भारतातील फॉर्च्युनर एसयूव्ही आणि कॅमरी हायब्रिडसाठी ओळखल्या जाणार्या टोयोटाने सप्टेंबर महिन्यात चांगला सेल केला आहे. कंपनीची वाढती लोकप्रियता बघता, भारतातून काढता पाय घ्या ऐवजी टोयोटाने नवीन वाहन लाँच करण्याचा निश्चय केला आहे. एवढेच नाही तर कंपनी आपला अजून एक निर्मिती प्लांट सुरु करण्याच्या तयारीत आहे. टोयोटा लाँच करणार नवीन Mid-Size SUV भारतीय मार्केट मध्ये लाँच करणार आहे. सध्या प्रोजेक्ट ला 340D कोडनेम दिला आहे. टोयोटा भारतातून जाणार अशी बातमी असतानाच कंपनीने सुझुकीशी टायप केले आणि सेल्स बूस्ट केला. सध्या टोयोटा च्या एकूण सेल्स पैकी 40 टक्के शेअर हा मारुतीच्या रीबॅच वाहनाचा आहे.
टोयोटा आता भारतात ग्रोथ करत आहे. वाढता सेल बघता कंपनी आता तिसरा कार निर्मिती प्लांट कर्नाटकात उभा करणार आहे. सध्या 2 प्लांट मध्ये 4 लाख वार्षिक वाहनांची निर्मिती केली जाऊ शकते पण आता 1 लाख वाहनांची निर्मिती या नवीन प्लांट मध्ये केली जाऊ शकते. कोडनेम 340D ही एस्युवी सुधा इथे बनणार आहे. भारतीय मार्केट मध्ये वाढती डिमांड बघता XUV700, Tata Harrier – सफारी and MG Hector ला प्रतिस्पधी म्हणून 340D हा प्रोजेक्ट टोयोटा 2026 पर्यंत लाँच करेल.
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
भारतातील संधी
टोयोटाने 2022 मध्ये 10.5 दशलक्ष वाहने विकली आणि जगातील सर्वाधिक विक्री होणार्या ऑटोमेकरचे ताज कायम राखले. जपान-आधारित टोयोटा मोटर कॉर्पने सलग तिसऱ्या वर्षी आपले पद राखून जगातील सर्वाधिक विक्री करणाराऑटोमेकर ऑटोमकर ब्रँड आहे. कंपनीने २०२३ च्या सुरुवातीलाच सांगितले की त्यांनी 2022 मध्ये 10.5 दशलक्ष वाहने विकली आहेत. २०२२ मध्ये टोयोटाची कॉरोला सर्वाधिक विकली गेली आहे, जगभरात १.१२ मिलियन युनिट्स विक्री झाली आहे.
टोयोटा भारतात “मिनी” लँड क्रूझर सादर करण्याचा विचार करत आहे, ते म्हणाले, जरी कार निर्मात्याने मोठ्या प्रमाणात विक्रीचा अंदाज व्यक्त केला नाही आणि अद्याप अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. टोयोटाने मॉडेलसह पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यास, भारतात असेंब्लीसाठी भाग आयात केले जातील, असे ते म्हणाले.