2024 Tata Tiago CNG AMT: लाँच आधीच डिलरशिपला आली, कमी किंमत आणि तुफान मायलेज

Tata Tiago CNG AMT 2024 Maharashtra – भारतातील पहिली CNG ऑटोमॅटिक चार चाकी टिआगो डिलरशिप ला पोहोचली असून येत्या काही दिवसात गाडीचे अनावरण होणार असल्याचे वृत्त आहे. टिआगो आणि टीगोर या दोन्ही वाहनात सीएनजी इंधन पर्याय सह ऑटोमॅटिक गेअरबॉक्स मिळणार असल्याने ग्राहकांची या आगामी अपडेटमुळे कमालीची उत्कंठा वाढली आहे. लाँच तोंडावर असताना गाडीचे ऑफिसिअल बुकिंग्स देखील सुरु झाल्या आहेत. या लेखात गाडीच्या गेअरबॉक्स बद्दल आणि किमती बद्दल बोलूयात.

Tata Tiago CNG AMT 2024 – वॉकअराउंड

tiago amt cng front
क्रेडिट – कटारिया गॅरेज

 

Kataria Garage नावाच्या एका यूटुबरने अपलोड केलेल्या विडिओ च्या आधारे निळ्या रंगातील गाडीचा आतील भाग आणि बाहेरील कॉस्मेटिक बदल पाहायला मिळाले. यामुळे टिआगो सीएनजी ऑटोमॅटिक कशी आहे याची झलक मिळाली.

tiago amt cng back
क्रेडिट – कटारिया गॅरेज

 

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स – 

या आगामी AMT CNG कार्स मुळे टाटा भारतातीळ ऑटोमोबाईल मार्केट मध्ये वेगळाच बेंचमार्क सेट करणार आहे.कार मध्ये मिळणारे ऑटो प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, आकर्षक टेल लॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो फोल्डिंग आरसे, दोन रंगात असणारे अलॉय व्हील्स, ऑटोमॅटिक एसी, ७ इंच इंफोटेंमेंट सिस्टिम, ८ स्पीकर्स, कम्फर्टेबल सीट्स आणि त्याला CNG सह ऑटोमॅटिक टेट्रान्समिशनची जोड यामुळे प्रवासी सह ड्रायवर देखील आरामदायी प्रवास करू शकणार आहे.

सेफटी फीचर्स – 

टिआगो आणि टिगोर ला ग्लोबल एनकॅप मध्ये चार सेफटी स्टार मिळालेले आहेत आणि गाडीने रोडवर तिची सेफटी आधीच सिद्ध केली आहे. दोन्ही मॉडेल्स मध्ये फ्रंट ड्युअल एअर बॅग, रिअर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनेटरिंग सिस्टिम, ब्रेक्स साठी ABS आणि EBD, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल असे फीचर्स दिले आहेत.

बूट स्पेस – 

tiago amt cng boot
क्रेडिट – कटारिया गॅरेज

 

टिआगो आणि टिगोर मध्ये सीएनजी टॅंक साठी ट्वीन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असल्याने बूट स्टोरेज साठी ग्राहकांना तडजोड करावी लागणार नाही.

ऑटोमॅटिक सीएनजी – ट्रिम आणि पॉवरट्रेन

tiago amt cng gear
क्रेडिट – कटारिया गॅरेज

 

टिआगो सीएनजी AMT तीन व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध असेल यामध्ये XTA CNG AMT, XZA+ CNG AMT आणि XZA NRG CNG AMT. टिगोर सीएनजी AMT मध्ये फक्त दोन व्हेरिएंट्स असतील यामध्ये XZA CNG AMT आणि टॉप व्हेरिएंट XZA+ CNG AMT. दोन्ही गाड्यांमध्ये तेच टाटा मोटर्स चे १.२ लीटर थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. सीएनजी मध्ये या इंजिनची पॉवर ट्रेन कमी होऊन 73.5 hp आणि 95 Nm इतकी होते.

टाटा टिआगो आणि टिगोर AMT CNG चा विडिओ मराठी मध्ये येणार आहे त्यामुळे आमच्या यूट्यूबला सब्सक्राईब करा.

किंमत आणि मायलेज अपेक्षा

टिआगो सीएनजी AMT आणि टिगोर सीएनजी AMT मध्ये मॅन्युअल सीएनजी व्हेरिएंटच्या तुलनेने १ ते २ ने मायलेज कमी झालेले पाहायला मिळेल, दोन्ही मॉडेल्स अंदाजे २५ किमी प्रति किलो पायलेज प्रदान करण्याची अपेक्षा आहे.

वाचा – टाटा Nexon i-CNG ला मिळणार ‘भरपूर बूटस्पेस’, भारतातील पहिली टर्बो सीएनजी कार

सध्या मॅन्युअल टिआगोच्या सीएनजी कार ची सुरुवातीची एक्स फॅक्टरी किंमत रुपये ६ लाख ५५ हजारांपासून तर मॅन्युअल टिगोर सीएनजी कार ची एक्स फॅक्टरी किंमत रुपये ७ लाख ८० हजारांपासून सुरु होते. ऑटोमॅटिक व्हेरिएंट साठी मॉडेल प्रमाणे ६० हजार ते ८० हजार रुपये वाढीव द्यावे लागू शकतात.

https://www.youtube.com/watch?v=2FqOBqH8Els

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment