70 हजाराची जेमोपाई स्कूटर जिला चालवण्यासाठी लायसन्स-रजिस्ट्रेशनचीसुद्धा गरज नाही, ही वाचा संपूर्ण माहिती

Aishwarya Potdar

भारतामध्ये अशी एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्या स्कूटरला चालवण्यासाठी ना लायसन्सची गरज पडते ना कुठल्या रजिस्ट्रेशनची. हो अगदी योग्य माहिती वाचताय, जेमोपाई ही स्कूटर बजेट फ्रेंडली असून 100 किलोमीटर इतकी कमालीची रेंज प्रदान करते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन प्रकार असून या तिन्ही प्रकारातून वेगवेगळी रेंज वेगवेगळ्या किमती मार्फत मिळते. चला जाणून घेऊया जेमोपाई बाईक्सचे संपूर्ण माहिती.

जेमोपाई स्कूटरसाठी ना लायसन्स- ना रजिस्ट्रेशन

जेमोपाई स्कूटरला चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही रजिस्ट्रेशनची किंवा लायसन्स; थोडक्यात प्रवास करताना जवळपास कोणतेही कागदपत्रे बाळगायचे अजिबात गरज पडत नाही. सध्या बाजारातल्या स्वस्त स्कूटरच्या यादीत जेमोपाई या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आवर्जून येतं. या स्कूटरची किंमत 70,000 पासून सुरू होते ते एक लाखापर्यंत संपते. या स्कूटरची अजून एक खासियत ही आहे की, ही स्कूटर वजनाने जरी कमी असली तरी या स्कूटरवरून दीडशे किलो पर्यंतचा भार वाहून नेला जाऊ शकतो. दैनंदिन जीवनात वापरासाठी ही स्कूटर एकदम दणकट आणि उत्तम आहे.

वाचा: टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश शिवाय टाटा टियागो ईव्हीवर मिळतोय डिस्काउंट

वाचा: मोठ्या कुटुंबासाठी टोयाटोची एक्सवॅन, दुसऱ्या सीटचा बनतो टेबल, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

जेमोपाई स्कूटरची भारतामधील किंमत

सध्या भारतात ही कंपनी तीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे. जेमोपाई रायडर, ज्याची किंमत 75,116 रुपये आहे. जेमोपाई रायडर सुपरमॅक्स जिची किंमत 86,327 रुपये आहे आणि तिसरी जेमोपाई ऑस्ट्रिड लाईट जिची किंमत 99,225 रुपये इतकी आहे. या कंपनीच्या तीनही स्कूटर एक लाख रुपयांच्या आतल्या आहेत.

जेमोपाई स्कूटर फिचर्स आणि बॅटरी

हिरो इलेक्ट्रिक अट्रिया, इवोलेट डर्बी आणि बेनिलिंग आभा यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरची तुलना असणाऱ्याला या जेमोपाई स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल-ऑडोमीटर-स्पीडोमीटर-टॅकोमीटर, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, स्टॅन्ड अलार्म, लो-बॅटरी इंडिकेटर, पुढच्या बाजूला स्टोरेज बॉक्स, सीटखाली स्टोरेज, एलईडी हेडलाईट-टेललाईट-ब्रेकलाईट, USB चार्जिंग पोर्ट, रायडिंग मोड स्विच, स्कूटर सुरू-बंद करण्यासाठी स्टार्ट किंवा टॉपचे बटन आणि बिलियन फुट ब्रेस्ट यांसारख्या फीचर्स समावेश आहे.

जेमोपाई रायडर या व्हेरिएंटला 90 किलोमीटरचा पल्ला गाठेल अशी बॅटरी देण्यात आली आहे, हिचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास असून, ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 3-4 तासांचा कालावधी लागतो. जेमोपाई ऑस्ट्रिड लाइट या व्हेरिएंटला 90 किलोमीटरचा पल्ला गाठेल अशी बॅटरी देण्यात आली आहे,  टॉप स्पीड 65 किलोमीटर प्रतितास असून, ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 3-4 तासांचा कालावधी लागतो. जेमोपाई रायडर सुपरमॅक्स या इलेक्ट्रिक स्कूटरला 100 किलोमीटर रेंज असणारी बॅटरी पॅक पुरवण्यात आलेला आहे, जी चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात.

जेमोपाई इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरीवर आणि मोटर वर तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रतितास इतका आहे. या तिन्ही स्कूटर वजनाने 100 किलोच्या आतल्या असून 150 किलोपर्यंतचा भार वाहून नेण्याची क्षमता या स्कूटरमध्ये आहे.

जेमोपाई स्कूटरची सोपी बुकिंग प्रक्रिया

तुम्ही जर अशा इलेक्ट्रिक स्कूटर च्या शोधात असाल; जिची किंमत कमी, फीचर्स चांगले, लूक चांगला शिवाय चालवण्यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशन-लायसन्स ची गरज पडणार नाही तर जेमोपाई इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.  भारतामधल्या 21 शहरांमध्ये या स्कूटरची डीलरशिप उपस्थित असून तुम्हाला जर या स्कूटरची टेस्ट राईड किंवा बुकिंग करायचं असेल तर तुम्ही थेट जेमोपाई इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमला भेट देऊ शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment