाईल. इंस्ट्रूमेंट डिस्प्ले हा फोटो मध्ये एलसीडी तंत्रज्ञानाचा दिसतो आहे यामध्ये कनेक्टिवीटी आणि टेलीमेट्री फिचर्स फायनल प्रोडक्ट मध्ये दिले जातील. कॉन्फर्टेबल राइड साथी ऍक्टिवा प्रमाणेच पुढे टेलिस्कॉप आणि पाठीमागे सिंगल मोनो सस्पेंशन दिले जाईल.
तुम्हाला आवडेल – ७० हजारात बजाज सनी इलेकट्रीक अवतारात लाँच होणार? – पहा टेस्टिंग मॉडेल चे स्पाय शॉट्स
डिजाईन वाइज SCe कॉन्सेप्ट मध्ये अर्गोनॉमिक्सचा विचार केलेला दिसतो आहे. इलेक्ट्रिक गाडी असल्याचे भासवण्यासाठी निळ्या रंगाचे एलिमेंट्स या SCe मध्ये दिले जातात.