नवीन बजाज चेतक २०२४ लाँच होणार, मिळणार १२६ किमी रेंज, जास्त टॉपस्पीड आणि फास्ट चार्जिंग

New Bajaj Chetak Premium 2024 – गेल्या काही महिन्यापूर्वी बजाज ऑटो ने त्यांच्या चेतक इलेकट्रीक चे अर्बन हे मॉडेल लाँच केले होते ज्यामध्ये कलर डिस्प्ले, जास्त स्पीड आणि नवीन रंग सादर केले होते. त्यानंतर कंपनी आता जुने चेतक प्रीमियम मॉडेल बंद करून लवकरच १२६ किमी रेंज देणारे नवीन मॉडेल लाँच करणार आहे. नवीन अँकमिंग बजाज चेतक प्रीमियम २०२४ व्हेरिएंट कसे असेल आणि त्यामध्ये काय अपग्रेड करण्यात येणार आहेत हे या लेखात जाणून घेऊया.

प्रमुख ठळक मुद्दे –

  • बजाज चेतक प्रीमियम २०२४ मध्ये बॅटरी क्षमता वाढवली जाणार
  • अर्बन व्हेरिएंट पेक्षा अधिक फीचर्स दिले जाणार
  • कृष्णधवल डिस्प्ले बदलून रंगीत आणि प्रखर डिस्प्ले दिला जाणार

रिलायबल, मजबूत आणि आरामदायी असल्याने बजाज चेतक हि इलेकट्रीक स्कूटर सध्या बरीच चर्चेत आहे. गेल्या महिन्यात कंपनीने डबल डिजिट युनिट्स सेल करून मार्केट मध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. अर्बन २०२४ हे मॉडेल लाँच करताच जुन्या प्रीमियम मॉडेलचे काय होणार असे प्रश्न उभे राहताच कंपनीने हे मॉडेल बंद करत असल्याच्या हिंट दिल्या. जुन्या प्रिमुं चेतक वर जबरदस्त डिस्काउंट देऊन कंपनीने प्रत्येकाचे चेतक घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. जुन्या व्हेरिएंट मध्ये ग्राहकांच्या डिस्प्ले आणि चार्जिंग बाबत अनेक तक्रारी होत्या या शिवाय गाडीत कमी रेंज मिळत असल्याने अनेक ग्राहक दुसऱ्या ब्रॅण्ड्स खरेदी करण्याला पसंती देत होते. पण कंपनीने आता कात टाकत चेतक प्रीमियमला अपग्रेड करत काही नवीन स्पेसिफिकेशन्स दिले आहेत.

New Bajaj Chetak Premium 2024 – काय असेल खास?

नवीन बजाज चेतक प्रीमियम मध्ये सर्वात मोठा बदल बॅटरी पॅक मध्ये केला जाणार आहे. कंपनी सध्या या वेरिनेत मध्ये 2.9kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक देत आहे ज्याने १०९ किमी कागदावर आणि ९५ किमी रिअल वर्ल्ड रेंज मिळत आहे पण कंपनी या बॅटरी पॅक ला बदलून 3.2kWh करणार आहे ज्याने ग्राहकांना 126km ची ARAI-प्रमाणित रेंज मिळेल आणि रोड वर १०० किमी पेक्षा जास्त रेंज मिळेल. याव्यतिरिक्त, चेतक इलेक्ट्रिकमध्ये TFT कलर डिस्प्ले सोबत टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी दिली जाईल. हा डिस्प्ले ६ इंच आकारात येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ग्राहकांना आधुनिक आणि कनेक्टेड तंत्रज्ञान अनुभवण्यास मिळेल. 

वाचा – बजाज पल्सर 1000 एफ, जी पार करते 100 Kmh अंतर फक्त 3 सेकंदात

चेतक अर्बेन व्हेरिएंट हे एन्ट्री लेव्हल मॉडेल असणार आहे तर प्रीमियम हे टॉप आधुनिक तंत्रज्ञान आणि एक्सट्रा रेंज ने सुसज्ज असणार आहे. सध्याच्या प्रीमियम मॉडेल पेक्षा नवीन मॉडेल मध्ये ७३ किलोमीटर इतके टॉपस्पीड दिले जाईल परंतु मोटर पूर्वी प्रमाणेच 3.8 kw क्षमतेची असेल. आम्ही पूर्वी सांगितलेल्या बीएलडीसी मॉडेल ला सुद्धा कंपनी प्रीमियम व्हेरिएंट सोबत लाँच करण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये 4.25kW हब मौन्टेड मोटर दिली जाईल ज्याने चांगला टॉप स्पीड मिळेल, सर्व फीचर्स लोडेड असतील परंतु किंमत अर्बन पेक्षा कमी असेल.

अपेक्षित लॉन्च तारीख आणि अपेक्षित किंमत

आम्हाला मिळालेल्या स्रोतानुसार नवीन बजाज चेतक प्रीमियम २०२४ व्हेरिएंट जानेवारी महिन्यात लाँच होणार आहे. किमतीच्या बाबतीत प्रीमियम २०२४ ट्रिम सध्याच्या प्रीमियम २०२३ मॉडेल च्या तुलनेने १० ते १५ हजार रुपयांनी महाग असण्याची शक्यता आहे.

वाचा – बजाज ऑटो ने बंद केली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या कारण

बजाज चेतक प्रीमियम लाँच होताच तुम्हाला आमच्या मराठी भाषेत रिव्हिव बघायला मिळेल त्यामुळे आमचा यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment