वडापाव गर्लने वडापाव विकून घेतली ह्युंदाईची ही कार, काय आहे किंमत आणि फिचर्स ह्या कारचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aishwarya Potdar

Updated on:

सध्या इंटरनेटवर, सोशल मीडियावर जिथ-तिथं एक महिला दिसतेय, जी दिल्लीच्या रोडवर वडापाव विकते. ह्या महिलेचं नाव आहे; चंद्रिका गेरा दीक्षित. ह्या महिलेला वडापाव मुलगी म्हणूनच सर्वत्र ओळखले जात आहे. इंटरनेटवर व्हायरल वडा पाव मुलगी संबंधित माहिती, चंद्रिका दीक्षित वडा पाव नेट वर्थ किंवा चंद्रिका दीक्षित कार याबाबत माहिती वेगाने शोधली जात आहे. ह्या वडापाव मुलगीला सर्वात जास्त सर्च केलं जाण्याचं अजून एक कारण अस म्हंटल जातंय की ह्या मुलीने केवळ वडापाव विकून ह्युंदाईची मॅन्युअल- ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची कार खरेदी केली आहे. ही कार Hyundai i20 असून, ह्या कारचा ग्राउंड क्लीयरन्स 190 mm इतका आहे. व्हायरल वडा पाव मुलीच्या कारचे स्पेसिफिक्शन आणि फिचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर सदर लेख संपूर्ण वाचा.

वाचा: मुंबईच्या भर रस्त्यावर गोलमालचा अभिनेता इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना दिसला !

व्हायरल वडापाव गर्ल कार- चंद्रिका दीक्षित कार

इंटरनेटवर सर्वात जास्त दिसणाऱ्या वडापाव मुलगीचे वडापावचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. ह्या मुलीचे नाव चंद्रिका गेरा दीक्षित असून दिल्लीमध्ये वडापाव विकण्याचे काम करते, आणि या कष्ठ्याच्या कामातून चंद्रिका गेरा दीक्षित हिने ह्युंदाई i20 ही कार विकत घेतली आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

ह्या कारची किंमत 11.21 लाख रुपये असून ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन हे दोन पर्याय मिळतात. ग्लोबल NCAP द्वारे या कारला 3 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहेत. या कारमध्ये नव्याने रिस्टाइल केलेले LED लाइट्स आणि बंपरसोबत आलोय व्हिल्स मिळतात. ह्या कारची तुलना टाटाच्या अल्ट्रोस कारसोबत आणि मारुतीच्या स्विफ्ट सोबत केली जाते. ही कार एका लिटरमध्ये 15 ते 17 किलोमीटर मायलेज देते.

वाचा: टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश

वडापाव गर्ल कार वापरते ह्युंदाई i20

ह्या कारच्या काही वेरिएंट्सला सनरूफ मिळते. क्रुझ कंट्रोल सोबत काहीइतर अद्यावत फिचर्सचा समावेश कारमध्ये दिले आहेत जसं पॉवर स्टिअरिंग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, आलोय व्हिल्स, इंजिन स्टार्ट किंवा स्टॉप करण्याचे बटण शिवाय सुरक्षिततेसाठी एयरबॅग्स, सिट बेल्ट वॉर्निंग, टायर प्रेशर मॉनिटर, स्पीड अलर्ट, रिअर कॅमेरा, हिल असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यासारखे इतर महत्त्वाचे फिचर्स या कारमध्ये मिळतात.

वाचा: मोठ्या कुटुंबासाठी टोयाटोची एक्सवॅन, दुसऱ्या सीटचा बनतो टेबल, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

ह्या कारचे इंजिन 1197 CC चे असून, ह्या कारची बूट स्पेस 351 लिटरची आहे. 37 लीटरची फ्युएल क्षमता असणाऱ्या ह्या कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन पर्याय मिळतो. कारमध्ये 4 सिलेंडर मिळतात. ही कार फ्रंट व्हील ड्राइव मधून असून, 5 लोक ह्या कारमधून आरामात प्रवास करू शकतात.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment