22 हजारात मिळतेय बजाजची ही बाईक, 80 किमीचे मायलेज जाणून घ्या सर्व माहिती

तुम्ही जर बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी खालील बजाज मोटरसायकलची माहिती आधी वाचा, कारण 70 हजार किंमतीची बजाजची सर्वात जास्त मायलेज देणारी बाईक- Bajaj Platina 110 आता ‘ठराविक वेबसाईटवर’ फक्त 22 हजारात मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा Bajaj bike models संबंधित प्रश्न पडले असतील, तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

बजाज प्लॅटिना 110

भारतामध्ये टॉप मोटारसायकल लिस्टमध्ये बजाज नाव आवर्जून घेतलं जात, बजाजच्या मोटारसायकल-इलेक्ट्रिक स्कूटर आणि तिनचाकी वाहने लोकप्रिय आहेत. सध्या बजाजच्या इलेक्ट्रिक चेतक स्कूटरसोबत बजाज प्लॅटिना 110 या मोटरसायकलची चर्चा होत आहे, चर्चेचं कारण आहे; या बाईकची घसरलेली किंमत. 80,000 रुपये मूळ किंमतीची प्लॅटिना 110 आता फक्त 20 ते 22 हजार या किंमतीमध्ये मिळणार आहे, तुम्ही चांगले मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असाल तर ‘बजाज प्लॅटिना 110’ ही बाईक तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

या वेबसाईटवर बजाज बाइक मिळते फक्त 22 हजारात

बजाज प्लेटिना ही बाईक तुम्हाला Quiker या ऑनलाइन रिसेलिंग वेबसाईटवर फक्त 22,000 या किंमतीत मिळत आहे. तुम्ही या बाईकच्या किमतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्विकर या वेबसाईटवर भेट द्यायची आहे.

वाचा: ओलाच्या टॉप स्कूटरवर मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक

बजाज प्लॅटिना 110 इंजिन माहिती

तुम्ही जर रोजच्या आयुष्यात वापरासाठी बाईक घेत असाल तर बजाजची प्लॅटिना बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे, कारण 5 गेअर  असणाऱ्या ह्या बाईकचे इंजिन 115.45 cc चे आहे, हे इंजिन एयर-कुल्ड इंजिन आहे. ज्याच्या मदतीने 10.80 Nm टॉर्क आणि 8.60 PS इतकी पॉवर जनरेट केलं जात. किक आणि बटण स्टार्टने सुरु होणारि ही बाईक एका लीटरच्या पेट्रोलमध्ये 80 किमी इतके मायलेज देते.

वाचा: टाटा पंचला बसला पंच, नक्की काय झालं स्टेडियममध्ये? जाणून घ्या स्टेडियममधल्या पंच ईव्हीची किंमत, फिचर्स सर्व काही

प्लॅटिना 110 फिचर्स

बाईकच्या फिचर्समध्ये ABS म्हणजेच अँटी-लॉक- ब्रेकिंग सिस्टम, पुढचा डिस्कब्रेक आणि मागचा ड्रम ब्रेक, ट्यूबलेस टायर, डिजिटल स्पीडमीटर-इंस्ट्रूमेंट कंसोल-ट्रिपमीटर-ऑडोमीटर, फुटरेस्ट सोबत हेडलाईट्स, टेलाईटस, इंडिकेटर, डेटाइम रनिंग लाइट्स  दिले गेले आहेत.  बाजारात या बाईकचे कॉकटेल वाइन रेड ऑरेंज, एबोनी ब्लॅक रेड, एबोनी ब्लॅक ब्लू आणि सफायर ब्लू हे रंग उपलब्ध आहेत.

वाचा: Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

बजाज प्लॅटिना 110 ची भारतामधील किंमत

या बाईकची तुलना हीरो स्पेल्डर प्लस, टीव्हीएस स्पोर्ट आणि बजाज पल्सर 125 सोबत केली जाते. मुंबईमध्ये या बाईकची किंमत 74,000 रुपये आहे आणि दिल्लीमध्ये 72,000 हजार तर पुण्यामध्ये ही बाईक 73,000 विकली जाते. तुम्हाला जर ही बाईक सध्या 22 हजारात क्विकर या बाईक रिसेलिंग वेबसाइटवर विकली जातेय. या बाईकच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज शोरूम मध्ये भेट देऊ शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment