जगातली पहिली ऑटोमॅटिक ओलाची स्कूटर, ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या ओला सोलोची संपूर्ण माहिती

गाडी चालवताना कधीकधी खूप कंटाळा येऊन तुमच्या मनात कधी विचार आलाय का? की जर स्कूटर आपोआप चालली असती तर? पण आता हे स्वप्न पण सत्यात उतरवायला ओला इलेक्ट्रीक आपल्याला मदत करत आहे. हो ओला नवीन ‘ओला सोलो’ला भेटीस आणत आहे, जी स्कूटर स्वयंचलित असणार आहे अगदी ह्या स्कूटर च्या मागच्या प्रवासी सीटवर बसूनसुद्धा, तुम्ही आरामात न थकता प्रवास करू शकणार आहात.

ओला सोलो- AI वैशिष्ट्यांसह भारतातील पहिली ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिक ही स्कूटर कंपनी नेहमीच नवनवीन मॉडेल्स सादर करुन लोकांना त्यांची बोटे आश्चर्याने तोंडात घालायला भाग पाडते, ह्याच ताज उदाहरण म्हणजेच ओला सोलोचे सादरीकरण आहे. ओलाच्या सोशल मीडिया पेजवर नवीन व्हिडिओमध्ये ओला सोलो झळकली. या स्कूटरच्या अधिक माहितीमध्ये लिहिण्यात आले, ‘ओला ही केवळ स्कूटरच नाहीये, स्कूटरच्या चाकांवर घडणारी ही नवीन क्रांती आहे. ह्या स्कूटर द्वारे अधिक स्मार्ट, स्वच्छ आणि अधिक स्वायत  भविष्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी टेक्नोलॉजी सोबत चालकाविरहित राईड करण्याचा अनुभव मिळणार आहे.’

ओला सोलोमध्ये असणारे सेफ्टी फिचर्स

ऑटोमॅटिक म्हणजेच आपोआप चालणारी स्कूटर चालवताना सुरक्षिततेची जबाबदारी घेत ह्या स्कूटरमध्ये ओलाने सेफ्टीसाठी असे काही फिचर्स या स्कूटरमध्ये दिले आहेत, ज्यामुळे तुमची राईड सुरक्षित आणि आरामदायी होऊ शकते.

 • लाइट डिटेक्शन एंड रँगिंग ज्यामुळे तुमच्या मार्गातल्या वस्तूंचे अंतर मोजून त्याप्रमाणे तुमचे अंतर ठेवले जाते.
 • रेडिओ डिटेक्शन एंड रॅगिंग ज्यामुळे यूज़रला मार्गात येणाऱ्या ऑब्जेक्टचा जाणीव ठेऊन स्पीड, अंतर ठेवले जाते.
 • कॅमेरा सिस्टम- लेन समजण्यासाठी, ट्रॅफिक साइन लक्षात येण्यासाठी कॅमेरा सिस्टमची मदत होते.
 • अल्ट्रासोनिक सेन्सर- ज्यामुळे राईड करताना जवळपास असणारे अडथळे-खड्डे यांची माहिती मिळवून स्कूटरचे स्पीड आपोआप कमी होते.
 • ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम- ज्यामुळे लोकेशन डेटा,नेविगेशन आणि मार्गांचे प्लानिंग करता येत.

ओला सोलो-एडवांस्ड फिचर्स

 • ग्राऊंड ब्रेकिंग टेक्नोलॉजी- LMAO9000 चिप ज्यामुळे रोडवरचे रियल-टाइम ट्रैफिकची माहिती समजते शिवाय रोड नॅविगेट करता येतो.
 • मल्टिलीगनल व्हॉइस- 22 भाषा या स्कूटरमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.
 • फॅशियल रेकग्नेशन- अधिक सुरक्षितेसाठी
 • समन मोड- ज्यामुळे तुम्ही अडकलेल्या परिस्तिथमध्ये मोबाईलवर असणाऱ्या ओला ओला अँप वर जाऊन ड्रायव्हरलेस रायिड तुम्हाला पिक करण्यासाठी बोलवू शकता.
 • विश्राम मोड- जेव्हा तुमची ओला- सोलो लो-चार्ज असेल तेव्हा स्कूटरच्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधून स्वतः चार्ज करण्यास वळेल.
 • ह्यूमन मोड- रस्त्यावर चालणाऱ्या इतर वाहनाशी संभाषण साधू शकते.
 • वायब्रेटिंग सीट्स अलर्ट- पुढील येणाऱ्या वळणासाठी किंवा खड्ड्यासाठी वायब्रेशन देईल.

ओला-सोलोबद्दल अधिक माहिती बघा खालील व्हिडिओमध्ये

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment