ओला S1 प्रो वर मिळतोय 25 हजार डिस्काऊंट, ऑफरचा लाभ कसा घ्यावा जाणून घ्या

Ola electric scooter discount : खास वैलेंटाइन डे च्या दिवसात ओलाची नवीन ऑफर सुरू झाली आहे, चक्क आता ओला इलेक्ट्रिकच्या बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरच्या किमतीमध्ये रु. 25,000 रुपयांची घट झाली आहे. Ola S1X+, S1 Air आणि S1 Pro मॉडेल्सवर मर्यादित काळासाठी ऑफर्स असणार आहे, चला जाणून घेयुया ओलाचा नवीन डिस्काउंट, ओलाची रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी खालील लेखात

ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर 25,000 सूट

या आधीसुद्धा जानेवारीमध्ये, ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या स्कूटरवर खास ऑफर दिली होती, ज्यामध्ये अशीच एक योजना आणली होती ज्यामध्ये एक्सटेंडेड वॉरंटीवर 50 टक्के डिस्काउंट तसेच ओलाच्या S1 Air आणि S1 Pro मॉडेल्सवर रु. 2,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस मिळत होते.

नव्या ओला इलेक्ट्रिकच्या ऑफरमध्ये ओला ऐस1 X+ ची किंमत 84,999 (ex-sh), ओला ऐस1 एयर ची किंमत 1,04,999 (ex-sh) आणि ओला ऐस1 Pro ची किंमत 1,29,999 (ex-sh) असणार आहे.

वाचा: टोयाटोची नवीन शक्कल, तुमची आवडती टोयोटा कारची होणार ‘होम-डिलीवर’

ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल यांची घोषणा

भाविश अग्रवाल जे ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आहेत, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘India’s #EV, now at an unbeatable price Ola S1’ बद्दल एक इमेज-पोस्ट लिहीत माहिती दिली की, ‘ओला इलेक्ट्रिकची विकल्या जाणाऱ्या, ओला ऐस1 X+ ची किंमत 1,09, ,999 (ex-sh), ओला ऐस1 एयर ची किंमत 1,19,999 (ex-sh) आणि ओला ऐस1 Pro ची किंमत 1,47,999 (ex-sh) पासून सुरू होते, पण या मूळ किंमतीवर आता खास वैलेंटाइन दिवसापासून महिनाखेरींपर्यंत कमालीची ऑफर मिळणार आहे.’

वाचा: इलेक्ट्रिक ड्यूकचा बोलबाला, एकदा पहाच KTM ची पहिली इलेक्ट्रिक बाइक

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment