30 लाखाच्या आतमध्ये मिळणार महिंद्राची नवीन 7 सीटर ईव्ही आणि चाचणीदरम्यान कळली डिझाईनची माहिती

महिंद्रा मोठ्या कुटुंबासाठी नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट कार सादर करत आहे, जिला महिंद्रा XUV e8 नाव देण्यात आले आहे. ही ईव्ही महिंद्रा XUV700 वर आधारित असणार आहे. 30 लाखाच्या आतल्या किंमतीमध्ये ही कार सुरक्षित आणि एडवांस्ड फिचर्सने भरपूर आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणारे रंग, किंमत, नवीन मिळालेले फिचर्स आणि कारचे बुकिंग अथवा टेस्ट राईड घेण्याची सोप्पी प्रक्रिया कशी करायची याची संपूर्ण माहिती खालील लेखात दिली आहे.

महिंद्रा XUV e8 वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक कारच्या सेफ्टी फिचर्समध्ये 6 एअरबॅग, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, इलेक्ट्रिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीबुशन, टायर प्रेशर मॉनिटरिंग, हिल असिस्ट आणि 360 डिग्री कैमरा यांचा समावेश आहे. एडवांस्ड फिचर्समध्ये नेविगेशन ज्यासोबत लाईव्ह ट्रॅफिक माहिती, एडजस्टबल हेडलाईटस, रेन सेन्सिंग वाइपर, रिअर विंडो वाइपर, आलोय व्हिल्स, रूफ रेल आणि सनरूफ या फिचर्सचा समावेश आहे.

XUV e8 मध्ये नवीन हेडलाइट सेटअप

महिंद्रा XUV 700 वर आधारित असणाऱ्या XUV e8 मध्ये नव्याने काही गोष्टींचा समावेश झालं आहे, रिडिझाईन केलेल्या फ्रंट फाशिया सोबत पुढच्या-मागच्या नव्या बँपरवर आडवा LED लाइट बार, जवळ आलेले ग्रिल सोबत नवा कोरा हेडलँप या इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार आहे, ही ईव्ही नव्या एरोडाईनामिक आलोय व्हिल्सने सज्ज असणार आहे.

वाचा: टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश शिवाय टाटा टियागो ईव्हीवर मिळतोय डिस्काउंट

ईव्हीच्या इंटीरियर डिझाइन बाबतीत माहिती देता, तीन स्क्रीन असणारा संपूर्ण डॅशबोर्ड ज्यामध्ये एक छोटा डिस्प्ले, इन्फोटेन्मेंट स्क्रीन सोबत शेजारील पॅसेंजरसाठी एक स्क्रीन, नवा सेंटर कंसोल, नवीन गिअर लिव्हर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्ट्रर, पारनोमिक सनरूफ, ADAS फिचर आणि प्रिमियम साउंड सिस्टम यांचा समावेश असणार आहे.

वाचा: टॉप 5 शहरामधील टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची किंमत, कमाल फिचर्ससोबत 5 स्टार रेटिंग सेफ्टीसुद्धा

एका चार्जमध्ये 400-450 किमी रेंज देणारा बॅटरी पॅक

महिंद्रा XUV e8 या ईव्ही च्या बॅटरीसंबंधीत माहिती देता, या कारमध्ये 60 kwh आणि 80 kwh असे दोन बॅटरी पॅक पुरवण्यात आले आहेत, सोबत ड्युअल मोटर ज्यांच्यामार्फत एका चार्जमध्ये ही ईव्ही 400-450 किलोमीटर इतकी रेंज देऊ शकते. या कारच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी एसी आणि डीसी असे दोन चार्जिंग ऑप्शन्स असतील.

महिंद्रा XUV700 इलेक्ट्रिक

महिंद्रा XUV700 इलेक्ट्रिक कार तब्बल 30 पेक्षा आधी वेरिएंट्समधून भारतामध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 16 लाखापासून सुरू होते ते 30 लाखपाशी संपते. या कारला ग्लोबल NCAP तर्फे सर्वात सेफेस्ट इलेक्ट्रिक कार म्हणून घोष्ठित करण्यात आले आहे. किंमतीच्या मानाने प्रशस्त जागा आणि स्मूद इंजिन सोबत कमालीच्या अद्यावत फिचर्सने ही कार तुम्हाला आरामदायी आणि सुरक्षित राईडचा अनुभव देते. महिंद्रा XUV 700मध्ये उपलब्ध असणारे रंग जसे डेझल लींग सिल्वर, मिडनाइट ब्लॅक, एव्हरेस्ट व्हाइट, इलेक्ट्रिक ब्लू, रेड रेज आणि नेपोली ब्लॅक या महिंद्रा XUV e8 मध्ये उपलब्ध असण्याची शक्यता मांडली जाते.

वाचा: आता कियाच्या लोवर व्हेरिएंटलासुद्धा मिळणार सनरूफ, जाणून घ्या नव्या वेरिएंट्सची किंमत

सुमारे 2024 च्या शेवटच्या महिन्यात लाँच होणाऱ्या या कारचे BYD Atto 3 आणि एमजी झेड येस ईव्ही या दोन कार प्रतिस्पर्धी ठरू शकतील. तुम्हाला जर या महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कार संबंधित माहिती, बुकिंग माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या महिंद्रा शोरूममध्ये भेट द्या.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment