सिट्रॉन इ-सी3 कारचे सेफ्टी रेटिंग बघून बसेल तुम्हाला आश्चर्याचा धक्का, कार विकत घेताना करा पुन्हा विचार

सिट्रॉन इ-सी3 या कारला Global NCAP मध्ये टेस्ट करण्यात आले, ज्यामध्ये या इलेक्ट्रिक कारला सर्वात कमी सेफ्टी रेटिंग मिळालेले आहेत. अशी कोणती कमतरता या इलेक्ट्रिक कारमध्ये आहे ? ज्यामुळे या कारला सर्वात कमी सेफ्टी रेटिंग मिळालेत याची माहिती सदर लेखात वाचा.

सेफ्टीमध्ये या इलेक्ट्रिक कारला मिळाले 0 स्टार

Citroen E- C3 इलेक्ट्रिक या सब-कॉमपॅक्ट कारची किंमत 13.2 लाखापासून सुरू होते, या हॅचबॅक कारमध्ये 29.17 किलोवॉटची लिथियम आयन बॅटरी दिलेली आहे. नुकतीच ग्लोबल NCAP मध्ये या गाडीला सेफ्टीच्या दृष्टिकोनातून टेस्ट करण्यात आले. या इलेक्ट्रिक कारच्या सेफ्टी टेस्ट दरम्यान ‘अडल्ट ऑक्युपंट सेफ्टी’ म्हणजेच प्रौढ सुरक्षा रेटमध्ये या कारला 0 स्टार मिळालेले आहेत तर ‘चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टी’मध्ये या कारला 1 स्टार मिळालेला आहे, ही बाब Citroen साठी खूपच निराशाजनक आहे. गाडीमध्ये ड्रायव्हरच्या आणि पॅसेंजरच्या डोक्याला हानी पोहोचणार नाही, असे संरक्षण देऊन सुद्धा प्रौढ रहिवासी चाचणीमध्ये 34 गुणांपैकी फक्त 20.86 गुण तर बालक संरक्षण चाचणीमध्ये 49 गुणांपैकी फक्त 10.55 गुण या इलेक्ट्रिक कारला मिळालेले आहेत.

वाचा: MG ची कन्वर्टेबल कॉमेट पाहिली का? बघा ह्या कन्वर्टेबल ईव्हीचा फर्स्ट लूक, किंमत आणि सर्व काही

वाचा: टाटा पंचला बसला पंच, नक्की काय झालं स्टेडियममध्ये? जाणून घ्या स्टेडियममधल्या पंच ईव्हीची किंमत, फिचर्स सर्व काही

वाहन विक्रीचा अभ्यास करता बहुतेक सिट्रोन कंपनीच्या या खराब सेफ्टीमुळेच वाहन-विक्रीत उतार झालेले आहे. 2023 मध्ये या कंपनीने केवळ 363 युनिटचीच विक्री केलेली होती, तर जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान केवळ 267 युनिटची विक्री झालेली आहे. थोडक्यात Citroen E- C3 इलेक्ट्रिक कारची विक्री या दोन वर्षात फक्त 630 युनिट इतकी झालेले आहे.

ग्लोबल एनसीपी म्हणजे काय?

Global NCAP चा फुलफॉर्म ‘ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम ‘असून यामध्ये कारची सुरक्षितता रेटिंग दाखवली जाते, ज्यामध्ये कार किती सुरक्षित आहे याचा अभ्यास केला जातो. तुम्ही एखादी कार खरेदी करायला जाता त्यावेळेस तुम्हाला त्या कारला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मिळालेले रेटिंग दर्शवले जाते. ग्लोबल एनसीपी या टेस्ट दरम्यान कारला धडक देऊन कारमध्ये बसलेल्या पॅसेंजर ची आणि ड्रायव्हरची सुरक्षितता पडताळणी केली जाते.

हे फीचर्स असून सुद्धा सिट्रोनला सर्वात कमी रेटिंग मिळाले

सेफ्टीच्या बाबतीत माहिती देता, अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, इलेक्ट्रिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन, सीट बेल्ट वॉर्निंग इंजिन इमोब्लिझर, स्पीड सेन्सिंग ऑटो डोर लॉक, रियल कॅमेरा ड्रायव्हर एअरबॅग- पॅसेंजर एअरबॅग यांचा समावेश असून सुद्धा या कारला सर्वात कमी रेटिंग मिळालेले आहेत. या इलेक्ट्रिक कारची किंमत 13.12 लाखापासून सुरू होते, तर कारचं टॉप मॉडेल 13.43 लाखात उपलब्ध आहे, एका चार्जमध्ये 320 किलोमीटरचा पल्ला गाठेल अशी बॅटरी या गाडीमध्ये मिळते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि पाच सीटर या इलेक्ट्रिक कारला 29.2 किलोवॉटचा बॅटरी पॅक पुरवलेला आहे.

315 लिटर इतकी बूट स्पेस असणाऱ्या ह्या इलेक्ट्रिक कारला चार्ज होण्यासाठी फक्त 57 मिनिटे पुरेशी आहेत. या हॅचबॅक कारच्या फीचर्सबाबतीत माहिती घेता यात पावर स्टेरिंग, लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ड्रायव्हर एअरबॅग, पावर विंडो फ्रंट, एसी आणि हीटर यांचा समावेश आहे. मनोरंजनासाठी या कारमध्ये रेडिओ, पुढच्या बाजूला-मागच्या बाजूला स्पीकर्स, 10.23 इंचाची टच-स्क्रीन ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि कार-प्ले हा ऑप्शन उपलब्ध आहेत.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment