आता कियाच्या लोवर व्हेरिएंटलासुद्धा मिळणार सनरूफ, जाणून घ्या नव्या वेरिएंट्सची किंमत

कियाकडून नुकतीच एक्सक्लुझिव्ह बातमी बाहेर पडलेली आहे, जी किया सोनेटच्या बाबतीत आहे. किया सोनेट आता दोन नवीन वेरीएंट्समधून भेटीस येणार आहे, इतकेच नाही तर या दोन्ही वेरियंटला सनरूपसुद्धा मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया कियाच्या नवीन लॉन्च झालेल्या व्हेरिएंट्सच्या ऍडव्हान्स फीचर्स, किंमत याची सर्व माहिती.

किया सोनेटचे दोन नवे वेरीएंट्स लाँच

किया सोनेटच्या इतर गाड्यांच्या ताफ्यात आता HTE (O) आणि HTK (O) हे दोन वेरीएंट्स नव्याने जोडले जात आहेत, हे दोन्ही व्हेरीएंट्स पेट्रोल-डिझेल या दोन्ही इंजिन ऑप्शन सोबत उपलब्ध असणार आहेत. कियाच्या या दोन नवीन वेरिएंट्सची खासियत त्यांना मिळणार सनरूप असणार आहे.

सध्या बाजारात किया सोन्याचे सात वेरियंट्स बाजार उपलब्ध आहेत. हे सातही व्हेरियंट्स वेगवेगळ्या किमतीचे आणि वेगवेगळ्या फीचर्सने भरपूर आहेत आणि अशातच किया सोनटने एक बजेट फ्रेंडली बेस वेरियंटला लाँच करुन आणि इतर अद्यावत फीचर्स देऊन ग्राहकांमध्ये आनंद पसरवला आहे.

वाचा: सिट्रॉन इ-सी3 कारचे सेफ्टी रेटिंग बघून बसेल तुम्हाला आश्चर्याचा धक्का, कार विकत घेताना करा पुन्हा विचार

आता किया सोनेटच्या बेस मॉडेललासुद्धा सनरूप

किया सोनेटच्या फक्त टॉप मॉडेलला सनरूफ मिळत असायचे, पण आता बेस मॉडेलला सुद्धा सनरूप मिळाल्याने हे वाहन खरेदी करणाऱ्याला सनरूफचा अनुभव घेता येणार आहे. या सनरूफशिवाय अजून काही ॲडव्हान्स फीचर्सचा किया सोनेटमध्ये समावेश आहे ज्यामध्ये; एलईडी कनेक्ट टेल लॅम्प्स, मागच्या बाजूला डिफॉगर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम, एअर बॅग, पावर अड्जस्टेबल एक्सटेरियर रियर व्ह्यू मिरर, पावर स्टेरिंग, ऍडजेस्टेबल स्टेरिंग, रियर रीडिंग लॅम्प, रियर सीट हेडरेस्ट.

वाचा: मोठ्या कुटुंबासाठी टोयाटोची एक्सवॅन, दुसऱ्या सीटचा बनतो टेबल, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

सेफ्टी फीचर्समध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, डे अँड नाईट रिअर व्यू मिरर, इलेक्ट्रॉनिक्स ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन, सीट बेल्ट वॉर्निंग, डोअर लॉक वॉर्निंग, टायर प्रेशर मॉनिटर, इंजिन इमोबिलीझर आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल या फिचर्सचा समावेश आहे.

वाचा: 70 हजाराची जेमोपाई स्कूटर जिला चालवण्यासाठी लायसन्स-रजिस्ट्रेशनचीसुद्धा गरज नाही, ही वाचा संपूर्ण माहिती

किया सोनट इंजिन माहिती

किया सोनटमध्ये 1.2 लिटरच ऍस्परेटेड पेट्रोल इंजिन मिळतं सोबत 1.5 लिटर डिझेल इंजिन तसंच 1.0 लिटरचा टर्बो पेट्रोल इंजिन मिळतं. ऑटोमॅटिक,मॅन्युअल, DCT आणि iMT गियरबॉक्स आणि वेगवेगळ्या ट्रांसमिशन ऑपशनने कॉन्फिगर करू शकतो.

किया सोनट HTE(O) आणि HTK(O) किंमत

हुंडाई वेन्यू, महिंद्रा XUV 300 आणि टाटा नेक्सॉन यांसारख्या कार कंपनीची स्पर्धा करणाऱ्या किया सोनेटच्या या दोन नवीन वेरिएंट्सची किंमत साधारण 7 लाख ते 9 लाख दरम्यानची आहे. कियाच्या एंट्री लेवल ट्रीम्स मध्ये HTE व्हेरिएंटची किंमत 7.99 लाख रुपये इतके आहे तर किया HTK व्हेरिएंटची किंमत 8.19 लाख रुपये इतके आहे.

किया सोनेटची सोप्पी बुकिंग प्रक्रिया

किया सोनेटमध्ये हे दोन नवीन बजेट फ्रेंडली बेस-वेरीएंट्स लॉन्च करून ग्राहकांना कमी किमतीमध्ये सनरूफचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला सुद्धा दहा लाखांच्या आत मध्ये मिळणारी शिवाय सन रूप असणारी कार विकत घ्यायची असेल तर किया सोनेट हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या कारच्या बुकिंगसाठी किंवा टेस्ट राईडसाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या किया शोरूमला देऊ शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment