Kinetic Luna Electric: चल मेरी लुना! ₹५०० रुपयांत बुक करा ई-लुना, किंमत फक्त

Kinetic Luna Electric Price in Maharashtra – कायनेटिक इंडिया ने त्यांच्या लोकप्रिय लुना या मोटर सायकलचे इलेक्ट्रीक वर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केले असून या गाडीला ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईट द्वारे विकले जाणार आहे.

Electric luna

Kinetic E-Luna: महाराष्ट्रातील किंमत

कायनेटिक लुना इलेक्ट्रिक या गाडीची प्राथमिक किंमत ₹71,990 रुपये इतकी ठेवली आहे. ही किंमत एक्स शोरूम आहे. गाडीचे इतर डिटेल्स जसे की एका चार्ज मध्ये मिळणारी रेंज, टॉपस्पीड, बॅटरी, मोटर याची सर्व माहिती सार्वजनिक झाली आहे.

ई-लुना मध्ये 2 kw लिथियम आयन बॅटरी पैक दिला गेला आहे ज्यामुळे एकदा चार्ज केली की 110 किमी रेंज आरामशीर मिळणार आहे. चाकना गती देण्यासाठी 2 kw मोटर इन्स्टॉल केली आहे. ज्यामुळे 52 किलोमीटर प्रतितास टॉप स्पीड मिळेल. गादीची बॅटरीचार्ज होण्यासाठी ४ तासांचा कालावधी मेन्शन केला आहे.

वाचा – हिरो मेवरिक 440: हंटर 350 ची छुट्टी करायला, हिरोची ‘क्रूझर बाईक’ लाँच

बॅटरी मोटर आणि इतर फिचर्स

या कायनेटिक गाडीची डिजाइन पूर्वी सारखीच अगदी बेसिक आणि प्रॅक्टिकल असणार आहे कार्गो आणि पेसिंजर दोन्ही पर्पज साठी या गाडीचा उपयोग करता यावा याकरिता स्प्लिट सीट्स, मधे मोठी जागा देण्यात आली आहे. लुना मध्ये लाल आणि निळा असे दोन कलर्स च दिले आहेत.

गाडीमध्ये हेड लाईट गोल आकारात दिली असून बल्ब हॅलोजन असेल. इंस्ट्रूमेंट पॅनेल डिजिटल डील जाणार आहे ज्यामध्ये स्पीडोमीटर, ट्रिप मीटर, ओडो मीटर, बॅटरी SOC, रेंज, आणि इतर डिटेल्स दाखवले जातील.

वाचा – एथर एनर्जीची नवीन फॅमिली ओरिएंटेड स्कूटर, TVS iQube ची होणार छुट्टी

E-Lune मध्ये पुढे टेलिस्कोपिक सस्पेंशन फोर्क आणि पाठीमागे ड्यूल स्प्रिंग एडजस्टबल सस्पेंशन दिले आहे. दोन्ही ट्यूब-टायर 16 इंच दिले आहेत आणि व्हील्स स्पोक पध्दतीचे असतील यात एलॉय चा ऑप्शन दिला नाही.  इलेक्ट्रिक कायनेटिक लुनाची संपूर्ण बॉडी मेटल ने बनवलेली असली तरी वजन 96 किलो इतके असेल.

इलेक्ट्रिक लुना एक सेमी-मोपड गाडी आहे. गाडीच्या सध्याचे मार्केट मधील प्रतिस्पर्धी पहिले तर इलेक्ट्रिक मध्ये कोणीही नाही पण ICE मध्ये TVS XL00 ही गाडी लुनाशी सरळ स्पर्धा करते.

डिलीवरी अपडेट

फेब्रुवारी 2024 या महिन्यापासून ई-लुनाची डिलीवरी मेट्रो शहरांमध्ये सुरु केली जाणार आहे त्यानंतर टीअर-१, २ आणि ३ अश्या अनुक्रमे विक्री सुरू केली जाणार आहे. सध्या प्रतीमहिना 5000 इलेक्ट्रिक लुना मैनुफेक्चर करण्याची क्षमता आहे.

गादी बुक करण्यासाठी ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट ऍप ओपन करून तुम्ही ₹500 रुपयांच्या राशीने गाडी बुक करू शकता.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment